शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

समाजमनातील अस्वस्थतेचे हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 19:03 IST

एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते

मिलिंद कुलकर्णीहिंगणघाटातील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भररस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न, जळगावातील मानसी बागडे या तरुणीने समाजात घेतले जात नाही आणि त्यामुळे विवाह होत नसल्याने केलेली आत्महत्या, वयोवृध्द आईला घरात डांबून बाहेरगावी निघून गेलेले दोंडाईचातील निवृत्त मुख्याध्यापकाचे कृत्य...या आणि अशा प्रकारच्या सगळ्या घटना समाजमन घुसळून टाकणाऱ्या आहेत. हिंगणघाट, वर्ध्यात रोज निषेधाचे मोर्चे निघत आहेत. मानसी बागडे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया कंजरभाट समाजातील पंच, आजोबा या नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पहिल्या दिवसापासून या प्रकरणात लक्ष घातले असून प्रशासकीय कार्यवाहीकडे डोळ्यात तेल घालून निरीक्षण, पर्यवेक्षण केले जात आहे.या घटना का घडल्या, त्यांच्या कारणांचा शोध, आरोपी व्यक्ती, समूहाची मानसिकता, अनिष्ट रुढी व परंपरांचा असलेला बोजा अशा वेगवेगळ्या मुद्यांवर आता विचारमंथन सुरु आहे. या चिंतन, मनन आणि मंथनाचे स्वागत करायला हवे. निकोप समाजासाठी अशा चर्चेची आवश्यकता आहेच. जेवढ्या खुलेपणाने, मोकळेपणाने ही चर्चा होईल, त्यात समाजातील सर्व घटक सहभागी होतील, तेवढे त्या चर्चेतून निघणारे नवनीत म्हणजे निष्कर्ष हे समाजोपयोगी असे राहतील.एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, आत्महत्या यासंबंधी नेहमी चर्चा होत असते. बहुसंख्य मंडळींचा आक्षेप हा चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिकांवर असतो. तेथे अशा गोष्टी वारंवार दाखविल्या जातात, त्याचा प्रभाव समाजावर होत असतो, असा आक्षेप घेणाºया मंडळींचा दावा असतो. त्यात तथ्य असेलही. पण पूर्णत: दोष मनोरंजन करणाºया माध्यमांना देता येणार नाही. ‘कीर्तनाने समाज घडत नाही आणि तमाशाने बिघडत नाही’ असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. सभोवताली असे प्रकार घडत असताना समाज म्हणून आम्ही मूकदर्शक राहतो, हे मान्य करायला हवे. केवळ दुसºयाकडे बोट दाखवून आपली दोषारोपातून सुटका होणार नाही, हे समाजातील सर्वच घटकांनी लक्षात घ्यायला हवे. शाळकरी मुलांवर संस्कार नाही, उद्याने, मोकळ्या जागा, आडोशाच्या जागांच्याठिकाणी नको त्या गोष्टी सुरु असतात असा सर्वसाधारण चर्चेचा सूर असतो. पोलिसांनी लक्ष द्यायला हवे, निर्भया पथक काय करते, मुलांचे पालक केवळ नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतात, मुलांकडे लक्ष नसते असा लोकमानसातील सूर असतो. असा प्रकार घडत असेल तर जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ते रोखणार नाही का? एकट्याला शक्य नसेल, दोन-पाच व्यक्ती जमवून आम्ही अशा गोष्टींना अटकाव करु शकतो. मुळात तसे करण्याची इच्छाशक्ती हवी. ‘मला काय त्याचे’ अशी बेपर्वावृत्ती धोकेदायक असून अशी वृत्ती असणाऱ्यांचे प्रमाण समाजात वाढत आहे. असा प्रकार आपल्यासोबत किंवा कुटुंबियांसोबत घडला तर मात्र आम्हाला समाजाची मदत अपेक्षित असते. माणुसकी लयाला गेली हो, असा कंठशोष तेव्हा आम्ही करतो. परंतु, दु:खिताच्या, पीडिताच्या जागी स्वत:ला कल्पून आम्ही धावून जायला हवे. परोपकार हा तर आमच्या अध्यात्माचा, संतांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. दुर्देवाने हा विचार केवळ पुस्तक, कीर्तन आणि भाषणापुरती उरला आहे, व्यवहारात आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो.मानसी बागडे या तरुणीने समाजाच्या अशाच प्रवृत्तीला कंटाळून अखेर जीवनयात्रा संपवली. सर्वसामान्य मुलीसारखे तिचे भावविश्व होते. संसार थाटावा, कुटुंब फुलावे, अशी छोटी अपेक्षा तिची होती. तिचा गुन्हा काय, का तिला आत्महत्या करायला भाग पाडले गेले, या प्रश्नांनी सुन्न व्हायला होते. आई-वडिलांनी आंतरधर्मीय विवाह केला. वडिलांचे नाव लावले, मात्र त्यांनी नंतर स्वजातीय महिलेशी दुसरे लग्न केल्याने मानसी व तिच्या कुटुंबियात अंतर आले. वडिलांच्या जातीने स्विकारले नाही. स्वत: आजोबा पंच होते. विवाह निश्चित होत असताना जात पंचायतीने आडमुठी भूमिका घेतली आणि तिचे भावविश्व उध्वस्त झाले.तिकडे दोंडाईचाला वयोवृध्द आईला घरात डांबून निवृत्त मुख्याध्यापक व त्यांची पत्नी दोन दिवस बाहेरगावी निघून गेले. शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर आजीबार्इंची सुटका झाली. किती भीषण घटना आहे. मुलाच्या जन्मासाठी आग्रह धरणाºया समाजाच्या कानशीलात लगावणारी ही घटना आहे. कुठल्या थराला आम्ही जातोय, हे पाहून थरकाप उडतो. वेळीच हे रोखले गेले नाही तर ‘मी माझे’ करणाºया प्रत्येकाच्या दारापर्यंत अशा घटना टकटक करत येतील, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव