शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

By admin | Updated: March 29, 2017 00:59 IST

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण सक्ती आहे/ मरायचीपण सक्ती आहे’ ‘हा आमचा सक्तीचा काळ, भक्ती हरवलेला़’ ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, राम नगरकरांच्या भूपाळीने मराठी माणूस जागा होई़ त्यातील सडासंमार्जन, धेनुचे हंबरणे, गाईच्या धारा सगळेच हरवले़ दर बुधवारी रात्री १० वाजता रेडिओवर लागणारी ‘आपली आवड’ - मराठी गीतांची ही मालिका म्हणजे कुटुंबातील सर्वांसाठी पर्वणी़ आवड उरली नाही़ आपलेपणाला तर तडेच गेले़ प्रवासात पळणाऱ्या झाडांचे सुखद दर्शन कोणीच घेत नाही कारण मुलेसुद्धा मोबाइलशी खेळण्यातच दंग़ तालेवार मामाने गाव केव्हाच सोडले़ तो मुंबईला राहतो चाळीत़ मामी नोकरी करते़ तिला कोणी आले गेलेले चालत नाही़ ती सुगरण आहे का नाही माहीत नाही़ कारण ती इडली, समोसा, पॅटीस, वडापाव गाड्यावरूनच मागवते़मी काही माझ्या आजी-आजोबांना पाहिले नाही़ आईची माया आणि वडिलांचा धाक मात्र अनुभवला आहे़ बाजारातून तयार पदार्थ विकत आणणे म्हणजे कमीपणाचे मानले जाई़ तो नऊवारी साडीचा काऴ नऊवारी साडी म्हणजे वात्सल्याची ऊब़ आजीच्या जीर्ण झालेल्या साड्यांची गोधडी म्हणजे नातवंडांसाठी अप्रूप़ भातवरण, भाजी, आमटी, चटणी, पोळी किंवा भाकरी एवढाच मेनू घरोघरी़ खवय्ये नावाचा प्राणी जन्मास आला नव्हता़ माणसे अन्नाविषयी तक्रार न करता तृप्तीची ढेकर देऊनच पानावरून उठत, आवडीनिवडीचे स्थान गौण होते़ पानात टाकण्याची मुभा कोणालाही नव्हती़ ‘खाऊन माज; पण पानात टाकून माजू नकोस’ हे घरोघरी ऐकायला मिळे़ संसार काटकसरीचा होता म्हणून संसारात सुख-शांती होती़ उधळपट्टीला थारा नव्हता़ सुख-दु:ख सारेच वाटून घेत़ माणसे शिकलेली नव्हती; पण फार समंजस होती़ मुली लाजायच्या, छोटी मुले दंगामस्ती करायची, वडील डोळे वटारायचे कधी कधी चड्डी ओली होईपर्यंत बडवायचे, आई चुका पदराआड घालायची़ दिवेलागणीला सारे घरी़ घराची म्हणून एक शिस्त होती़ दुसऱ्याचे घेणे म्हणजे गुन्हा होता़ पोलिसांचा धाक होता़ खाकी वेशातील पोलिसांना पाहून मुले घाबरत़ आता कोणीच कोणाला घाबरत नाही़ दृष्कृत्यापासून रोखत नाही़ मला काय त्याचे? एवढ्या बेपर्वाईने वागतात़ आदर्शाला मूठमाती आपण केव्हाच दिली आहे़ संस्काराची नाळ तोडूनच टाकली आहे़ ‘नाही कोण कोणाचा बापलेक मामा भाचा मग अर्थ काय?बेंबीचा विश्वचक्री’ ती बेंबी मात्र आदि मानवापासून अंतिम मानवापर्यंत राहणार आहे़ पहिले उरले नाही; पण बेंबी मात्र आहे पहिली आणि अंतिम़- डॉ. गोविंद काळे