शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विविध शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

आपली संपत्ती आपल्या जवळच आहे फक्त ती सुप्त स्वरूपात आहे तिला मूर्त स्वरूपात आपल्याला आणायचे आहे.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारतुमच्या तिजोरीत भरपूर संपत्ती आहे पण तुम्हाला माहीतच नाही व तुमच्याजवळ तिजोरी उघडून पाहण्यासाठी वेळही नाही. तुम्ही मात्र पैशासाठी इतरत्र हात पसरवत आहे व गयावया करीत आहे, अशी काहीशी अवस्था आज आपली झाली आहे. खरं तर, आपली संपत्ती आपल्या जवळच आहे फक्त ती सुप्त स्वरूपात आहे तिला मूर्त स्वरूपात आपल्याला आणायचे आहे. आपली संपत्ती म्हणजे आपल्यातच जन्मापासून वसत असलेल्या विविध शक्ती व आपले सद्गुण. आपण या शक्तींचा वारंवार उपयोग करू लागलो की त्या वृद्धिंगत होत असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रगट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही तर दुर्बलता दूर करण्याचा उपाय म्हणजे शक्ती!माणसामध्ये आधीच वसत असलेली शक्ती प्रगट करा व तिला तिचे स्मरण द्या .आपली पहिली शक्ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची शक्ती, दुसरी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आत्मविश्वास वाढविण्याची शक्ती, तिसरी म्हणजे प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची शक्ती, चौथी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये संतुष्ट राहून पुढे प्रयत्न करायची शक्ती, पाचवी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या दु:खाला पकडून न ठेवता त्याला विसरत जाण्याची शक्ती, सहावी म्हणजे सहयोग करण्याची शक्ती, सातवी म्हणजे आलेल्या परिस्थितीला प्रथम विरोध न करता शांत मनानी स्वीकारण्याची शक्ती, आठवी म्हणजे परिस्थितीमध्ये निरपेक्ष भाव जपण्याची शक्ती व नववी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये सहिष्णुता बाळगण्याची शक्ती. या शक्तींमुळे आपण परिस्थितीमध्ये गुंतून न रहाता स्थिर राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायावर लक्ष केंद्रीत करू शकतो. या व्यतिरिक्त, आपल्याजवळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सद्गुणांची अस्त्रे आहेत. ती म्हणजे शांती, प्रेम, परमानंद, ज्ञान, मौन, पवित्रता व सत्यता. या विविध शक्तींनी व सद्गुणांच्या अस्त्रांनी दुर्गुणांच्या असुरांशी लढाई करून आपण परिस्थितीला जिंकायचे असते. आपण या विविध शक्तीचा योग्यवेळी उपयोग केला व जीवनात सद्गुणांचा कलश प्रस्थापित केला की मग बघा आयुष्य किती आनंदी, आल्हाददायक, प्रेरणादायी व सुंदर क्षणांनी परिपूर्ण होईल!

टॅग्स :Meditationसाधना