शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्याला अर्धा भरला आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:23 IST

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

सुखावह जगण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवड केलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, मुंबई व ठाणे या शहरांची निवड होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या शहरांच्या निवडीकरिता सर्वांत महत्त्वाचा निकष होता तो लोकसंख्येचा. प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांवर ही क्रमवारी निश्चित केलेली आहे. गेली काही वर्षे गुजरातच्या आणि तेथील शहरांच्या विकासाच्या कहाण्या ऐकून महाराष्ट्रातील रहिवाशांना न्यूनगंड येऊ लागला होता. मात्र महाराष्ट्रातील शहरे यादीत अव्वल असताना गुजरातमधील एकाही शहराचा यादीत समावेश नाही हे आश्चर्यजनक आहे. आर्थिक विकास, रोजगार, गव्हर्नन्स, इज आॅफ डुर्इंग बिझनेस वगैरे निकषांवर महाराष्ट्रातील राज्यांनी सरस ठरणे अपेक्षित होते. महाराष्ट्राला श्रमाची व व्यापाराची, शिक्षणाची व सामाजिक चळवळींची उज्ज्वल परंपरा आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था अशा अनेक बाबींमध्येही पुणे, नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे या शहरांमधील स्थिती अन्य राज्यांतील शहरांपेक्षा खूप चांगली आहे. केंद्र सरकारने ही स्पर्धा घेताना ढोबळमानाने चार निकष निश्चित केले. त्यातील कोणत्या निकषांना-त्या अंतर्गत बाबींना किती महत्त्व देऊन गुण दिले हेही तितकेच महत्त्वाचे आहे. वानगीदाखल सांगायचे तर आर्थिक उलाढालीत मुंबई, नवी मुंबई ही शहरे स्पर्धेत आघाडी घेणे स्वाभाविक आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळे हा निकष प्रधान असेल तर पुणे अव्वल ठरणे ही काळ्या दगडावरील रेघ असेल. याच स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, प्रदूषण या निकषांवर शहरांची निवड केली गेली असती,तर कदाचित याच शहरांच्या पदरी निराशा आली असती. कचरा वर्गीकरणाबाबत ही शहरे अजून बरीच मागे आहेत. कचराकोंडीमुळे लक्षावधी लोकांची घुसमट होत आहे. या सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी या समस्या भीषण होत आहेत. मागील आठवड्यात मुंबई, ठाण्यात थोडेसे अंतर पार करण्याकरिता लोकांना तासन्तास कोंडीचा सामना करावा लागला. काही मोजके विभाग सोडले तर अनेक शहरांतील अनेक वस्त्यांमध्ये कचरा ही मोठी समस्या आहे. प्रदूषण ही तर या सर्वच शहरांची मोठी डोकेदुखी आहे. त्यातून श्वसनाचे, त्वचेचे व अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे ‘सुखावह’तेचे निकष कोणते त्यावर कोणते शहर बाजी मारणार ते ठरणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘अर्धा प्याला भरला आहे, असंदेखील म्हणता येतं. अर्धा प्याला सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा.’

टॅग्स :newsबातम्या