शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नको नको हे कुत्र्याचं जिणं

By गजानन दिवाण | Updated: January 15, 2018 02:17 IST

माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते.

माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. आता सर्वांनी एकच करायचे. हाडाच्या तुकड्यामागे आपण धावतोच. असे काही जण माणसांमध्येही असतात.खरंच आम्हा कुत्र्याइतका शहाणा आणि इमानदार प्राणी कुठेच सापडणार नाही, असे गुणगान माणसे सतत का बरे गात असावेत? घराची आणि शेताची राखण करतो. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो... किती किती हे कौतुक?औरंगाबादेतील चौकाचौकांत रोज न मागता पोटभर खायला मिळते. अगदी ठरल्या वेळेला म्हणजे रात्री १० ते ११ वाजेदरम्यान आणि भल्या सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर. यासाठी कुणावरही भुंकण्याची वा अंगावर जाण्याची गरज नाही. कुठल्या चौकात घरगुती भाजी-पोळी, कुठल्या चौकात हॉटेलातील भाजी-पोळी, कुठेकुठे तर अगदी मांसाहारसुद्धा. काही काही चौकांत अगदी रोज नवीन डिश. असा रोजचा पाहुणचार स्वत: माणसांना सुद्धा अपवादानेच मिळत असावा कदाचित. आमचे पोट भरल्यानंतरच महापालिकेची कुठली तरी घंटागाडी यायची आणि उरलेले अन्न घेऊन जायची. कधी कधी तर तीही यायची नाही. म्हणजे आमचे पोट भरले नाही, हे त्यांना आधीच समजत असावे कदाचित. औरंगाबादेत चार वर्षांपासून गुण्यागोविंदाने भर रस्त्यावर असा संसार सुरू होता. या काळात कधीच कुणी टोकले नाही; पण अचानक गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांतून एक जाहिरात आली. आमची नसबंदी केली जाणार आहे म्हणे. याला काय अर्थ? भरपूर खायचे-प्यायचे, पण वंश वाढवायचा नाही. माणसांचे असे हे वागणे म्हणजे खाऊ-पिऊ घालून जिवंतपणीच मारण्याचा प्रकार नव्हे का? होते चूक प्रत्येकाकडून. तशी गेल्या आठवड्यात आमच्याही भाईबंदाकडून झाली. तब्बल १८ चिमुकल्यांना चावा घेतला. आम्हालाही वाईट वाटले त्याचे. म्हणून काय प्रत्येक कुत्रा वाईट म्हणायचा? कुत्र्यांनी चावा घेतलेल्या जखमी मुलांना पाहून माणसांनी माणुसकीच सोडून दिली त्यांची. आम्ही फक्त चावा घेतला. ही माणसे तर एकमेकांचे खून पाडतात. रक्तातल्या नात्यालाही ते सोडत नाहीत. म्हणून काय त्यांचीही सरसकट नसबंदी करायची?या एकाच घटनेने माणुसकीचे पितळ उघडे पाडले. माणसाच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ आज आम्हाला कळू लागला आहे. एकीकडे इमानदार म्हणून आम्हा कुत्र्यांची पाठ थोपटायची आणि त्याचवेळी कुत्र्याची मौत मारतो, असेही म्हणायचे. घराची रखवालदारी करण्याची वेळ आली, की गुणगान गायचे आणि दुसरीकडे माणसांमध्ये बोलताना द्वेषाने कुत्र्यासारखे पिसेन, असेही म्हणायचे. घराबाहेर मी भुंकू लागलो, की इमानदार म्हणून गुण गायचे. स्वत: माणसांमध्येच कुणी मोठ्याने बोलू लागला की मात्र कुत्र्यासारखे भुंकू नको, असेही म्हणायचे...एक ज्येष्ठ कुत्रा म्हणाला, ‘माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. आपण तर फार दूर. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. माणसांच्या सुरक्षेसाठी असतो तो सुरक्षारक्षकही माणूसच. तो कधी उलटेल याचा नेम नाही. म्हणून रखवालीसाठी आम्हा कुत्र्यांचे कौतुक. आता सर्वांनी एकच करायचे. हाडाच्या तुकड्यामागे आपण धावतोच. असे काही जण माणसांमध्येही असतात. त्यांनाच हेरायचे. काही तुकडे टाकून नसबंदी करणाºया नव्या कंपनीलाही औरंगाबादेतून पिटाळून लावायचे. अगदी चार वर्षांपूर्वी केले तसे.’- गजानन दिवाण

टॅग्स :dogकुत्रा