शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

घटस्फोटही मर्यादित असतो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:21 IST

बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.

बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.अगं वेडे, मग घटस्फोट देऊन त्याला सुखी करण्याऐवजी संसारात राहून त्याला छळत राहणं चांगलं नाही का? आता मैत्रिणीचा हा सल्ला तिला आवडला की नाही हे माहीत नाही पण आमचे आजचे रायकीय पक्ष मात्र या सल्ल्यानुसार वागत आहेत एवढं मात्र खरं.आता हेच पाहा ना! चंद्राबाबू नायडूंनी एनडीएसोबत संसार थाटला. पण मोदीसाहेब आपल्या मागण्या मान्य करीत नाही म्हणून काडीमोड घेण्यापर्यंत पाळी आली. आपल्या दोन मंत्र्यांना त्यांनी मोदी सरकारातून बाहेरही काढले. आता ते आपल्या सर्व खासदारांसमवेत एनडीएचा पाठिंबा काढून घेतील आणि मोदींना मोठा हादरा बसेल म्हणून मोदींचे आतले आणि बाहेरचे विरोधक जाम खूश होते. पण चंद्राबाबूंनी एनडीएतून बाहेर पडणार नाही असे लगेच जाहीर करून विरोधकांच्या या भावी आनंदावर विरजण घातले. बाबूंनीही विचार केला असेल महाराष्टÑात शिवसेना घटस्फोट न घेता सरकारला रोज ठोकून काढतच आहे मग आपण का मागे राहावे.ंआता कुणी म्हणेल, एवढाच स्वाभिमान होता तर पाठिंबा काढून पूर्णपणे काडीमोडच का घेतला नाही. पण राजेहो, घटस्फोट का असाएका दमात मिळतो का? कोर्टातही आधी ‘चारसहा महिने नांदून पाहा, मग विचार करा’ असा सल्ला दिला जातो. हे तर राजकारण आहे. येथे मान, स्वाभिमान वगैरे चालत नाही. कोकणातला स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवावा लागतो. वाघ फक्त डरकाळीच फोडतो. सत्तेतून बाहेर पडण्याचा स्वाभिमान दाखवत नाही.चंद्राबाबूंनी एक तरी केले. सत्तेतील आपला सहभाग काढून घेतला. सेना मात्र योग्य वेळेची वाट पाहत सोडचिठ्ठीचा कागद तेवढा घेऊन फिरत आहे.आताच्या राजकारणात आणखी एक पैलू दिसतो. ‘ठोशास ठोसा’. चंद्राबाबूंनी केंद्रातून दोन मंत्री काढून घेतले. मोदींनी त्याला प्रत्युत्तर देत आंध्रच्या मंत्रिमंडळातून भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास लावले. झाले फिट्टमफाट. तुम्ही लेनिनचा पुतळा फोडता, आम्ही श्यामाप्रसादांच्या पुतळ्याला हात घालतो. मग बहुतांशी पक्ष, गट या विद्वेषाच्या बीभत्स राजकारणात सामील होऊन आपली मळमळ बाहेर काढतात. मग यातून महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळेही सुटत नाहीत. राजकारणात धर्म आणणारे विघ्नसंतोषीही आपल्याकडे कमी नाहीत. एका ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीचीही विटंबना झाल्याची घटना घडली. हे प्रकार कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण काही राजकारणी यावर आपली पोळी शेकून घेत आहेत एवढे नक्की.परवा एका ठिकाणी काही महाभागांनी महात्मा गांधींचा चष्माच फोडला म्हणे. हे महाभाग बहुतेक गांधीभक्त असावेत. आज देशात जे वातावरण निर्माण झाले, जी फोडाफाडी चालू आहे, ती पाहून आपल्या प्रिय बापंूनी पुन्हा एकदा ‘हे राम’ म्हणू नये ही त्यांची प्रामाणिक भावना असावी. असो! या निमित्ताने का होईना, पुतळ्यांना ‘झेड’ सुरक्षा मिळत आहे हेही नसे थोडके.- दिलीप तिखिले

टॅग्स :BJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी