शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मेंदूचे गूढ उकलण्यात अपघाताचाही हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 05:03 IST

‘‘जोपर्यंत मेंदू गूढ आहे, तोपर्यंत हे विश्वदेखील गूढ राहील,’’ असे १९व्या शतकात रेमॉन कजाल या शल्यचिकित्सकाने म्हटले आहे.

-रचना पोतदार-जाधव‘‘जोपर्यंत मेंदू गूढ आहे, तोपर्यंत हे विश्वदेखील गूढ राहील,’’ असे १९व्या शतकात रेमॉन कजाल या शल्यचिकित्सकाने म्हटले आहे. मेंदूचे हे गूढ उकलण्यात अनेक व्यक्तिंनी आपला हातभार लावला तसाच अपघातांनीसुद्धा. त्याचं झालं असं की, १५० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या न्यू इंग्लंड या राज्यात एक विचित्र रेल्वे अपघात झाला आणि या अपघाताने मेंदूबद्दल नवीनच ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले.१३सप्टेंबर, १८४८ रोजी दुपारी ४.३०च्या सुमारास व्हर्मोंमधल्या कॅव्हेंडिशपासून साधारण पाऊण ते एक मैलावर रेल्वेचे रूळ टाकण्याचे काम जोरात चालू होते. तिथे अनेक कामगार काम करीत होते आणि त्या सर्वांचे नेतृत्व करत होता ‘फिनिआज गेज’ हा अत्यंत मेहनती माणूस. याच कामाचा भाग म्हणून ते डोंगरातून रेल्वे रुळांसाठी जागा तयार करत होते आणि यासाठी त्यांना मोठे स्फोट करावे लागत होते. एके दिवशी अशाच एका स्फोटकाचा विक्षिप्तपणे स्फोट झाला आणि सहा किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या उघड्या असणाऱ्या तोंडातून खालच्या जबड्यातून गालाच्या हाडांना फॅक्चर करून, वरच्या जबड्यात घुसून डाव्या डोळ्याच्या मागून वर डाव्या मेंदूला क्षतिग्रस्त करून, कवटीच्या वरील बाजूसभोक पाडून वर आला. या स्फोटामुळे गेज उडून दूरवरच्या खड्ड्यातजोरदार आदळला आणि बराच वेळ विव्हळत निपचीत पडून राहिला. अपघाताची तीव्रता आणिगेजची विचित्र अवस्था बघता तो आता जगेल अशी आशाच कोणाला वाटत नव्हती. तो आता मरणारच या विचाराने, थॉमस विन्स्लो या शवपेट्या तयार करणाºया व्यक्तीने गेज जिवंत असतानाच त्याच्या शरीराचं मोजमाप घेतलं होतं.याच दरम्यान तिथून जाणाºया ख्रिस्तोफर गुडरीच या माणसानं जखमी गेजला आपल्या बैलगाडीत ठेवून १२ किमी अंतरावर असलेल्या एका खोलीवर नेवून ठेवलं. त्या दरम्यान गेजच्या हातापायाला काही वेळापुरते झटके येऊन गेले, पण काही मिनिटांतच गेज पुन्हा बोलू लागला. साधारण ३० मिनिटांनंतर एडवर्ड विल्यम्स वैद्याने त्याला तपासले. साधारण ६च्या सुमारास जॉन हार्लो शल्य चिकित्सकाने विल्सम्सच्या मदतीने गेजवर उपचार सुरू केले. त्या वेळी गेज पूर्ण शुद्धीत होता अणि म्हणत होता की, त्याला आशा आहे की, त्यास खूप इजा झालेली नाही. परंतु रक्तस्रावामुळे तो खूप अशक्त झालेला होता. दोन्ही डॉक्टरांनी मिळून त्याच्या डोक्यातील लोखंडी दांडा बाहेर काढला. रक्ताच्या झालेल्या गुठळ्या, छोटे हाडांचे तुकडे आणि मेंदूचा ३० ग्रॅम इतका बाहेर आलेला भाग बाहेर काढल्यानंतर हॅर्लोने कवटी बंद केली आणि काही भाग डेÑनेजसाठी उघडा ठेवला; आणि त्यानंतर त्यावर पट्टी करण्यात आली.गेजवरील उपचारांच्या १२ दिवसांनंतर तो थोडाच बोले. एका शब्दात बोले. कोणी विचारलं की त्रोटक एक दोन शब्दात उत्तर देई. कुटुंब आणि त्याच्या मित्रमंडळींना आता तो पूर्वीसारखा जगेल आणि वागेल का याविषयी शंका वाटू लागली. पण साधारण एका महिन्यानंतर तो उठून चालू लागला. पायºया वर-खाली चढू लागला.२५ नोव्हेंबरला साधारण अपघाताच्या १० आठवड्यांनंतर तो त्याच्या कुटुंबाकडे घरी न्यू हॅम्पशायर, लेबनॉन येथे परतला. अपघाताने अशक्त, बारीक झालेला गेज क्वचित लहान मुलासारखा वागू लागला. त्याच्या आईला त्याच्या स्मृतीतही फरक पडल्याने जाणवू लागले होते. पूर्वीचा लाजाळू, नीटनेटका, मनमिळावू, शांत, प्रेमळ इतरांना मदत करणारा समजूतदार गेज आता मात्र हट्टी, रागीट, हेकेखोर, विक्षिप्त, कोणाहीकडे आपली लैंगिक इच्छा व्यक्त करणारा असा परिवर्तीत झाला होता.असे कसे बरे झाले? अपघातानंतर शारीरिक क्षमता पूर्वपदावर आल्या होत्या. परंतु गेजच्या मानसिक क्षमता आणि त्याचं व्यक्तिमत्त्व मात्र आंतरबाह्य बदलून गेलं.त्यानंतर तो उणेपुरे १२ वर्षे आयुष्य जगला. मात्र त्यादरम्यान त्याला फेंफरं येऊ लागली. त्याच्या बदललेल्या व्यक्तिमत्त्वामुळे, वर्तनामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचे सामाजिक आयुष्य अस्थिर झाले. अनेक नोकºया गमवाव्या लागल्या. त्याचे मित्र त्यास आता हा गेज राहिलेला नाही, असे म्हणू लागले. सततच्या येणाºया फेफºयांनी २१ मे १८६० रोजी त्याचा मृत्यू झाला.या अपघाताने मेंदू आणि मन यात एका नव्या शक्यतेची सुरुवात आणि चर्चा सुरू केली ती म्हणजे सेरेब्रल लोकलायझेशन आणि ही पहिली नोंदलेली घटना ठरली. ज्यात माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात आणि बिघडवण्यातही मेंदूचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मेंदूच्या विशिष्ट भागास इजा झाल्यास माणसाच्या व्यक्तिमत्त्व बदलास सुरुवात होते. या अपघातानंतर झालेल्या बºयाच चर्चा, प्रयोग, संशोधनानंतर मेंदू विज्ञान या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, मानवी स्वभावातील विविध पैलूंसाठी नियंत्रण आणि समन्वय साधण्यासाठी मेंदूत निरनिराळे भाग असू शकण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेंदूच्या निरनिराळ्या भागांत क्षमतांची केंद्रे विखुरलेली तर कधी केंद्रित झालेली असू शकतात का, या शक्यतांवर संशोधन सुरू झालं. या मेंदू विज्ञानातील नावीन्यपूर्ण दालनाविषयी पुढच्या लेखात.