शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटनालाही वाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:58 IST

शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे.

- बाळासाहेब बोचरेशेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे. यासाठी सरकारने ठोस धोरण अवलंबले तर हा व्यवसाय रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करू शकतो.शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकºयांना कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आज उपलब्ध झाला आहे. यासाठी शेतकºयांची मोट बांधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे धोरण अवलंबले तर देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. अनेक तरुण आणि सुशिक्षित शेतकरी उद्योजक म्हणून उदयास येतील.रानातला रानमेवा रानातच खावा. त्याची चव निसर्गासोबतच चाखली तर त्याच्यासारखा आनंद नाही. अनेक शहरी लोकांना पर्यटनाला निघाल्यावर अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थांची चव हवी असते. भारताची प्राचीन संस्कृती व चालीरीती, पेहराव याचा अभ्यास करणाºयांना हे सगळं ग्रामीण भागातच पाहायला मिळतं आणि तेही शेतकºयांच्या वावरातच, त्यामुळे शेत शिवाराला भेट देणाºयांची संख्या वाढू लागली आहे. अगदी परदेशी पर्यटकही कृषी पर्यटनाकडे आकृष्ट होऊ लागले आहेत.बारामतीजवळ सुनेत्राताई पवार यांनी महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या माध्यमातून कृषी पर्यटनामध्ये उतरू इच्छिणाºया शेतकºयांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. गेल्या १० वर्षांत कृषी पर्यटन कार्यशाळा, परिषदा, संमेलन, प्रदर्शने त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी पर्यटनाचा गवगवा केला जात आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांमध्ये ही केंद्रे लोकप्रिय होऊ लागली आहेत. सध्या बाळासाहेब बराटे हे या संस्थेचे चेअरमन आहेत. शेतकºयांनी शहरातील पर्यटकांना आपली शेती व उपक्रम दाखवणे, त्यांचे सशुल्क आदरातिथ्य करणे यालाच कृषी पर्यटन म्हणतात. महाराष्टÑ राज्य यामध्ये आघाडीवर असून आजमितीस राज्यात ३७५ कृषी पर्यटन केंद्रे आहेत. सोलापूरसारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्रे आहेत. या केंद्रांना परराज्यासह परदेशातील पर्यटकांनीही भेटी दिल्या आहेत. सेंद्रीय शेती, नैसर्गिक जीवन, विषमुक्त अन्न, देशी गाईचे महत्त्व, पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती व शरीराला आनंद देणारे निसर्गरम्य वातावरण यामुळे या पर्यटन केंद्रांनी पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. गेल्या तीन वर्षांत कृषी पर्यटन केंद्रांना आवर्जून भेट देणाºया हौशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. सुमारे ७० लाख पर्यटकांनी खास पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या असून त्यामधून शेतकºयांना चांगले चार कोटीपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.शेती टिकवणे, ती फायद्यात आणणे आणि शेतकºयांना चांगला मोबदला मिळवून देणे यासाठी कृषी पर्यटन हा चांगला पर्याय आहे. नोकरीच्या शोधात असलेला सुशिक्षित तरुण कृषी पर्यटनामुळे स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. पण सरकारने याबाबत अजूनही गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. शेतकºयांना शेतीदराने वीज दिली जाते; मात्र कृषी पर्यटन केंद्रांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो, असा अनुभव सोलापूरच्या वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका व मार्टच्या संचालक सोनाली जाधव यांचा अनुभव आहे. मार्टने पाच वर्षांपूर्वी सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव दिला असून सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. नाबार्डची मदत, सहलींसाठी प्राधान्य यापलीकडे सरकारने कृषी पर्यटनासाठी पूरक असे ठोस धोरण तयार केलेले नाही. कृषी पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्रचंड वाव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी