शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बाता नका मारू...

By सचिन जवळकोटे | Updated: February 22, 2018 08:56 IST

‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती.

‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. तशीच धक्कादायकही होती. कारण पुण्यातला साधा ‘लकडी पूल’ ओलांडायला कधी-कधी जिथं २५ मिनिटं लागतात, तिथं पुणे-मुंबईचा ‘हायपरलूप प्रवास’ त्याच्या भाषेत जणू भयानकऽऽ स्पीडचा होता.त्यानं थेट देवेंद्रपंतांना मोबाईल कॉल केला. त्यांच्या डायलर टोनवर ‘मॅग्नेटिक का फिग्नेटिक’चं कसलं तरी नवं जिंगल वाजत होतं. सुरुवातीला याचा अर्थ काही पिंटकरावाला समजलाच नाही. बहुधा ‘अच्छे दिन’नंतरचा नवा ‘मॅग्नेटिक’ फंडा असावा, असा भाबडा समज त्यानं करून घेतला.तिकडून कॉल काही उचलला गेलाच नाही. फक्त एका लेडीजच्या आवाजात ‘फोन नका करू. थेट भेटा. बोलाचाली करा,’ असलंच काहीबाही ‘जपानी हेल’मध्ये सांगितलं गेलं.पिंटकराव गोंधळला. त्यानं ‘एम्पीएस्सी पास’ दोस्ताला विचारलं, तेव्हा उत्तरही भलतंच मिळालं. ‘बुलेट ट्रेन’च्या नादापायी पंतांसह अनेक नेत्यांची ऊठबस अलीकडं सातत्यानं जपानी लोकांसोबत वाढल्यानं सर्वांनाच जपानी भाषेची लागण झाल्याची ही ‘ब्रेकिंग न्यूज’ होती.पिंटकरावाला कौतुक वाटलं. त्यानं दिल्लीतल्या नितीनरावांना कॉल केला. मात्र, तिकडूनही एक मेसेज जपानी स्टाईलनं कानावर आदळला, ‘बिल नका मागू. रोड करून टाका,’ हे ऐकताच ‘आपण बांधकाम खात्याचे कर्जबाजारी ठेकेदार-बिकेदार आहोत की काय ?’ असा प्रश्न क्षणभर पिंटकरावाला पडला. त्यानं मग विनोदभाऊंशी संवाद साधला. मात्र तेही एकाच कल्पनेनं झपाटून गेलेले, ‘भिलारला या कीऽऽ या कीऽऽ स्ट्रॉबेरी खा की. मराठी बोला की. संमेलन घेऊ की,’ तेव्हा पिंटकरावानंही चिडून त्यांच्याच जपानी हेलमध्ये ‘बाता नका मारू, फोन बंद करून टाका,’ असं सुनावलं.‘भिलारच्या पलीकडं खूप मोठा महाराष्ट्र आहे, हे विनोदभाऊंना कधी कळणार?’ असा केविलवाणा विचार करत पिंटकरावानं ‘मातोश्री’वर संपर्क साधला. कॉल लागला. मात्र उद्धो तिकडं संजयरावांना काहीतरी सांगत होते, ‘ऊतू नका. मातू नका. मज हवा सत्तेतला वाटा... आज हेच छापून टाका,’दचकलेल्या पिंटकरावाच्या हातातून मोबाईल खाली पडला. ‘जपानी लॅँग्वेजची लागण लईच व्हायरल झालीया लगाऽऽ’ म्हणत त्यानं घाबरत-घाबरत मग ‘कृष्णकुंज’वर कॉल केला. राजकडूनही एकाच वाक्यात विषय संपविला गेला, ‘तोडा.. फोडा.. झोडा... करून टाका राडा!’घाम पुसत पिंटकरावानं अजितदादांना फोनवरूनच ही सारी हकिकत सांगितली. आपल्या लाडक्या धनंजयदादांचं भाषण मन लावून ऐकण्यात मग्न असलेले दादा काहीच बोलले नाहीत. फक्त ‘डॅम ईट..’ एवढंच शांतपणे म्हणत त्यांनी फोन कट केला.पिंटकरावानं दोस्ताला पुन्हा विचारलं, ‘डॅम ईट म्हंजी काय रं भौऽऽ?’ तेव्हा परभाषेचं पुस्तक वाचण्यात मग्न असणारा दोस्तही ‘जपानी हेल’मध्येच नकळतपणे बोलून गेला, ‘कोरडा नका ठेवू. ओला करून टाका!’ 

टॅग्स :Hyperloopहायपर लूप