शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महाराष्ट्रातील ऊस कारखान्यांच्या गेटवर सीसीटीव्ही बसवा, राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:36 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी जयसिंगपूर येथे सोळावी ऊस परिषद होत आहे. उसाला पहिली उचल किती मिळावी, याची मागणी या परिषदेत केली जाते. तिच्या आधारेच साखर कारखादारांशी चर्चा होऊन पहिली उचल ठरते. या पार्श्वभूमीवर या संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी विश्वास पाटील यांनी केलेली बातचीत.महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस ऊसदर आंदोलनामुळे ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी जयसिंगपूर येथे सोळावी ऊस परिषद होत आहे. उसाला पहिली उचल किती मिळावी, याची मागणी या परिषदेत केली जाते. तिच्या आधारेच साखर कारखादारांशी चर्चा होऊन पहिली उचल ठरते. या पार्श्वभूमीवर या संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी विश्वास पाटील यांनी केलेली बातचीत.महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस ऊसदर आंदोलनामुळे शिस्त लागली असे वाटते का? ऊस आंदोलनामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीस शिस्त लागली हे खरे असले, तरी वजनकाट्यातील लूट पूर्णत: रोखण्यास अद्याप आम्हाला यश आलेले नाही. त्यामुळे यापुढील काळात ही लूट थांबविणे हाच संघटनेचा मुख्य अजेंडा असणार आहे.इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांमुळे वजनात काटा मारता येत नाही असे म्हणतात. मग ही लूट कशाप्रकारे होते? मुख्यत: खासगी कारखाने व काही सहकारी कारखानदारही वजनकाट्याद्वारे लूट करतात. आता इलेक्ट्रॉनिक काटे बसविण्यात आले असले तरी विशिष्ट वेळेला त्याचे सेटिंग रिमोटद्वारे बदलून लुबाडणूक होते. काही कारखानदारांची मुले वजनकाट्यावर बसूनच असतात, अशाही तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. काही लोक उतारा कमी दाखवितात. त्यामुळे साखर उत्पादन जास्त होते. मग ही साखर बिनशिक्क्याच्या पोत्यातून रात्री बाहेर काढली जाते. याला चाप लावण्यासाठीच साखरेच्या गोदामात व गेटवर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.शेतकरी चळवळीमुळे सहकारी साखर कारखानदारीत काय सुधारणा झाली असे तुम्हाला वाटते?शेतकरी चळवळीमुळे कारखान्यांकडून होणाºया अनावश्यक कपाती थांबल्या. बिनपरतीच्या व बिनव्याजाच्या ठेवी बंद झाल्या. मनमानी वाहतूक भाडे लावले जात होते, ते बंद झाले. त्यामुळे यापुढे २५ किलोमीटरच्या आत व २५ ते ५० किलोमीटरच्या अंतरातील ऊस वाहतुकीसाठी वेगळा दर असेल. त्यामुळे शेतकºयांची एफआरपीही त्यानुसार बदलणार आहे. काही कारखाने सरसकट ७५० रुपये वाहतूक खर्च लावत होते. ही मनमानी आता करता येणार नाही. तोडणीच्या खर्चात काही कारखाने अख्ख्या शेती खात्याचा पगार लावत होते. ते आम्ही बंद करायला लावले. आता फक्त स्लीप बॉयचा पगार आणि मजुरांना ने-आण व त्यांना तात्पुरत्या निवासासाठी दिलेल्या साहित्याचाच खर्च लावता येतो. अशा अनेक चांगल्या सुधारणा चळवळीच्या रेट्यामुळे झाल्या आहेत.‘स्वाभिमानी’चे ऊसदर आंदोलन पहिल्या उचलीपुरतेच असते असे म्हटले जाते ?यापूर्वी पहिली उचल दिल्यानंतर कारखाने अंतिम दराबाबत ‘ब्र’ शब्द काढत नव्हते. तेव्हा त्या परिस्थितीची गरज म्हणून आम्ही पहिली उचल जास्तीत जास्त शेतकºयांच्या पदरात कशी पडेल यासाठी संघर्ष केला. यापुढील काळात ही दिशा बदलून अंतिम दर कसा जास्तीत जास्त मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न राहील.कारण एफआरपी व ७०:३० चा फॉर्म्युला कायद्याने निश्चित करून दिला आहे. तो पाळणे कारखान्यांना बंधनकारक आहे. कारखान्याने मिळविलेल्या संपत्तीत शेतकºयाला वाटा मिळाला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठीच दबावगट म्हणून चळवळीचा वापर करू

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी