शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

छगन भुजबळ, सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे यांच्या मदतीला मित्रपक्ष का नाही?

By मिलिंद कुलकर्णी | Updated: December 26, 2023 15:49 IST

बेरीज - वजाबाकी: हे संदर्भ लक्षात घेता छगन भुजबळ, हिरे आणि आता अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर यांच्या मदतीला मित्रपक्ष पुढे का येत नाही, हे लक्षात येते.

राजकारणात शत्रू आणि मित्र कायमस्वरूपी नसतात, असे गृहितक मांडले जाते. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात घडलेल्या विविध घटना पाहता हा अनुभव सगळे घेत आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील या राजकारणाचे प्रतिबिंब वेळोवेळी उमटत असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीची अडीच वर्षे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता होती. दोन्ही काँग्रेस यापूर्वीही एकत्र सत्तेत होती, पण शिवसेना प्रथमच त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाली. तरीही हे मनोमिलन मन:पूर्वक नव्हते. नांदगावचे सेनेचे आमदार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात निधीवरून वाद झाले.

शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत येताच मालेगावमधील भाजप नेते अद्वय हिरे यांनी सेनेचा ठाकरे गट जवळ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दादा भुसे हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. हे संदर्भ लक्षात घेता छगन भुजबळ, हिरे आणि आता अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर यांच्या मदतीला मित्रपक्ष पुढे का येत नाही, हे लक्षात येते.  राजकारणाचे बदलते चित्र याला कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बच्चू कडूंचा असाही प्रहारदिव्यांग बांधवांच्या आंदोलनामुळे बच्चू कडू यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. आक्रमक शैलीमुळे त्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी खटके उडाले. नाशिकसह काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले. प्रहार या पक्षाच्या माध्यमातून ते राज्यात कार्यविस्तार करीत आहेत. दिव्यांगासोबत त्यांनी आता शेतकऱ्यांचा विषय हाती घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना कार्यरत असताना कडू यांच्याकडून कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिला गेला आहे.

कांदा निर्यातबंदी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, म्हणून प्रहारने जिल्ह्यात आंदोलन केले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चाचा प्रयत्न प्रहारने केला. तब्बल सहा तास  ठिय्या आंदोलन केल्याने नागरिक व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. आता चांदवडला दिव्यांग भवनाचे उद्घाटन दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष या नात्याने कडू यांनी रात्री पावणेबारा वाजता केले. पालकमंत्री दादा भुसे, मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना डावलून हा कार्यक्रम झाल्याने महायुतीमध्ये वाद धुमसत आहे.

मंजूर निधी मिळणार कधी?विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले. मोजके आमदार सभागृहात बोलले. उर्वरित आमदारांनी मंत्र्यांच्या पाठीमागे लागून विकासकामांसाठी मोठा निधी मंजूर करून घेतला. विधानसभा निवडणुकीला १० महिने उरले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागल्यास दोन महिने त्यात जातील. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येणार नाहीत. सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू होईल. एवढा कोट्यवधीचा निधी मिळेल काय, याची शाश्वती नाही. राज्य शासन हा निधी देणार कसा, याचाही काही आराखडा अद्याप समोर आलेला नाही. आला तरी हे अडथळे आहेत. त्यामुळे भूमिपूजने जोरात होतील, प्रत्यक्ष कामे पुढच्या पंचवार्षिकमध्ये होतील, असे चित्र दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांनी सरकारकडून निधीदेखील भरपूर आणला आहे. ही कामे जर विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली नाही, तर विरोधक याचेच भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत. आमदार आणि त्यांच्या समर्थकांना याचीच चिंता आहे. 

बडगुजर, महाजन आणि सलीम कुत्तामुंबई बॉम्बस्फोटातील जन्मठेपेची शिक्षा झालेला दहशतवादी सलीम कुत्ता याच्याशी संबंधांवरून नाशिक आणि नाशकाशी संबंधित नेत्यांची नावे विधीमंडळ आणि विधीमंडळाबाहेर प्रचंड गाजली. गेल्या वेळी एमडी प्रकरणावरून नाशिक गाजले होते. आता दहशतवाद्यांशी संबंधाने गाजत आहे. मंत्रभूमी, तंत्रभूमी, त्र्यंबकराजा, काळाराम मंदिर, सप्तश्रृंगीदेवी ही ओळख, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काय रुजतेय, घडतेय हे पाहून सर्वसामान्य माणूस भ्रमित झाला आहे. सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी होणार आहे, तत्पूर्वी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. एसीबीने जुन्या प्रकरणात बडगुजर यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. एका विवाहसोहळ्यावरून मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी लक्ष्य केले. ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी महाजनांचा बचाव करीत त्या लग्नाला माझ्यासह अनेक आमदार होते, हे स्पष्ट केले. खलनायक ठरलेला सलीम कुत्ता हयात आहे की नाही, यावरूनही वादंग झाला.

बडगुजरांची पाठराखणशिवसेनेचे संपर्कनेते संजय राऊत यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला मालेगावच्या अद्वय हिरे यांच्याविरोधात लागोपाठ गुन्हे दाखल झाले. अद्यापही हे सत्र संपलेले नाही. गेल्याच आठवड्यात कुटुंबातील योगिता हिरे यांच्याविरोधात स्वस्त धान्याच्या प्रकरणात मालेगावला गुन्हा दाखल झाला. संजय राऊत यांनी नाशिक व मालेगावात येऊन हिरे कुटुंबाची भेट घेतली. पक्ष त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही जाहीरपणे दिली. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे त्यांचे दुसरे खंदे समर्थक आहेत. त्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागला. शिवसेनेचे कट्टर विरोधक आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ताशी संबंधाचा विषय समोर आणला. या विषयाने सेनेपुढे अडचणी निर्माण झाल्या. त्यापाठोपाठ एसीबीने ठेकेदारीच्या जुन्या विषयात बडगुजर यांची चौकशी सुरू केली. पुढील महिन्यात राज्यव्यापी मेळावा नाशकात घेण्याची घोषणा पक्षाने यापूर्वीच केली आहे. त्याचे काय होईल? त्यापूर्वीच राऊत यांनी नाशकात येऊन बडगुजर यांची पाठराखण करत ‘तो’ व्हिडीओ म्हणजे एक अपघात असल्याचे स्पष्ट केले.

आम्हीच केले शहर बकाल !स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठी गावे, शहरांमध्ये भिंती रंगल्या आहेत. महापालिका, पालिकांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गुणांकन, मानांकन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. इंदोरसारखे आपलेही शहर स्वच्छ व्हावे, असे कोणाला वाटले तर त्याच चुकीचे काही नाही. त्यासाठी मोहीम राबविणे गैर नाही; पण केवळ मोहिमेसाठी कागदावर स्वच्छता दाखवणे ही शुद्ध फसवणूक आहे. किती बकाल झाली आहेत आपली शहरे! अवैध धंदे, अतिक्रमणे, पार्किंगची बेशिस्ती, नदी-नाल्यांची दुरवस्था, भकास उद्याने आणि समाज मंदिरे, नाट्यगृहांची परवड हे चित्र सर्वत्र आहे. शहरातील सेवा या महापालकेच्या अखत्यारीत आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने ठेकेदारीचा पर्याय स्वीकारला गेला. तेथे लोचा झाला आहे. ज्यांच्यासाठी या सुविधा आहेत, त्यांना कोठेही निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलेले नाही. हताशपणे तो हे सारे बघतोय. राजकीय व प्रशासकीय यंत्रणेने शहरे बकाल केली आहेत.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ