शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

निवडणूक नको...मग बांधा रेशीमगाठी

By admin | Updated: April 29, 2015 23:22 IST

कर्नाटक सीमेवरील बोरूळ गावाने निवडणुकीसंदर्भात एक नवा दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राला दिला.

कर्नाटक सीमेवरील बोरूळ गावाने निवडणुकीसंदर्भात एक नवा दृष्टिकोन ग्रामीण महाराष्ट्राला दिला. भाजपाच्या प्रदेश महासंपर्क अभियानाचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख यांना भावलेला हा दृष्टिकोन भाजपाच्या नव्या सदस्यांना भावेल काय...!निवडणुकांचे राजकारण दिवसेंदिवस अनाकलनीय बनत चालले आहे. मतदारांची मानसिकता आणि निवडणुकीतील विजय याचे पक्के सूत्र कसे मांडायचे, याचे उत्तर अनेक राजकारण्यांना मिळत नाही. विकासाची कामे, प्रतिमा आणि मतदारांची मनं नाही जमली तरी मतं वळवू शकणारी ‘मीडिया मॅनेजमेंट’ यांचा मेळ घालता-घालता उमेदवारांची दमछाक होते. ग्रामपंचायतीसारख्या गाव पातळीवरील निवडणुकीत तर ईर्षा, हेवेदावे आणि हाणामाऱ्या ठरलेल्याच ! शहरामधील कॉलनीजमध्येदेखील आमच्या कॉलनीला रंग द्या, अमुक करा, तमुक करा तरच मते देऊ’ असा सूर उमटतो. पैशांची उधळण आणि वेगवेगळ्या आमिषांची पखरण तर अपरिहार्यच ! या सर्वाला अपवाद ठरण्याचेही प्रयत्न चालले आहेत ही समाधानाची बाब आहे.पक्षीय राजकारणाच्या पलीकडे झेप घेत तसा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात झाला. कर्नाटकाच्या सीमेवर दक्षिण सोलापूर तालुक्यात सातशे लोकवस्तीचे बोरूळ हे आडवळणाचे गाव. गाव शंभर टक्के कन्नडभाषिक आहे. अठरा पगड जाती असलेले हे गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाशात आले. ग्रामपंचायतीत विजयी होणारा गट आपल्याच तंबूत राहावा यासाठी सर्वच नेत्यांचा प्रयत्न असतो. त्यातून गावकरी मागतील ते देण्याची तयारी नेते ठेवतात. बोरूळच्या ग्रामस्थांनी मात्र वेगळाच अनुभव दिला.भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर व पदाधिकाऱ्यांसह या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, हा उद्देश घेऊन या गावात दाखल झाले. गावकरी सांगतील ती विकासकामे आपण करू, पण निवडणूक बिनविरोध व एकदिलाने व्हावी, अशी भावना आमदार देशमुख यांनी गावकऱ्यांपुढे मांडली. गावकऱ्यांनी त्यांची भावना स्वीकारली, पण मागणी मात्र वेगळीच पुढे केली ! ‘निवडणूक नको, तर मग गावात जमलेली लग्नं लावून द्या’, असा आग्रह धरला. ‘लोकमंगल’ समूहाच्या माध्यमातून सामुदायिक विवाहाची चळवळ उभी करून २१०० तरुणांचे सासरे बनलेल्या आ. देशमुखांच्या दृष्टीने तर हा आग्रह म्हणजे दुधात साखरच ! त्यांनी लगेचच गावकऱ्यांची मागणी मान्य केली आणि लगीनघाई सुरू झाली. निवडणूक बिनविरोध तर झालीच; पण ग्रामपंचायतीचे नेतृत्व महिलांच्या हाती देण्याचा निर्णय झाला. गावातील तीन मुलं आणि अकरा मुलींची लग्नं जमलेलीच होती. दि. २७ एप्रिल रोजी पंचक्रोशीतील अनेक गावांच्या साक्षीने बोरूळ गावात चौदा जोडप्यांचा विवाह आ. सुभाष देशमुख यांनी आपल्या ‘लोकमंगल’ परिवाराच्या माध्यमातून थाटात पार पाडला. गावजेवण ठेवण्यात आल्यामुळे त्या दिवशी गावात चूल पेटली नाही. बोरूळ गावाने निवडणुकी-संदर्भातील नवा दृष्टिकोन महाराष्ट्रापुढे ठेवला आहे. प्रचार आणि निवडणूक तंत्रात कमालीची आधुनिकता आल्याचे आपण अनुभवतो. सोशल मीडियापासून ते थेट गावपातळीवरील कार्यकर्त्यांना हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी ‘कॉर्पोरेट’ शैली आपलीशी करण्यावर भर दिला जात असताना सोलापूर जिल्ह्यात सामुदायिक विवाहाचा वेगळ्या दृष्टिकोनातून वापर होतो, ही कौतुकाची बाब. त्यात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेले आ. सुभाष देशमुख प्रयोगशील, कल्पक आणि तरीही व्यावसायिकतेला सामाजिक बांधीलकीची जोड देणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाने देशात ‘मिस्ड कॉल’ सभासद नोंदणीचा इतिहास घडविल्यानंतर देशमुख यांच्यावर राज्यातील सदस्य नोंदणीचा लेखा-जोखा घेणाऱ्या प्रदेश महासंपर्क अभियानाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. बोरूळच्या ग्रामस्थांनी ‘निवडणूक नको, तर रेशीमगाठी बांधा!’ असे म्हटले. आता नवे पक्षसदस्य देशमुख यांना काय बरे म्हणतील?- राजा माने