शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

तसला गाढवपणा नको रे बाप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:24 IST

गाढवांची इमर्जन्सी बैठक सुरू होती. राज्यातील ‘थिंक टँक’ ( यांचाही थिंक टँक असतो बरं का!) बैठकीला उपस्थित होता. काही तरुणतुर्कही आवर्जून आले होते.

-दिलीप तिखिलेगाढवांची इमर्जन्सी बैठक सुरू होती. राज्यातील ‘थिंक टँक’ ( यांचाही थिंक टँक असतो बरं का!) बैठकीला उपस्थित होता. काही तरुणतुर्कही आवर्जून आले होते. अजेंड्यावर एकच विषय होता. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गाढवांबद्दल केलेले वक्तव्य. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी गेले तरी ते माणूस म्हणून बाहेर येते’ या खडसेंच्या विधानाची समस्त गाढव जातीने गंभीर दखल घेतली होती. उपस्थितांपैकी काहींच्या मते हे विधान गाढवांना हीन लेखण्याच्या प्रकारातले होते, तर काहींना खडसेंनी गाढवांना माणसाच्या समकक्ष दर्जात आणून ठेवल्याचे वाटत होते.अध्यक्ष महोदय उठून उभे राहिलेअध्यक्ष : मित्रों....! (मित्रों... ऐकताच उपस्थितांत खसखस पिकली. एकजण हळूच पुटपुटला... हाही संघात जाऊन आला वाटते.) या खसखसीकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष म्हणाले, मित्रांंनो ही काही ‘चाय पे चर्चा’ नाही. किंवा ‘मन की बात’ही नाही. एका गंभीर विषयावर मंथन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. खडसेंचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. आपल्याला संघात पाठवायचे, तेथे माणूस झाल्यावर भाजपात प्रवेश द्यायचा. अशारीतीने देशात भाजपाचे संख्याबळ वाढवायचे ही खेळी त्यामागे असू शकते. ..पण खडसेंना भाजपा वाढविण्याचे कारणच काय? ते तर बीजेपीच्या ब्लॅकलिस्टवर आहेत म्हणे... एका तरुण तुर्काची पृच्छा.अध्यक्ष : ते माणसांचे राजकारण आहे. तुला नाही कळायचे. केवळ गिरीश महाजनांनाच पक्ष वाढविता येतो असे नाही, मी पण वाढवू शकतो असे खडसेंना दाखवून द्यायचे असेल... समजलास!तरुण तुर्क : माझी आणखी एक शंका आहे... संघात गेलेला गाढव माणूस बनून भाजपात जातो, पण... डायरेक्ट भाजपाच्या गोटात गेलेला माणूस गाढव का ठरतो?अध्यक्ष : तू कुणाबद्दल बोलतोय?तरुण तुर्क : मला कुणाचे नाव घ्यायचे नाही, पण... ‘स्वाभिमान’ ठेवणाºयाने भाजपात जाऊ नये असे माझे मत आहे. बिचाºयाची काय गत झाली, हे आपण बघतोच आहोत.अध्यक्ष : आपण मात्र तसला गाढवपणा करायचा नाही. ठरलं तर मग...ना संघात जायचे, ना माणूस बनायचे, माणसात आधीच गाढव कमी का आहेत...!

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे