शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धीवर चढलेला गंज घातक!

By किरण अग्रवाल | Updated: January 17, 2019 09:41 IST

प्रयत्न करून व परिश्रम घेऊनही यश लाभत नाही तेव्हा निराशेची काजळी दाटणे स्वाभाविक असते. अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अंधश्रद्धीय उपायांकडे झुकणे घडीभर समजूनही घेता यावे, पण विशेषत: तरुण पिढी प्रयत्नच करण्याचे आणि संधीची कवाडे उघडण्याचे सोडून तसे करताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही.

किरण अग्रवाल

प्रयत्न करून व परिश्रम घेऊनही यश लाभत नाही तेव्हा निराशेची काजळी दाटणे स्वाभाविक असते. अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अंधश्रद्धीय उपायांकडे झुकणे घडीभर समजूनही घेता यावे, पण विशेषत: तरुण पिढी प्रयत्नच करण्याचे आणि संधीची कवाडे उघडण्याचे सोडून तसे करताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात दिसणारे त्याचसंदर्भातले चित्र विषण्ण करणारे आहे.कुठल्याही व कुणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखो, करोडो भाविक एकत्र येणे हीच खरी तर कुंभमेळ्याची आजच्या युगातही टिकून असलेली खासियत म्हणता यावी. श्रद्धा आणि आस्थेचे पर्व असलेल्या कुंभमेळ्याची ख्याती त्यामुळे विदेशातही पोहोचली आहे. साधू संतांची राहणी, भक्ती पंथाचा जागर यामुळे तर कुंभमेळा आकर्षणाचे केंद्र बनतोच पण नागा संन्याशींचे अचाट प्रयोगही अनेकांना खुणावत असतात. ठिकठिकाणच्या कुंभ व सिंहस्थ पर्वात त्याचे प्रत्यंतरही येत असते. प्रयागराजमध्येही शेकडो विदेशी पर्यटकच काय देशातील भाविकही त्या उत्सुकतेतून आलेले दिसत आहेत.कुंभग्राममध्ये एकीकडे आखाडे व साधू संतांच्या शिबिरात प्रवचने, कथा व भजनादी धार्मिक कार्यक्र म होत असताना दुसरीकडे छोट्या-छोट्या राहुट्या उभारून बसलेल्या नागा संन्याशींकडे आपल्या समस्या व अडचणींचे कुंभ रिते करताना भाबडे भाविक दिसत आहेत. समोरच्या यज्ञकुंडातील विभूती कपाळाला लावत अशांना त्यांच्या दान दक्षिणेच्या प्रमाणात समस्यामुक्तीचे अंधश्रद्धीय मार्ग सांगितले जातात व त्याने नवा आशावाद घेऊन सदर भाबडे भक्त चेहऱ्यावर समाधान दर्शविताना आढळून येतात. त्यांना भाबडे यासाठी म्हणायचे की, समस्यामुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून ते नशिबावर विसंबून व कुणाच्या तरी आशीर्वादाच्या भरवशावर तरून जाण्यात विश्वास बाळगतात. हा भाबडेपणा आशिक्षिततेतून येतो तसा सारे पर्याय चाचपून थकल्यावरही येतो हा भाग वेगळा; पण तो भाबडा आशावाद असतो हेच खरे, अन्यथा सा-या शंकांचे समाधान असेच कुणाच्या चरणी शोधता आले असते, तर प्रयत्नांची गरजच उरली नसती.यातील विशेष अगर क्लेशदायी बाब अशी की, थिजलेल्या विचारांच्या व प्रयत्नांती हरलेल्या लोकांच्या अशा धडपडी एकवेळ समजूनही घेता याव्यात; पण तरुण मुलंदेखील मोठ्या संख्येने यात विश्वास दाखविताना दिसून आलेत. नोकरीचा प्रश्न असेल, मनाजोग्या सहचारिणीचा शोध असेल किंवा व्यवसायाशी संबंधित विषय, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संन्याशींकडून मिळविले जाते. घरी शेती करावी की शहरात जावे याबाबतचा सल्लाही मोठ्या अधिकारवाणीने ते देताना दिसतात. असा सल्ला देणाऱ्यांना स्वत:च्या अंगाला राख फासण्याची वेळ का आली असावी याचा विचार मात्र तरुण मुलं करत नाहीत. खरे तर तरुणाई म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची क्षमता असलेली पिढी, आव्हानाचे आकाश कवेत घेत स्वत:साठी स्वत:चे नवीन रस्ते बनविणारी व स्वप्नांना पंख लावून ती सत्यात उतरविण्याची धमक ठेवणारी पिढी; पण तरुणपणातच ती आत्मविश्वास गमावून कुण्या साधूच्या पुढ्यात समस्यामुक्तीचा मार्ग शोधताना दिसून येते म्हटल्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ येते. कशातून घडून येते हे, तर अज्ञानातून व भाबड्या समजातून. विचारांची प्रक्रिया खुंटली व बुद्धीला गंज चढला की यापेक्षा दुसरे काही होणे नसते. त्यातून कपाळमोक्षच ओढवण्याची शक्यता असते. प्रयत्न, परिश्रम सोडून अशी कपाळमोक्ष करून घेऊ पाहणाऱ्यांची मोठी संख्या प्रयागराजच्या रस्त्यावरील साधूंसमोर बसलेली आढळून येते हे म्हणूनच आश्चर्यकारी आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा