शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

दिगू, छत्री आणि नागपूर अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:23 IST

पत्रकार दिगू (सिंहासनमधील नव्हे) यानं खिन्न मनानं छत्री उचलून बॅगेत भरली. यावेळी नागपूरच्या अधिवेशनाला जाताना त्याची बॅग बरीच फुगली होती

पत्रकार दिगू (सिंहासनमधील नव्हे) यानं खिन्न मनानं छत्री उचलून बॅगेत भरली. यावेळी नागपूरच्या अधिवेशनाला जाताना त्याची बॅग बरीच फुगली होती. पावसात नाईट ड्रेस, बनियान, रुमाल, मोजे आदी कपडे वाळणार नसल्यानं दिगूनं कपड्यांचे पाच-पाच सेट भरले होते. दिगूच्या लग्नातला ब्लेझर कपाटात लटकवला होता. हिवाळी अधिवेशनाला जाताना दिगू मोठ्या उत्साहानं तो घेऊन जायचा. त्यामुळे त्याच्या वापराचा अनुशेष भरून निघत होता.दिगू दिसायला फारच साधा असल्यानं आणि त्याच्या शरीराला आकार उकार नसल्यानं तो ब्लेझर एखाद्या बुजगावण्याला चढवल्यासारखा वाटायचा. मात्र हिवाळी अधिवेशनातील थंडीपासून संरक्षण करायचा. आता सरकारनं नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचा निकाल घेतल्यानं ब्लेझरऐवजी छत्री दिगूच्या सामानाची शोभा वाढवत होती. नागपूरमध्ये पावसात दिगू कधी गेला नव्हता. यापूर्वी केवळ तीनवेळा अपरिहार्यतेतून नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतले गेले होते. मात्र आता यापुढं सरकारनं आपलं आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असं बदलून घेण्याचं ठरवल्यानं डिसेंबर महिन्यात होणारं अधिवेशन हे अर्थसंकल्पीय असणार आहे. मुंबईत कुठली आलेय थंडी? लोकलमध्ये गर्दीत पाऊल ठेवताच सर्वांग घामानं डबडबतं. दिगूनं घामाच्या ओशट कल्पनेनं चेहरा वेडावाकडा केला. दिगू पत्रकार झाला तेव्हा नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हटले की, तो अक्षरश: आनंदून जायचा. त्या काळात शेतात, फार्महाऊसवर, धाब्यांवर हुरडा पार्ट्या व्हायच्या. रोज रात्री कुठं ना कुठं निमंत्रण असायचं. थंडीमुळं अक्षरश: दातावर दात वाजतं असायचे. ऊन ऊन दोन घास पोटात गेल्यावर मजा यायची. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तर फॅशन शोला आल्यासारखं वातावरण असायचं. रंगीबेरंगी स्वेटर, मफलर, बंद गळ्याचे कोट, डिझायनर ब्लेझर. एखाद्या बड्या विवाह सोहळ्याला हजेरी लावल्यासारखं वाटायचं. नागपुरात गेल्यावर अचानक काही पत्रकारांना वाढलेल्या वजनाची जाणीव व्हायची.मुंबईत रात्री केवळ पाठ टेकण्याकरिता घरी जाणाऱ्या या पत्रकारांना मॉर्निंग वॉकची सुरसुरी यायची. सेमिनारी हिल, जपानी गार्डन असा मोठ्ठा परिसर सक्काळी सक्काळी तुडवत फिरताना आनंद व्हायचा. आता पावसाळ्यातील कुंद वातावरणात कोण बाहेर पाऊल टाकणार? शनिवार-रविवारी अधिवेशनाला सुटी असल्यावर ताडोबा, चिखलदरा, पेंच येथे निघणाºया सहली यापुढं अशक्यच. पत्रकारांच्या सहली, त्यांच्या पार्ट्या धुमधडाक्यात साजºया होत असताना नागपूरमधील वृत्तपत्रात हमखास प्रसिद्ध होणारी बातमी म्हणजे ‘सरकारी गाड्या घेऊन अधिकारी पिकनिकला’. आता पावसाळ्यात पिकनिक झाली नाही तर या बातमीचा अंकुर तरी कसा फुटणार? दिगूनं जड अंत:करणानं बॅग बंद केली. तेवढ्यात त्याच्या मित्र पत्रकाराचा फोन वाजला. दिगू, मनोरा आमदार निवास पाडत असल्यानं आणि सर्वच आमदारांची निवासाची पर्यायी व्यवस्था होत नसल्यानं यंदा नागपूरमध्येच हिवाळी अधिवेशन होईल, अशी चिन्हं आहेत. यंदाचं अधिवेशन झाल्यावर मग निवडणुकाच आहेत. पुढचं पुढील सरकार ठरवेल. हे ऐकून दिगूची कळी खुलली.- संदीप प्रधान