शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

विशेष मुलाखत - पैसा आणि बळ वापरून लोकशाहीची हत्या सुरू आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:59 IST

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत.

नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर  आपण निवडणूक लढवत आहात?घटनात्मक लोकशाही प्रक्रिया आणि संस्था वाचवणे, हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आज लोकशाही संकटात आहे.

मोदी सरकारला तर सतत लोकांचे समर्थन मिळते आहे, मग लोकशाही संकटात कशी? त्यांना कर्नाटकात बहुमत मिळाले होते का? मध्य प्रदेशात किंवा महाराष्ट्रात मिळाले होते का? लोकांनी निवडून दिलेली सरकारे भाजपा एकामागून एक पाडत आहे; आणि तेथे आपले सरकार स्थापन करत आहे. त्यांचे म्हणणे असे की, निवडणुकीत निवडून कोणीही येऊ द्या, सरकार आमचेच होईल. पैसा आणि बळ वापरून सरकारे स्थापन केली जात आहेत. राजकीय हितासाठी सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. लोकशाहीची हत्या होत असल्याने ती वाचवणे जरुरीचे आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर होईल का? या निवडणुकीत मतदारांची संख्या पुष्कळच कमी असते. देशातले खासदार अधिक परिपक्व आणि समजदार आहेत. सर्वच पक्षातले खासदार सध्याची राजकीय परिस्थिती पाहून चिंतित आहेत. या निवडणुकीत आपल्याला धक्का देणारा निकाल पाहायला मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

यशवंत सिन्हा यांना केवळ २०८ खासदारांचा पाठिंबा मिळाला. आपल्याला काय अपेक्षा आहेत? द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. अनेक पक्षातले आदिवासी आमदार आणि खासदार यांनी खुलेपणाने मत दिले. त्यामुळे सिन्हा यांना जितकी मते मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाहीत.

मग काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षात एखाद्या आदिवासीला एवढ्या महत्त्वाच्या पदाची उमेदवारी न देऊन चूक केली का? तो एक स्वतंत्र प्रश्न आहे. काँग्रेसने के. आर. नारायणन यांच्या रूपात पहिला दलित राष्ट्रपती देशाला दिला. प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिली महिला राष्ट्रपती, डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या रूपात पहिला अल्पसंख्याक राष्ट्रपती दिला.

अल्पसंख्याक वर्गातील दक्षिण भारतीय महिला असल्याने आपल्याला यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा जास्त मते मिळतील, असे वाटते का? सर्व पक्षात माझे मित्र आणि पाठीराखे आहेत. पक्षीय बंधने बाजूला ठेवून ते मला मत देतील, असा विश्वास वाटतो. गेली ५० वर्षे मी अत्यंत स्वच्छ असे सामाजिक जीवन जगले.

पण आता तर तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला आहे?हे अत्यंत दुर्दैवी आहे, एवढेच मी म्हणू शकते.

मग आपली कामगिरी चांगली राहील, असे आपण कसे म्हणता? पूर्व आणि उत्तरेतल्या राज्यांपासून महाराष्ट्रापर्यंत मी काम केले आहे. माझी सासुरवाडी महाराष्ट्रातली आहे. माझे सासरे आणि सासूबाई स्वातंत्र्य सैनिक होते. दोघांनाही साडेतीन वर्षाचा कारावास झाला होता. एक आर्थर रोड तुरुंगात होते, तर दुसरे येरवड्याला. सासरे मुंबईचे शरीफ होते. मी स्वतः पाच वर्ष महाराष्ट्र काँग्रेसची प्रभारी महासचिव होते.

गेली सहा वर्षे आपण राजकारणात सक्रिय नव्हता. काँग्रेस पक्षातच होतात का? २००९ ते १४ राज्यपाल होते, तेव्हा मी काँग्रेसची सदस्य नव्हते. पण त्यानंतर पक्षाची सदस्य आहे. आता उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्यासाठी मी पक्ष सोडला आहे.

आपल्या आत्मचरित्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल आपण पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत, आपल्याला आजही तसेच म्हणायचे आहे? हे पहा, निवडणूक माझ्या पुस्तकाविषयी नाही. मी माझ्या पुस्तकाचा प्रचार करत नाही. त्याविषयी स्वतंत्रपणे पाहिजे तितका वेळ आपण बोलू शकतो. मी मागे हटणारी नाही. मी जे काही लिहिले आहे, त्याच्याशी आजही बांधील आहे. परंतु त्यातला काही भाग संदर्भ सोडून उद्घृत करणे योग्य नाही.

सोनिया गांधी यांच्याशी आपले नाते कसे आहे? सोनियाजींशी माझे आजही जवळचे नाते आहे. २००४ नंतर पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मला पाच वर्षे  पक्षाचे महासचिवपद दिले होते. आठ राज्यांची प्रभारी म्हणून मी काम पाहिले. आपल्याला यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे?

टॅग्स :congressकाँग्रेसPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022