शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:23 IST

सहकारातील नोकरभरतीवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण नाही. मात्र, ही नोकरभरती पारदर्शीपणे होण्यासाठी सरकार व नाबार्ड या दोघांनीही ठोस निकष ठरविण्याची

- सुधीर लंकेसहकारातील नोकरभरतीवर सध्या राज्य सरकारचे नियंत्रण नाही. मात्र, ही नोकरभरती पारदर्शीपणे होण्यासाठी सरकार व नाबार्ड या दोघांनीही ठोस निकष ठरविण्याची गरज आहे. खासगी संस्थांमार्फत होणारी भरती उमेदवारांना विश्वासार्ह वाटत नाही. सहकार हा जनतेतूनच उभा राहिला. पण, सहकाराला सरकारचे सर्वच नियम आज लागू होत नाहीत. सहकार क्षेत्राला सरकारचे निर्बंध पाळावे लागतात. पण, काही बाबींमध्ये या क्षेत्राला स्वायत्तता आहे. उदाहरणार्थ सहकारी संस्था या थेट शासकीय आस्थापना नसल्याने त्यांना माहिती अधिकार कायदा लागू होत नाही. सहकारी संस्था आपली नोकर भरती आपल्या स्तरावर करतात, हाही त्यांच्या स्वायत्ततेचा एक भाग आहे. पण, या नोकरभरतीबाबत सहकारातील सर्वच प्रमुख बँकांनी एकत्रित येऊन काही धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी नुकतीच सातारा जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार बँकेचे काही संचालक व आमदारांनीच केली. या तक्रारी थेट सहकार मंत्र्यांपर्यंत गेल्या. सध्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सुरू आहे. लिपिक, वरिष्ठ अधिकारी अशा ४६५ जागांसाठी राज्यभरातून १७ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. बेकारीचे प्रमाणच प्रचंड असल्याने अर्जांचा हा पाऊस पडणे अपेक्षितच होते. या भरतीची परीक्षा अजून व्हावयाची आहे. मात्र, तत्पूर्वीच शंकांचे काहूर उठले आहे. जिल्हा बँकांना खासगी संस्थांची मदत घेऊन आपली भरती प्रक्रिया राबविता येते असे नाबार्डचे धोरण आहे. नाबार्डने पाच संस्थांची यादीही जिल्हा बँकांना पुरवली आहे. त्या संस्थांच्या आधारे बँका आपली भरती प्रक्रिया राबवितात. मात्र, तरीदेखील सातारा येथील भरतीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला. नगरला जी भरती होणार आहे, त्या भरतीत उमेदवारांना परीक्षा संपताच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी मिळावी, अशी मागणी झाली आहे. बँकेच्या धोरणानुसार मात्र उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार नाही. राज्य लोकसेवा आयोग व सर्वच परीक्षांमध्ये आता उमेदवारांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची प्रत देण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे आपणाला किती गुण मिळू शकतील, याची पडताळणी उमेदवाराला करता येते. त्यातून बराचसा संशय दूर होतो. लेखी परीक्षेनंतर ज्या मुलाखती होतात, त्यातही गडबडी होतात. त्यामुळे वर्ग तीनच्या पदांसाठी तर लेखी परीक्षा घेण्याची पद्धतच आता काही शासकीय विभागांनी बंद केली आहे. जेणेकरून संशयाला जागा नको. नाबार्डनेही सहकार क्षेत्रातील सर्व बँकांच्या भरतीबाबत असे ठोस निकष ठरविण्याची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्र हे थेट राजकारण्यांच्या नियंत्रणात आहे. बँकेचा कार्यकारी संचालक कोण हवा, इथपासून सर्व बाबी या बँकांचे संचालक मंडळ ठरविते. संचालक मंडळच मुलाखती घेते. सहकार क्षेत्रातील उपनिबंधक या बैठकांना असतात, पण त्यांनाही मर्यादा पडतात.सहकारी बँकांतील भरती प्रक्रियेत थेट संचालकांना ‘कोटा’ ठरवून देऊन भरती प्रक्रिया राबविली जाते, असा जनतेचा समज आहे. काही बँकांत यापूर्वी असे प्रकार घडलेही आहेत. संचालकांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन भरती केली. शासकीय भरती प्रक्रियेबाबत व राष्ट्रीयकृत बँकांतील भरती प्रक्रियेबाबत जो एक विश्वास निर्माण झाला आहे, तसाच विश्वास सहकार क्षेत्रातील भरतीबाबतही निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी या बँकांनीच एकत्रित येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्यपातळीवर भरतीसाठीचेच एखादे बोर्ड करुन त्याआधारेही सहकारातील सर्व बँकांची भरती प्रक्रिया राबविता येणे शक्य आहे. राज्य सरकारने यावर्षी अनुदानित शाळांची भरती प्रक्रिया खासगी संस्थाचालकांकडून काढून आपणाकडे घेतली. संस्थाचालक आपल्या मर्जीतील उमेदवारच निवडतात, त्यात गुणवंतांना डावलले जाते, असा मुख्य आक्षेप संस्थाचालकांबाबत आहे. असाच आक्षेप सहकार क्षेत्राबाबत आहे. सरकार व सहकार क्षेत्र या दोघांनाही याबाबत विचार करावा लागेल.