शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चांगली सुरुवात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:38 IST

वाकडी आणि राईनपाडा येथे घडलेल्या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला. एकविसाव्या शतकात माणूस एवढा पाशवी बनू शकतो, याची कल्पना कोणी केली नसेल.

- मिलिंद कुलकर्णीवाकडी आणि राईनपाडा येथे घडलेल्या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला. एकविसाव्या शतकात माणूस एवढा पाशवी बनू शकतो, याची कल्पना कोणी केली नसेल. का असे घडते आहे, त्यामागील नेमकी कारणे काय, याविषयी समाजामध्ये आता विचारमंथन सुरु झाले आहे. वैचारिक पातळीवर नेहमीप्रमाणे दोन गट पडले आहेत. विचारवंत आपल्या विचारसरणीच्या चष्म्यातून या घटनांकडे पाहत त्यांचे विश्लेषण करीत आहेत. या विचारमंथनातून एक बाब समोर आली आहे की, या दोन्ही घटनांमधील पीडित आणि आरोपी हे समाजातील तळागाळातील, शोषित, पीडित घटकांमधील आहेत. गावगाड्यामध्ये अजूनही किती विषमता आहे, प्रबोधनाची आवश्यकता आहे, याचे या घटना म्हणजे निदर्शक आहेत. केवळ जातीमुळेच विषमता, अन्याय, अत्याचार घडतात, असे नाही तर सत्ता, संपत्ती ज्या घटकाकडे आहे, तो प्रभावशाली ठरत आहे. ही नवी सामाजिक उतरंड ग्रामीण भागात रुढ होत चालली आहे.

आपला देश हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष असल्याचे संविधानाने निश्चित केल्यानंतरदेखील जातीयता, धर्मांधता समाजात कायम आहे. जातीयता एवढ्या टोकाला गेलेली आहे की, एखाद्या गुन्ह्यात पीडित आणि आरोपी कोणत्या जाती-धर्माचा आहे, ते शोधले जाऊ लागले आहे. जाती-धर्माचा रंग देऊन या घटनेचे राजकारण केले जात आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली जात आहेत. ९९ दोषी सुटले तरी चालेल पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये, या तत्त्वावर न्यायव्यवस्था कार्यान्वित असताना दोषी कोण, त्याला रस्त्यावर फासावर लटकवा अशा मागण्या आंदोलनकर्ता जनसमुदाय करु लागला आहे. अराजकासारखी स्थिती निर्माण होऊ पहात आहे, हे निकोप समाजासाठी भयसूचक चिन्ह आहे.

वाकडी आणि राईनपाडा येथील घटनांचा प्रशासन केवळ पोलिसी तपासापुरता पाठपुरावा करीत आहे. मुलांना पळविणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे राईनपाडाची घटना घडली, असे प्रथमदर्शनी दिसत असून त्यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस दलाने राईनपाड्याजवळ रोहोड या गावी पोलीस दूरक्षेत्र स्थापित करुन अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी तैनात केले आहे. त्यासोबत फिरते पोलीस स्टेशन गठीत करुन प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये अधिकारी व कर्मचारी बैठका घेऊन जागरुकता आणण्याचे कार्य करीत आहे. पोलीस दलाचे हे स्वागतार्ह असे पाऊल आहे. पोलिसांविषयी आदरयुक्त भीती समाजामध्ये असते. पण हाच पोलिसदादा जेव्हा मार्गदर्शकाच्या रुपात, सल्लागाराच्या रुपात अवतरतो, तेव्हा जनसमुदायाला ही आधार देणारी बाब ठरु शकते. हाच मुद्दा हेरुन नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी फिरत्या पोलीस स्टेशनचा प्रयोग अवलंबिला आहे. राईनपाड्याच्या घटनेनंतर दोर्जे हे तातडीने घटनास्थळी आले. त्यानंतर पुढील आठवड्यात त्यांनी तब्बल सहा तास अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. नंदुरबारला देखील त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. तडफदार अधिकारी परिस्थितीचे अचूक निदान करुन उपाययोजना कशा करतो, त्याचा अनुभव यानिमित्ताने येतो.

शोषित, पीडित घटकांविषयी अशी तळमळ, कळकळ इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना कधी येईल? ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डाकसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, लाईनमन, एस.टी.चालक, वाहक यांचा नियमित ग्रामीण आणि आदिवासी भागाशी संपर्क येत असतो. परंतु ज्या गावात नियुक्ती असते, त्या गावात हे कर्मचारी अजिबात राहत नाही. जवळच्या तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा केली जाते. अगदी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील आळीपाळीने ये-जा करीत असतात. त्यामुळे गावाशी, गावातील लोकांशी संवाद, संपर्क व समन्वय राहत नाही. कामापुरता मामा असेच नाते राहते. गावकºयांनादेखील ये-जा करणाºया या कर्मचाºयाविषयी जिव्हाळा, आपुलकी वाटत नाही. गावकरी आणि प्रशासकीय कर्मचारी ही दरी रुंदावत जात असल्याने खºया अडचणी उद्भवल्या आहेत. शासकीय योजना, उपक्रमांना न मिळणारा प्रतिसाद, लाभार्र्थींपर्यंत योजना न पोहोचण्याची दिल्ली, मुंबईमधील ओरड याला अशा गोष्टी कारणीभूत आहेत. मध्यंतरी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी एक दिवस खेड्यात जाऊन मुक्काम करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. हा चांगला प्रयत्न होता. पण बहुसंख्य शासकीय योजनांप्रमाणे आरंभशूरता याठिकाणीही झाली. आणि एक चांगला उपक्रम काळाच्या पडद्याआड गेला.