शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : गांभीर्य हरवू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST

मिलिंद कुलकर्णी एखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी ...

मिलिंद कुलकर्णीएखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी मुकाबला करता येईल, असे तत्त्व सांगितले जाते. त्यात तथ्यांश आहे. परंतु, हे करीत असताना संकटाविषयीचे गांभीर्य कायम राहील, उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, सतर्क आणि सजग राहणे आवश्यक आहे, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनासंदर्भात सार्वजनिक आणि वैयक्तीक जीवनातील आमचे वर्तन आणि समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती पाहिली तर कुठे तरी गांभीर्य हरवत आहे, असे निश्चित वाटते.चिनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. भारत हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा देश असल्याने या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा धोका आपल्याला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक देशांशी विमानसेवेद्वारे थेट दळणवळण आहे. त्यामुळे महाराष्टÑात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाण त्यात जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने आणि प्रभावीपणे पावले उचलली आहेत.नागरिक म्हणून आता आमची जबाबदारी आहे की, हा आजार आणखी पसरु नये, वाढू नये. त्यादृष्टीने गर्दी होईल, अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. रेल्वे आणि एस.टी.च्या फेऱ्या कमी करुन शासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच प्रवास करावा म्हणून बाध्य केले आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल, शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा उद्देश सामूहिकरीत्या संसर्ग होऊ नये, हाच आहे. आठवडेबाजार बंद ठेवायचा असतानाही जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा आठवडे बाजार बुधवारी भरला. गर्दी कमी होती, पण बाजार भरलाच. नियम, निर्बंध आम्ही पाळायचे नाही, आणि साथ पसरली तर शासनाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस, औषधांवर संशोधन सुरु आहे. रामबाण उपाय अद्याप सापडलेला नाही. हे सगळेच देश सांगत असताना आम्ही मात्र काही देशी उपायांचा प्रचार आणि प्रसार करुन काय साध्य करु इच्छितो हे कळायला मार्ग नाही. समाजमाध्यमांचा यासाठी दुरुपयोग केला जात आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि संदेश तयार करुन दिशाभूल केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही ठळक बाबी स्पष्ट केल्या असताना असे घडत आहे.मास्क आणि सॅनिटायझरची अचानक टंचाई होणे हे स्वाभाविक आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे असे घडू शकते. परंतु, त्याची उपलब्धता होण्यासाठी काही प्रयत्न होणे, पर्याय उपलब्ध होणे यासाठी हालचाली दिसून येत नाही. टंचाई निर्माण झाली की, स्वार्थी मंडळी त्याचा काळाबाजार करतात. यापेक्षा रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा यांनी पर्यायी जंतुरोधक द्रव्य उपलब्ध करण्यास काही हरकत नाही. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे या बाबी क्लिष्ट असल्याने कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.भारतीय संस्कृती आणि पुराणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असा दावा प्रत्येकवेळी करण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. विज्ञानाचा आधार, प्रयोगातून सिध्द झाल्याचा पुरावा असे काहीही न देता भारतीय पुराणात म्हटले आहे, म्हणजे ते खरेच असे हटवादीपणे म्हटले जाते. कोरोनाचे भाकीत ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे संदेश असेच प्रसारीत होत आहेत. कधी ते संत तुकारामांचे म्हटले जाते तर कधी रामदास स्वामींचे म्हटले जाते. अशा प्रकारांमधून घटनेचे गांभीर्य कमी होते, हे जितक्या लवकर आम्हाला कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल. 

टॅग्स :Jalgaonजळगाव