शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या डरकाळ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:23 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी जुळवून घेत युती कायम राखण्यात यश मिळविले

मिलिंद कुलकर्णी 

लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी जुळवून घेत युती कायम राखण्यात यश मिळविले असले तरी मुंबईतील हा निर्णय गावपातळीवर अजून रुचलेला दिसत नाही. एकीकडे उध्दव ठाकरे हे भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमीत शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मेळाव्यासाठी गुजरातेत जात असताना इकडे मुक्ताईनगरातील शिवसैनिक हे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठी ठिय्या आंदोलन करताना दिसले. ऐन दिवाळीत शिवसैनिकांना अटक करुन कारागृहात टाकणाºया भाजपाचा प्रचार कसा करायचा, अशी भूमिका पाचोºयाच्या शिवसैनिकांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत मांडली. तिकडे धुळ्यात नरेंद्र परदेशी यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिकांनी भाजपचा प्रचार करण्यास स्पष्टपणे इन्कार केला. साक्रीत भाजप उमेदवार डॉ.हीना गावीत व डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला तालुकाप्रमुख विशाल देसलेंसह शिवसैनिकांनी पाठ फिरविली. खान्देशातील चारही मतदारसंघात भाजपाशी जुळवून घेण्यास शिवसैनिक राजी नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. इतर राजकीय पक्ष आणि शिवसेना यात फरक आहे. शिवसेना ही संघटना आहे. लोकशाही पध्दतीत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली असली तरी तिचा जन्म, कार्यपध्दती आणि मुद्यांवर आधारीत राजकारण पाहिले तर संघटना म्हणून तिची बांधणी झालेली दिसते. जातीपातीच्या पलिकडे जाऊन शिवसैनिकांना पदे देण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुढे चालवत आहे. परंतु पावणे पाच वर्षे भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र व राज्य सरकारवर विरोधी पक्षांपेक्षा अधिक कडवट भाषेत टीका करणाºया शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत त्याच भाजपशी जुळवून घेणे हे शिवसैनिकांना रुचलेले नाही. कारण, भाजपाच्या शतप्रतिशतसारख्या विस्तारवादी योजनांमुळे ग्रामीण भागात शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याची खंत सैनिकांना जाणवत आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि नंदुरबारात भाजपाचे पालकमंत्री आहेत, तर धुळ्यात शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. जळगावात गुलाबराव पाटील यांच्या रुपाने राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. याउलट भाजपकडे केंद्रीय राज्यमंत्री, दोन कॅबीनेट मंत्रिपदे असल्याने भाजपा वर्चस्ववादी भूमिकेत राहिला आहे. राज्यात पूर्वी शिवसेना ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत राहिला तर खान्देशात मात्र त्याला नेहमी ‘लहान भावा’ची भूमिका वठवावी लागली. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांना कायम दुय्यम वागणूक मिळत असल्याची चीड शिवसैनिकांमध्ये आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्याने शिवसेना व सैनिकांचे खडसे हे क्रमांक एकचे शत्रू ठरले. उध्दव ठाकरे यांनी मुक्ताईनगरात येऊन घेतलेली सभा हे त्याचे निदर्शक होते. तो राग सैनिकांमध्ये अजून कायम असल्याचे परवाच्या आंदोलनावरुन दिसून आले. दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे स्थानिक शिवसैनिकांच्यादृष्टीने क्रमांक दोनचे शत्रू बनले आहेत. पाचोºयातील शिवसैनिकांची दिवाळीतील जेलवारी, जळगाव आणि धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपविण्याचा झालेला प्रयत्न, जळगाव जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवूनही निवडणुकीनंतर सत्तेत येण्याच्या २५ वर्षांचा पॅटर्न बदलवून सेनेऐवजी काँग्रेसच्या सदस्याला जवळ करणे या गोष्टी शिवसैनिकांच्या जखमांवर मीठ चोळणाºया ठरल्या आहेत. ‘संकटमोचक’ म्हणून गिरीश महाजन यांचा उध्दव ठाकरे एकीकडे कौतुक करीत असताना खान्देशातील शिवसैनिक मात्र महाजन यांना उघडपणे विरोधी करीत आहे. संपर्कप्रमुख संजय सावंत व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात झालेल्या मेळाव्यात भाजपला १० तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्हा परिषद, महापालिका व पालिकांमध्ये शिवसेनेला वाटा दिला तरच लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला आहे. ही कोंडी आता भाजप-शिवसेनेचे श्रेष्ठी कसे फोडतात, यावर भाजपा उमेदवाराच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव