शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
2
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
3
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
4
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
5
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
6
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
7
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
8
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
9
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
10
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
11
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
12
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
13
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
14
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
15
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
16
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
17
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
18
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
19
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
20
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?

कोरोनाचा नवा ‘अवतार’ : आहे कोण हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 06:58 IST

CoronaVirus News : माणसाच्या शरीरात शिरणे, त्याच्या प्रतिकार क्षमतेवर हल्ला करून त्याला गारद करणे, हे लक्ष्य असलेले आणि यासाठी स्वतःमध्ये जमेल ते बदल करणारे अत्यंत खोडकर, कुख्यात जीव म्हणजे विषाणू!

- सानिया भालेराव(जैवविज्ञान विषयाच्या अभ्यासक) 

गेल्या वर्षभरात आपण कोरोना विषाणूसोबत जगायला, अफवांवर विश्वास न ठेवता जबाबदारीने काळजी घ्यायला शिकलो होतो. तेवढ्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार (स्ट्रेन) सापडल्याची बातमी झळकली आणि परत घबराट उडायला सुरुवात झाली. झाले काय? तर कोरोना  विषाणूमध्ये नवीन प्रकारचे म्युटेशन (उत्परिवर्तन) झाल्याचे पुरावे सापडले. विषाणूमध्ये होणारे म्युटेशन म्हणजे काय? ते होण्यामागची कारणे? ते तसे झाल्यास आजार पसरवण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे या आजारावर तयार करण्यात आलेली लस निकामी होते का? - या सर्व प्रश्नांची ही चर्चा.

माणसाच्या शरीरात शिरणे, त्याच्या प्रतिकार क्षमतेवर हल्ला करून त्याला गारद करणे, हे लक्ष्य असलेले आणि यासाठी स्वतःमध्ये जमेल ते बदल करणारे अत्यंत खोडकर, कुख्यात जीव म्हणजे विषाणू! त्यात SARS COV २ कुटुंबातील सदस्य म्हणजे वेळोवेळी स्वतःमध्ये म्युटेशन घडवून आणणारे महारथी. म्युटेशन (उत्परिवर्तन) म्हणजे काय? - विषाणूंमध्येसुद्धा जेनेटिक मटेरिअल असते. त्यानुसार त्याचे डीएनए आणि आरएनए विषाणू, असे वर्गीकरण केले जाते. हे जेनेटिक मटेरिअल म्हणजे न्यूक्लिओटाइडस्‌ची विशिष्ट क्रमाने लावलेली रांग.  

चार अमिनो ॲसिडस्‌चे ठोकळे एका विशिष्ट क्रमात जोडले की, या विषाणूंचा जीनोम तयार होतो. समजा हे चार ठोकळे आहेत अ, ब, क आणि ड, तर जेव्हा ‘अ’ला दिलेली जागा उडी मारून ‘ड’ पटकावतो तेव्हा या ठोकळ्यांचा क्रम बदलतो. त्यामुळे या विषाणूच्या जीनोमवर परिणाम होतात. हा क्रम बदलणे म्हणजे म्युटेशन. मग प्रश्न असा, हा विषाणू जर  व्यवस्थितरीत्या आजार पसरवतो आहे, तर याला काय गरज आहे म्युटेशन करून नसते उद्योग करायची? - विषाणूचे सगळ्यात पहिले मिशन म्हणजे माणसाच्या शरीरात शिरणे! कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात शिरतो तेव्हा त्याचे लक्ष्य असते स्वतःची आरएनए मोकळी करणे, त्याच्या कॉपीज करणे आणि होस्टची प्रतिकारशक्ती निकामी करून आजार पसरवणे. या विषाणूची आरएनए गुंडाळलेली असते एका पाकिटामध्ये. या पाकिटाचे बाहेरचे आवरण असते ग्लायकोप्रोटिन्सचे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात स्पाइक प्रोटिन्स (म्हणजे तेच ते कोरोनाच्या चित्रात दिसणारे भाले अथवा काटे). कारण या स्पाइक प्रोटिन्सच्या साहाय्यानेच हा विषाणू आपल्या फुप्फुसामधील सेल्सला चिकटतो. या सेल्समध्ये ACE २ नामक रिसेप्टर असतात, ज्यांच्यावर हे स्पाइक प्रोटीन बांधले जातात.

एकदा का हा विषाणू या सेल्सवर जोडला गेला की, मग इतर संप्रेरक याच्या पाकिटाचे आवरण फोडतात आणि एंडोसायटोसिसच्या माध्यमातून कोरोना विषाणूची आरएनए आपल्या शरीरात शिरते. मग आपल्या पेशींमधील मशिनरीच्या साहाय्याने कोरोना विषाणू स्वतःच्या आरएनएच्या कॉपीज बनवायला लागतो आणि अशा तऱ्हेने आपल्या शरीरात हा आजार पसरतो. म्हणजे, कोरोना विषाणूची बरीचशी मदार ही या स्पाइक प्रोटीनवर अवलंबून आहे. आपल्या सेल्समधील ACE २ रिसेप्टरच्या रचनेशी साधर्म्य साधणारा सिक्वेन्स या स्पाइक प्रोटिन्सवर आणणे हा या विषाणूचा उद्देश.  हा विषाणू आहे SARS COV या विषाणूंच्या जातकुळातील. SARS नामक हे  फ्लूचे (इन्फ्लुएंझा) विषाणू  फार बदमाश असतात. जेव्हा हे विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा आपली प्रतिकारशक्ती  या विषाणूंच्या विरोधात ॲन्टिबॉडीज तयार करायला सुरुवात करते आणि मग फुप्फुसामधील ACE २ रिसेप्टरशी  बाइंड करण्याची स्पाइक प्रोटिन्सची क्षमता कमी होते आणि हा विषाणू निकामी पडायला लागतो.

आता सर्व्हायव्हल इंस्टिक्टनुसार हा विषाणू आपल्या स्पाइक प्रोटिन्सच्या रचनेमध्ये बदल करायला बघतो आणि अमिनो ॲसिडस्‌च्या ठोकळ्यांच्या क्रमात बदल करतो. त्याबरोबर स्पाइक प्रोटिन्सच्या सिक्वेन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील ॲन्टिबॉडीज आता या नवीन स्पाइक प्रोटीनला ओळखू शकत नाहीत! मग हा विषाणू अधिक जोमाने आजार पसरवण्यासाठी मोकळा होतो. अशा पद्धतीने स्पाइक प्रोटीनमध्ये म्युटेशन होतात आणि आपण नवीन विषाणूचा स्ट्रेन किंवा अवतार आला, असे म्हणतो. कोरोना विषाणूचा जो  नवीन स्ट्रेन (N501Y) ब्रिटनमध्ये सापडला आहे, त्यात म्युटेशन हे स्पाइक प्रोटीनमध्ये झाले आहे, असे तूर्तास म्हटले जातेय. कोरोना विषाणूमध्ये आजपर्यंत जवळपास तीस ते पस्तीस छोटेखानी म्युटेशन्स झाली आहेत, त्यापैकी दोन म्युटेशन्स महत्त्वाची! यातील एक म्हणजे D६१४G म्युटेशन, ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला; पण मोन्टेफिऑरी या ड्यूक विद्यापीठातील एड्स रिसर्च इन्टिट्यूटच्या डायरेक्टरपदी काम करणाऱ्या सायंटिस्टने केलेल्या रिसर्चनुसार या म्युटेशनमुळे कोरोना विषाणूवरील परिणामकारक लस बनवणे सोपे झाले.

आजवर या विषाणूने स्वतःमध्ये केलेले बदल आणि या म्युटेशन्सचा अर्थ, परिणाम यावर उत्तम रीतीने वैज्ञानिक चर्चा सुरू झालेली आहे, होते आहे आणि यावर रिसर्च पेपर्स प्रकाशित होत आहेत. कोरोना विषाणू हा जरी स्वतःचा बचाव करण्याकरिता आणि स्वतःला अधिक शक्तिशाली बनवण्याकरिता म्युटेट होत असला तरीही त्याचे प्रत्येक म्युटेशन मानवजातीला धोका निर्माण करील असे नव्हे. या विषाणूमधील इटुकल्या पिटुकल्या बदलामुळे दरवेळी घाबरून जायला नको. इन्फ्लुएंझा परिवारातील विषाणूंवर लस बनवली जाते तेव्हा म्युटेशन्सचा अंदाज शास्त्रज्ञांना असतोच. स्पाइक प्रोटिन्समध्ये होणारे संभाव्य बदल लस तयार करताना गृहीत धरलेले असतात. ब्रिटनमधील या नवीन कोरोना विषाणूच्या स्ट्रेनमध्ये आजार पसरवण्याची, आजाराची लक्षणे गंभीर करण्याची किती क्षमता आहे, याबाबत ठोस विधान करण्यासाठी लागणार सायंटिफिक डेटा आणि अनॅलिसिस तूर्तास तरी अपुरे आहे.

सार्स या कुटुंबातील विषाणू जे मुख्यत: श्वसनाचे आजार पसरवतात, त्याच्यामध्ये म्युटेशन होणे ही अत्यंत नैसर्गिक  बाब आहे. म्हणूनच कोरोना विषाणूचा नवीन संकरित अवतार आला तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. विषाणू म्युटेट होत राहाणे हा त्याच्या जीवनचक्राचा भाग आहे. योग्य ती काळजी घेतली, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवले,सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून आखून दिलेले नियम, सूचनांचे पालन केले, विज्ञानाची कास धरून उपाययोजना केली, तर आपण नक्कीच यातून बाहेर पडू, असा विश्वास आपण सगळ्यांनीच बाळगायला हवा.(saniya.bhalerao@gmail.com)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या