शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

दशकपूर्तीतही मनसे हताशच!

By admin | Updated: March 12, 2016 03:41 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात आगलावू भाषा करीत पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असताना, दुसरीकडे या पक्षाला राज्यात ज्या शहरात प्रथम सत्ता मिळाली त्या नाशकात मात्र दशकपूर्तीचा काडीमात्रही आनंद वा उत्साह दिसून येऊ नये, हे त्या पक्षातील हताशा दूर झालेली नसल्याचेच लक्षण म्हणायला हवे. पक्षातील ‘बडवेगिरी’चा प्रत्यय, सुस्पष्ट धोरणांचा अभाव व प्रारंभिक शिलेदारांची गळती यासारख्या कारणातून हे हबकलेपण ओढवले असून, त्यासंबंधीचा ‘उतारा’ केवळ तोडफोडीच्याच कार्यशैलीत शोधला जाणार आहे का, असा प्रश्नही यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.कोणत्याही राजकीय पक्षासाठी दशकभराची वाटचाल ही काही लहान बाब नसते. कारण हा कालावधी त्या पक्षाच्या जडणघडणीचा काळ असतो. त्यातल्या त्यात जेव्हा एखाद्या ठिकाणची सत्ता मिळते तेव्हा त्या पक्षाची जबाबदारी अधिकच वाढून जाते. अशा स्थितीत काही करून दाखविता आले तर पुढील प्रगतीचे मार्ग आपोआप प्रशस्त होत जातात. पण ‘मनसे’ची याच बाबतीत नादारी आहे. या पक्षाला स्थापनेनंतर एकमेव नाशिक महापालिकेतील सत्ता लाभली. मात्र या सत्तेच्या माध्यमातून नवनिर्माणाचे प्रत्यंतर आणून देणे ‘मनसे’ला जमले नाही. म्हणायला राज ठाकरे लाख म्हणोत की, ‘सत्ता दिल्यास महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन’, पण येथे साधी नाशिक महापालिकेतील नोकरशाही त्यांना गेल्या चार वर्षात सरळ करता आलेली नाही. सध्याचेच उदाहरण घ्या, नाशकातील पाणीपुरवठ्याबाबत जनतेची ओरड वाढली आहे. पालिकेतील सत्ताधारी या नात्याने प्रशासनाला कामाला लावून यासंबंधीच्या तक्रारी दूर करणे अपेक्षित असताना, ‘मनसे’ने स्वत:च टँकर्स सुरू करून आपल्याच अपयशावर शिक्कामोर्तब करून घेतले आहे. पक्ष म्हणून असे करता येत असेल तर ते महापालिकेतील सत्ताधारी म्हणून का करता येऊ नये, असा यातील साधा सवाल आहे. ‘मनसे’च्या स्थापनेनंतर मुंबईपेक्षा नाशकात अधिक जल्लोष केला गेला होता. महापालिकेतील सत्तेखेरीज विधानसभेत शहरातून या पक्षाचे तीन तीन आमदार निवडून गेले होते. पण कुणालाही नवनिर्माण साधता न आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीनही जागा हातच्या गेल्या. त्यानंतर पक्षात ‘बडवेगिरी’ वाढल्याचा आरोप करीत पक्ष स्थापना काळातील शिलेदार वसंत गिते पक्ष सोडून चालते झाले. पक्षाच्या पहिल्या महापौरपदाचा फेटा ज्यांच्या मस्तकी बांधला गेला ते अ‍ॅड. यतिन वाघ हेदेखील अगदी अलीकडेच पक्षाबाहेर पडले. आणखीही बरीच पडझड झाली आणि त्यातूनच पक्षात सुन्नता आली. पण त्यासंदर्भात कुठे काय चुकते आहे याचे आत्मपरीक्षणच कुणी करायला तयार नाही. तेव्हा केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून व नव्या रिक्षांच्या जाळपोळीतून पक्षातील ही सुन्नता वा अस्वस्थता दूर करता येईल का हा खरा प्रश्न असून, या प्रश्नाच्या मुळाशी असणारी हताशा यातून समोर येणारी आहे. ‘राजगड’ म्हणविल्या जाणाऱ्या पक्षाच्या नाशकातील मुख्यालयात पक्षाच्या दशकपूर्तीचा मागमूसही आढळून न येण्यामागे तेच कारण आहे.विशेष म्हणजे, राजकारणात आक्रमकता व सत्ता या नेहमीच आकर्षणाच्या बाबी ठरत आल्या आहेत. आज नरेंद्र मोदी व राज ठाकरे या दोघांकडेही वेगवेगळ्या संदर्भात त्या असताना, नाशकातील अनेकजण तुलनेने मवाळपंथीय म्हणविल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेने जात आहेत हे काहीसे अनाकलनीय व कुतुहलाचे असले तरी ते वास्तव आहे. राज्यातील सत्तेत शिवसेनेची स्थिती किती नाजूक आहे हे जगजाहीर असताना असे होते आहे. काही मनसैनिक थेट शिवसेनेत आले आहेत, तर काही ‘व्हाया भाजपा’ येऊ घातले आहेत. तेव्हा याही बाबतीत राज ठाकरे यांचे अपयश वा ‘मनसे’तील घसरगुंडी लक्षणीय ठरणारी आहे. - किरण अग्रवाल