शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

Corona Vaccination: खरे सांगा, सगळ्यांना लस कधी मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 05:36 IST

भारत सरकार सांगते की, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होईल; पण आकडे काही वेगळेच सांगतात! नागरिकांनी सरकारवर विश्वास कसा ठेवावा?

-  विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहडिसेंबरपर्यंत संपूर्ण देशांत लसीकरण होईल असे सतत सांगितले जात आहे आणि सरकारच्या या दाव्यावर सामान्य माणसाचा विश्वास बसेल, अशी परिस्थिती नाही. एकतर लसीच्या उपलब्धतेबद्दलचे आकडे पारदर्शी नाहीत आणि लस-उत्पादनाच्या गणिताचा सरकारी दाव्यांशी अजिबातच ताळमेळ नाही. तसे असते, तर  शंकेला जागा राहिली नसती. संपूर्ण देशाचे कोरोना- लसीकरण कधी पूर्ण होईल, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. डिसेंबरपर्यंत हे काम होईल, असा दावा सरकार करत असले तरी विरोधी पक्ष आकड्यांचा आरसा समोर धरत आहेत. नेमके काय चाललेय याबद्दल सामान्यजनांच्या मनात असंख्य संभ्रम आहे. डिसेंबरपर्यंत आपला नंबर लागेल का? याविषयी प्रत्येकाच्या मनात शंका आहे. असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगत असतो, मित्रहो, आपल्या सरकारवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. 

पंतप्रधान किंवा त्यांचे मंत्री काही म्हणत असतील तर त्यामागे त्यांची काही तयारी असणारच. या सदरात मी आधी अनेकदा लिहिलेले आहे, की पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचे नसतात; तर ते साऱ्या देशाचे असतात आणि देशहिताचा विचार करतात. आजही माझा यावर विश्वास आहे; पण वास्तव गुंतागुंतीचे आहे, हे तर खरेच! अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमोर योग्य आणि सटीक माहिती ठेवली पाहिजे. सरकारकडून येणाऱ्या माहितीला आकड्यांनी दुजोरा दिला पाहिजे. जुलै महिन्यात दररोज एक कोटी लसी देणार  असे सरकार म्हणते, म्हणजे महिन्याला ३० कोटी मात्रा कोठून आणणार,  असा प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनात आहे. तो योग्यच, कारण आकडे तेच सांगत आहेत. १८ च्या वर वय असलेल्या ९० कोटी नागरिकांना लस द्यायची तर १८० कोटी मात्रा लागतील असे एक गणित आहे.
आतापर्यंत एकूण दिल्या गेलेल्या मात्रांची बेरीज २३ कोटीही झालेली नाही. सिरम इंडिया सध्या दरमहा कोविशिल्डच्या ६.५ कोटी मात्रा तयार करत आहे. जुलैपर्यंत ही संख्या १० कोटींपर्यंत जाईल, असे आपण घटकाभर मान्य करू. भारत बायोटेकची क्षमता सध्या दरमहा २.५ ते ३ कोटी आहे आणि ऑक्टोबरपर्यंत ती ६ कोटींपर्यंत जाईल, अशी आशा करू. यात भविष्यात स्पुतनिक आणि इतर कंपन्यांच्या लसी मिळवल्या तरी हा आकडा दरमहा २० कोटींपेक्षा जास्त होत नाही आणि चीनची लस तर आपण घेणार नाही. कारण त्यावर आपला विश्वास नाही. माहीत नाही, त्यात ते काय भेसळ करतील आणि दीर्घ कालावधीनंतर आपल्या ते लक्षात येईल. सरकार दुसऱ्या देशातील कंपन्यांकडूनही लस खरेदी करू म्हणत असले तरी या कंपन्या आपल्या गरजेनुसार पुरवठा करतील याची खात्री कोण देणार? या कंपन्यांनी आधी अन्य देशांना लस पुरवण्याचे करार केलेले आहेत आणि हे करार जेव्हा झाले, तेव्हा भारताने आपली मागणी नोंदवलेली नव्हती... डिसेंबरपर्यंत सर्वांना लस मिळेल यावर विश्वास ठेवता येणे कठीण आहे.
अशा स्थितीत कोणी काही दावा केला तर संशय उत्पन्न होणे स्वाभाविकच मानले पाहिजे. सामान्य नागरिकांसमोर सरकारने पारदर्शी आणि वास्तव चित्र ठेवले पाहिजे; तसे झाले तरच नागरिक प्राप्त परिस्थितीला धैर्याने सामोरे जातील... निदान तशी तयारी तरी ठेवतील. आज लोकांना लस हवी आहे आणि ती मिळत नाही. अशा परिस्थितीत कुणाचाही धीर सुटणारच! महाराष्ट्रात तर १८ ते ४५ या वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरण जवळपास थांबले आहे. जिथे होते आहे, तिथे नंबर लागणे कठीण झाले आहे. स्लॉट बुकिंग कधी सुरू होते तेच कळत नाही. सगळा गोंधळ उडाला आहे! ४५च्या पुढच्या लोकांनाही लस मिळण्यात अडचण येत आहेत. स्वत: डॉक्टर असलेले भाजपचे  एक खासदार दुसऱ्या मात्रेसाठी धावपळ करताना मी पहिले आहेत. आता हा स्तंभ मी लिहीत असतानाही त्यांच्या इस्पितळाला दुसऱ्या डोससाठी लस मिळालेली नाही. थोरामोठ्यांची ही कथा, तर सामान्य माणसाचे काय होत असेल, याचा विचार करा. केंद्र सरकार काही प्रमाणात राज्यांना लस देत आहे. बाकी लसमात्रा राज्यांनी थेट खरेदी करायच्या आहेत; पण बाजारात लस उपलब्धच नसेल तर राज्ये तरी कोठून घेणार? परिणामी, बहुतेक राज्यांत तरुणांचे लसीकरण थांबलेले आहे. दुसऱ्या लाटेने नेमके तरुणांना शिकार केले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.
लसीकरणाच्या बाबतीत सरकारची हाताळणी पुरेशा गांभीर्याने झालेली नाही, सरकार  कमी पडले असे लोकांना वाटत असेल तर ते वास्तव आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान खाली गेली आहे. प्रारंभी भारताने शेजारी देशांना लस पाठवली. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत अन्य देशांनाही लस पाठवली जाणार होती; पण भारत आता ती पाठवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला प्रतिष्ठा आहे हे लक्षात घ्या. जगाला नेतृत्व देऊ शकेल अशा दृष्टीने आपल्या देशाकडे पहिले जाते. ‘भारत वीस कोटी डोसचे वचन पुरे करू शकत नाही’ हे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणावे ही वेळ का आली? कुठे तरी काही तरी चुकलेले आहे, हे नक्की! बदलत्या परिस्थितीचा सटीक अंदाज आपल्याला घेता आला नाही.जे झाले ते गेले, निदान आता तरी लस उपलब्धतेच्या बाबतीत भारत सरकारने खरे काय ते सांगावे, संपूर्ण पारदर्शक व्यवहार करावा, अशी अपेक्षा आहे. कोरोनाविरुद्ध खरी लढाई सामान्य माणूस लढत असल्याने त्याला सत्य कळलेच पाहिजे. माहितीची स्पष्टता असेल तर त्यानुसार नागरिकांना निदान तयारी तरी करता येईल. ग्रामीण भागात अंधविश्वासाचा आधार घेऊन लसीकरणाबाबत वाट्टेल ते समज पसरत चालले आहेत! या गैरसमजुती  निपटून लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. कारण कोरोनाविरुद्धच्या लढाईत कमजोर होणे, हार पत्करणे आपल्याला परवडणारे नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या