शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घटत्या टक्क्यांचं गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:30 IST

सीबीएसई आणि राज्य बोर्डाच्या बारावी परीक्षेपाठोपाठ यंदा नीट परीक्षेचाही टक्का घसरला़ मुंबईसारखे शहर, जेथे शिक्षणाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो; नवनवीन पद्धती अवलंबल्या जातात, अशा शहरात तरी निकालाचा टक्का प्रत्येक वर्षी वाढायला हवा, अशी अपेक्षा असते.

सीबीएसई आणि राज्य बोर्डाच्या बारावी परीक्षेपाठोपाठ यंदा नीट परीक्षेचाही टक्का घसरला़ मुंबईसारखे शहर, जेथे शिक्षणाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो; नवनवीन पद्धती अवलंबल्या जातात, अशा शहरात तरी निकालाचा टक्का प्रत्येक वर्षी वाढायला हवा, अशी अपेक्षा असते. नीटच्या परीक्षेत तर नाव घ्यावे असे यश मुंबईतील विद्यार्थ्यांना मिळवता आले नाही़ नांदेडच्या विद्यार्थिनीने देशात सातवा क्रमांक पटकावला़ त्यामुळे गुणवत्तेचा, त्यासाठीच्या मेहनतीचा टक्का मेट्रो शहरांकडून निमशहरी भागांकडे सरकतो आहे. हे तेथील गुणवत्तावाढीच्या दृष्टीने समाधानकारक असले, तरी ज्यांना सर्व सुविधा सहजी उपलब्ध होतात, अशा भागांना पुरेसे यश मिळवता न येणे हे अपयश नेमके कोणाचे याचे उत्तर शोधण्याची गरज आहे़ वैद्यकीय प्रवेशाच्या देशव्यापी परीक्षेत मुंबईतील विद्यार्थ्यांनी मागे राहावे, हे येथील शिक्षणपद्धतीचा दर्जा कमी झाल्याचे चिन्ह म्हणायचे की, अन्य परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय, हे तपासून पाहावे लागेल. वस्तुत: मुंबईत वैद्यकीय क्षेत्राला अधिक वाव आहे़ सध्या मेडिकल टुरिझमला मिळणाऱ्या प्रोत्साहनाच्या काळात तर हे क्षेत्र अनेक अंगांनी विकसित होत जाणार हे नक्की. उपचाराचे अत्याधुनिक तंत्रज्ञान याच शहरात प्रथम आजमावले जाते़ देश-परदेशांतून रुग्णांचा येथे उपचारासाठी ओढा असतो. या वातावरणामुळे वैद्यकीय क्षेत्राकडील आकर्षण कायम राहते. मुंबईत अभ्यासासाठी पोषक वातावरण, साधने उपलब्ध असली, तरी अभ्यासाव्यतिरिक्त आकर्षणाच्या अन्य गोष्टीही भुरळ घालतात. त्याचा हा परिणाम आहे की येथील विद्यार्थी टक्केवारीच्या स्पर्धेपलीकडे आणखी काही व्यवधानांचा विचार करतो याचीही चाचपणी यानिमित्ताने करता येईल. देश पातळीवरील निकालावर दृष्टिक्षेप टाकला, तर नीट परीक्षेत उत्तर प्रदेशने बाजी मारल्याचे दिसते. त्यानंतर केरळ आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक शिक्षणसंकुले दोन दशकांत उभी राहिली.आपली शिक्षणपद्धती पुढारलेली असतानाही महाराष्ट्राने निकालात तिसºया क्रमांकावर येणे, अचंबित करणारे आहे़ महाराष्ट्रात वैद्यकीयच्या जागा वाढवल्या जातील, असे सरकारने जाहीर केले आहे़ अशी पोषक परिस्थिती असतानाही निकालाचा टक्का घसरत राहिला, तर प्रवेशाची स्पर्धा संपुष्टात येण्याचा धोका ठळकपणे समोर येतो आहे. त्याचबरोबर तंत्रसज्ज होत, आधुनिक विज्ञानाची कास धरत, संशोधनाची जोड मिळवत विस्तारणारे हे क्षेत्र कवेत घेण्याची मनीषा कमी होते आहे की काय, हे प्रश्नही घटत्या टक्केवारीने उभे केले आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिक