शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

कोरोनापासून रक्षणासाठी राजभर यांचा घोटभर उपाय!

By किरण अग्रवाल | Updated: December 31, 2020 07:32 IST

Bhim Rajbhar And Corona Virus : आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते.

किरण अग्रवालकाखेला कळसा असताना गावाला वळसा मारण्याची आपली रीतच पुरानी आहे, त्यामुळे आपल्या आसपास जे आहे ते सोडून आपण भलतीकडेच धुंडाळत बसतो. आजार आपदेच्या स्थितीतही साधे सोपे उपाय करण्याचे सोडून आपण दुसरीकडे नजरा लावून बसतो. कोरोनावरील उपायाबाबतही तोच अनुभव येत असल्यामुळेच भीम राजभर यांच्यासारख्या तज्ज्ञांना पुढे येऊन हे सांगावे लागले, की काही चिंता करू नका; ताडी प्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा! म्हणजे बघा इतका सोपा उपाय; परंतु आपण उगाच वेगवेगळ्या लसींकडे डोळे लावून बसलो आहोत आणि संशोधनावर वेळ घालवत आहोत. याला आपल्याकडे घरातल्या आपल्या माणसाबद्दलची गुणग्राहकताच नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?उत्तर प्रदेशात आमदार असलेल्या भीम राजभर यांनी नुकताच एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे ताडी प्यायल्याने कोरोनापासून रक्षण होऊ शकते. ताडीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असाही दावा त्यांनी केला आहे. तेव्हा त्यांचा हा सल्ला व दावा पाहता आपण उगाच आठ-नऊ महिने कोरोनावर उपाय शोधण्याच्या भानगडीत वेळ घालवला म्हणायचे. ते रेमडीसीवर की काय म्हणतात ते इंजेक्शन घेण्यापेक्षा आपली ताडी घेतलेली केव्हाही छानच. शासनही उगाच भलती सलती औषधी रुग्णालयांना पुरवत बसले व त्यावर कोट्यवधीचा खर्च केला, त्याऐवजी ताडीचे ग्लास सर्व ठिकाणी भरून दिले असते तर किती बरे झाले असते! औषधी गुणधर्माच्या झिंकचा डोस घेण्यापेक्षा झिंग आणणारी ताडी कोरोनाग्रस्तही चवीने चाखतील की! कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या संभावनेतून जागोजागी जे मोठमोठे कोरोना केअर सेंटर उभारून ठेवले गेले आहेत व अधिकतर ठिकाणी ते रिकामेच राहिल्याचेही आढळून येते, तेथे या ताडीचे उपाय योजले गेल्यास तेही भरभरून वाहतील ! पण साध्या सोप्या उपायांवर आमचा विश्वासच नसतो.

राजभर म्हणतात त्याप्रमाणे ताडीमुळे कोरोनापासून रक्षण तर होईलच; पण एकूणच जी भीती समाजामध्ये पसरली आहे ती भीती दूर होऊन उलट रुग्ण आनंदाने चालत कोरोना केअर सेंटरमध्ये येतील, शिवाय राज्याराज्यातील पर्यावरण विभागांना ताडाच्या लागवडीची मोहीम राबवता येईल, म्हणजे औषधी इलाजाला तर ताडी कामास येईलच शिवाय पर्यावरण रक्षणालाही हातभार लागून जाईल. मात्र आपल्याकडे राजभर यांच्यासारख्या अभ्यासकांबद्दलची गुणग्राहकता नाही हेच खरे. ती त्यांच्यात बहन मायावती यांनी हेरली म्हणूनच की काय, या भीम राजभर यांना बहुजन समाज पक्षाच्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानंतर बलिया येथील सत्कार समारंभातच त्यांनी हा उपाय सुचविला. बरे, इतका सोपा उपाय सुचवणारे राजभर हे उत्तर प्रदेशातील आहेत म्हणून आपण नाराज होण्याचे अगर ईर्ष्या करण्याचे कारण नाही, आपल्या नागपुरातच त्यांचे शिक्षण झाले आहे, हे आपल्यासाठी अभिमानाचेच म्हणता यावे.बरे, ताडी ही फक्त कोरोनापासून रक्षणच करते असे नाही, तर ती गंगाजलपेक्षाही शुद्ध व पवित्र असल्याचेही या राजभर महाशयांनी म्हटले आहे म्हणे. दुर्दैवाने सद्य:स्थितीत उत्तर प्रदेशात बहनजींचे म्हणजे बसपाचे शासन नाही, अन्यथा या प्रदेशाध्यक्षांना तेथील मंदिरांमध्ये भाविकांना गंगाजल देण्याऐवजी ताडी तीर्थ देण्याची शिफारस करता आली असती. यातील शुद्धतेचा मुद्दा एक वेळ ग्राह्यही धरता यावा, कारण ताडाच्या झाडापासून उपलब्ध होणारी ताडी ज्या प्रक्रियेतून बनते ती शुद्धता सिद्ध करणारी असूही शकते; परंतु ही ताडी पवित्रही असेल तर तिला तीर्थाचा दर्जा बहाल करण्याची मागणीही राजभर यांनी करायला हवी. खरेच आपण चंद्र व मंगळावर जाण्याच्या बाता करतो, विज्ञानाचे तसे प्रयत्नही चाललेले दिसून येतात; परंतु राजभर यांनी सुचविलेल्या उपाय व पवित्रतेच्या महत्तेखेरीज ताडीचे इतर गुण लक्षात घेता स्वप्नातच काय, डोळे न मिटताही चंद्र वा मंगळावर जाऊन येणे मुळात अवघड नाहीच. तेव्हा ताडीप्रेमींनी तरी राजभर यांचे समर्थन करायला काय हरकत आहे? राजभर जी आगे बढो...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत