शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Coronavirus: स्थलांतर : आपत्ती की इष्टापत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:17 IST

आता हे सर्व मजूर गावी परततील तेव्हा काय होईल? अगोदरच उद्ध्वस्त खेडी आणि त्यात या मजुरांची भर पडेल. हातात असलेले चार पैसे आणि हा उन्हाळ्याचा काळ संपल्यानंतर पुढे काय?

संजीव उन्हाळे, ज्येष्ठ पत्रकारजवळपास दीड महिन्यापासून महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’मध्ये लटकलेल्या परप्रांतीय कामगारांना घेऊन भोपाळ आणि लखनौसाठी नाशिकमधून अखेर दोन रेल्वेगाड्या बाहेर पडल्या. या कामगारांना स्वत:च्या गावी परतण्याचा मार्ग केंद्र सरकारने मोकळा करताच महानगरपालिका आणि पोलीस ठाण्यासमोर अर्जासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या. कोरोनाचे गूढ आणि गावाची ओढ यात कुठेच सोशल डिस्टन्सिंग दिसले नाही. कोरोनाच्या संकटावर आपण कधी विजय मिळवू, हा प्रश्न जसा अनुत्तरित आहे, तसाच प्रश्न गावी गेलेला हा कामगारवर्ग पुन्हा कधी परतेल, हादेखील आहे. आम्ही कोरोना संकटावर विजय मिळवू. उद्योग पुन्हा नव्या दमाने उभारू. शेतीदेखील त्याच दमाने सुजलाम् सुफलाम् करू. प्रश्न यासाठी लागणाऱ्या कामगारांचा असेल. आम्हाला कंपन्यांपासून शेतीच्या मशागतीपर्यंत परप्रांतीयांशिवाय पर्याय राहिला नाही. मग ‘कोरोना’च्या संकटानंतर हा कामगार आणायचा कोठून?

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. रोजगार नाही. राहायला धड जागा नाही. खिशात दिडकी नाही. टाळेबंदीत अंतर ठेवा, तर तेवढा पैसा नाही. जगायला केवळ अन्न लागत नाही. कोरोनाच्या भीतीने गावाची ओढ लागलेली. कोरोना जितका गूढ, तितकीच ही मातीची ओढही गूढ. मुंबईहून गेल्या पंधरवड्यात हे सर्व परप्रांतीय पाठीशी बिºहाड घेऊन निघाले. कोणी सायकलवर, तर बहुसंख्य पायी. आयाबाया, काखेला लेकरू अन् डोक्यावर बॅग. सगळेजण जालन्याकडे जाताना औरंगाबादला थांबले. या एका रात्रीत निघालेल्या श्रमिकांच्या लोंढ्यात तब्बल साडेनऊ हजार मजूर. त्यापैकी २,८०० मध्यप्रदेशचे अन् बाकी झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आदी राज्यांचे. ‘अन्नपाणी नको, आम्हाला जाऊ द्या’ ही त्यांची मागणी. यासाठी त्यांनी अन्नदेखील वर्ज्य केले. शेवटी समुपदेशनासाठी चार-पाच मानसोपचारतज्ज्ञ लावले. केंद्र शासनाने गावी जाऊ देण्याची घोषणा केली, तेव्हा कुठे त्यांना अन्न गोड लागले. कोरोनाच्या भीतीने गावी निघालेले हे मजूर कामाच्या ठिकाणी परतण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. हे सर्व पाहिल्यावर व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ची आठवण येते. जिथे गाव दुष्काळाने बाहेर निघते, तेव्हा एक म्हातारा गावातच ‘मला या मातीतच राहू द्या’ म्हणतो. विश्वास पाटलांनी ‘झाडाझडती’मध्ये विस्थापितांचे दु:ख मांडले आहे, तर अशोक व्हटकर यांच्या ‘७२ मैल’ या कादंबरीत मुला-बाळांना घेऊन सातारा ते कोल्हापूर जाणाºया बाईचे विषण्ण करणारे वर्णन आहे. इथे सोळाशे ते अठराशे किलोमीटर चालत निघालेल्या या परप्रांतीयांची व्यथा तरी वेगळी कुठे आहे?

‘कोरोना’मुळे केवळ समाजव्यवस्थाच नाही, तर अर्थव्यवस्था खोल गर्तेत सापडणार आहे. उद्योगांना आता परप्रांतीय स्वस्त मजूर सहजपणे मिळणार नाहीत. आमची शेतीदेखील या परप्रांतीय मजुरांच्याच हातात गेली आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या संकटानंतर कंपन्यांत आणि शेतात काम करायचे कोणी? फुकट धान्य, मीठ, मिरचीला केंद्राकडून येणारे पैसे, यामुळे कोणतीच कार्यप्रेरणा राहणार नाही. आता उद्योगांना स्वयंचलित यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय दिसत नाही. या घडीला तरी बँका भांडवली गुंतवणुकीसाठी पैसा देण्यास तयार नाहीत. कितीही यांत्रिकीकरण झाले तरी स्टील, खनिज उद्योग, बांधकाम, बी-बियाणे, टेलिकॉम, पॉवर अशा अनेक उद्योगांना लागणारे अकुशल मजूर आणायचे कोठून? पक्षाच्या राजकीय सभा, धार्मिक कुंभमेळे अन् लग्नापुरता हा ‘कोरोना’चा विषय नाही.

जागतिक बँकेने ‘कोविड-१९ क्रायसिस थ्रू मायग्रेशन लेनेन्स’ या अहवालात कोरोनामुळे ४० दशलक्ष मजुरांचे शहरापासून खेड्याकडे स्थलांतर झाले, असे नमूद केले आहे. त्यानुसार प्रामुख्याने भारत आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशांत शोचनीय स्थिती आहे. २०१९ च्या तुलनेत यावर्षी अकुशल मजुरांची मोठी घट होणार आहे. तथापि, या मजुरांना बराच काळ ताटकळत ठेवले, तर ‘कोरोना’ची साथ वाढू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर परप्रांतातून बरेलीत आलेल्या मजुरांच्या अंगावर रासायनिक मिश्रणाने स्प्रेद्वारे संपूर्ण स्नान घालून विषाणूमुक्त करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे.

आता हे सर्व मजूर गावी परततील तेव्हा काय होईल? अगोदरच उद्ध्वस्त खेडी आणि त्यात या मजुरांची भर पडेल. हातात असलेले चार पैसे आणि हा उन्हाळ्याचा काळ संपल्यानंतर पुढे काय? महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा संदेश राज्यकर्त्यांनी कधीच गांभीर्याने घेतलेला नाही. ‘कोरोना’ने ही संधी दिली आहे. परतून आलेल्या या मंडळींनी जग पाहिलेले आहे. त्यांना कधीही वेळेवर पगार न होणाºया ‘मनरेगा’च्या कामाला जुंपणे योग्य होणार नाही. या सर्व मजुरांना गावीच कामाची संधी दिली, तर अमूर्त वाटणारी ‘ग्लोबल व्हिलेज’ची संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. विकासाचे मॉडेल ‘बॉटम टू टॉप’ असेच असायला हवे. मोठ्या प्रमाणावरचे स्थलांतर म्हणजे भांडवलशाहीने केलेली सामान्यांची शोकांतिका आहे. खरं तर परप्रांतीय ‘लॉर्ड आॅफ अवर हँडस्’ आपल्या हाताचे लॉर्ड आहेत. त्या हातांना केवळ संधीची गरज आहे. केवळ ‘मेक इन इंडिया’च्या वल्गना करण्याऐवजी ‘कोरोना’ने दिलेल्या संधीचे सोने करायला हवे. खरे तर वस्तुत: इतके मजूर गावात किंवा स्वत:च्या राज्यात येतात, ही इष्टापत्ती आहे. या संधीला आपत्ती मानायचे की इष्टापत्ती, हे शेवटी राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्यांची ही मानसिकताच आपला भविष्यकाळ ठरविणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या