शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

घर घेताना तिथल्या हवा-पाण्याच्या दर्जाचा विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 08:33 IST

एखाद्या शहरातल्या हवा-पाण्याच्या दर्जानुसार तिथल्या घरांच्या किमती ठरायला हव्यात, असा विचार ‘झिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांनी मांडला आहे.

संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

आपण जेव्हा कधी मोठ्या शहरात नवे घर विकत वा भाड्याने घेण्याचे ठरवतो, तेव्हा किती विचार करतो?  आपल्याला परवडेल अशा किमतीत घरे जिथे आहेत, त्या जागा शोधतो. त्यानंतर ते घर रेल्वे स्टेशन, बस स्टॉपपासून जवळ आहे का,  दुकाने, शाळा, कॉलेज, रुग्णालय, रेस्टॉरंट, मंडई, औषधाचे दुकान, दवाखाना आसपास आहे का, हे पाहतो. शिवाय  पार्किंगची सोय, रस्ते, लोकवस्ती कशी आहे, हेही विचारून घेतो. जवळपास कारखाने, घाणेरडी गटारे, कचरा आणि झोपडपट्टी असेल, तर  तिथे घर घेण्याचे टाळतो. त्यात काहीही गैर नाही. अनेक जण तर त्या वसाहतीत कोणती भाषा बोलणारे वा कोणत्या जाती-धर्माचे लोक राहतात, याचीही बारकाईने चौकशी करतात.  

हे सारे करण्यामागे जीवन सुसह्य, आनंददायी किंवा कमीत कमी त्रासदायक व्हावे, हा प्रयत्न वा इच्छा असते. आपली नोकरी, पगार, मुले या हिशेबाने प्रत्येकाला चांगले, सुखी जीवन हवे असते. मग त्यासाठी घरात एअर कंडिशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, शक्यतो स्मार्ट टीव्ही, कराओके, उत्तम साऊंड सिस्टीम, घराला द्यायच्या रंगांच्या शेड, चांगले मोबाइल व कार, वॉर्डरोब यासह काय काय हवे, याचीही यादी केली जाते. एकूणच ज्याला उत्तम दर्जाचे जीवन म्हटले जाते, त्याचा सर्वांनाच ध्यास असतो. मध्यवर्गीय लोक वा एकूणच सामान्य लोक आयुष्यात शक्यतो एकदाच घर विकत घेतात, त्यामुळे हे सारे केले जाते. इतका सारा विचार आपल्यापैकी बहुदा प्रत्येक जण करत असणार वा तो पूर्वी केला असणार.  बांधकाम व्यावसायिकही घरांच्या जाहिराती करताना काय-काय नागरी सुविधा तिथे आहेत आणि फ्लॅट लवकर बुक केल्यास किंमत किती कमी करणार हे नमूद करतात. 

पण आपण जिथे घर घेणार आहोत वा ते घेतले आहे, तेथील हवेची गुणवत्ता कशी आहे, तिथे स्वच्छ हवा मिळते की प्रदूषित, हा विचारही आपल्या मनात अजिबात म्हणजे अजिबातच येत नाही. दिल्लीतील हवा फार वाईट आहे, तिथे केवळ थंडीतच नव्हे, तर वर्षाचे बारा महिने प्रदूषण असते, हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे बरे झाले, आपल्याला तिथे राहण्याची वेळ आली नाही, असे बोलून दाखवतो. पण मुंबई, बंगळुरू या शहरांची स्थितीही तितकीच वाईट आहे. जितक्या सुविधा अधिक तितकी घराची किंमत अधिक असे गणित असेल, तर जिथे प्रदूषण अधिक वा हवेची गुणवत्ता म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स वाईट तिथे घरांच्या किमती कमीच असायला हव्यात की! हा विचार आपण करत नसलो तरी रिअल इस्टेट व्यवसायातील झिरोधा या बड्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी सुरू केला आहे.

स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी विविध प्रयोग करणारे ब्रायन जॉनसन यांच्या एका ताज्या वक्तव्यानंतर ही बाब त्यांचा लक्षात आली. ब्रायन जॉनसन हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. नितीन यांचे बंधू निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत द्यायला आलेले जॉनसन बंगळुरूमध्ये तोंडाला मास्क लावून बोलत होते आणि अचानक संभाषण थांबवून त्या स्टुडिओतून ते निघून गेले. इथे भयंकर प्रदूषण आहे, असा शेराही त्यांनी जाताना मारला. या घटनेची बरीच चर्चाही झाली. नितीन कामत यांच्या लक्षात आले की केवळ दिल्लीत नव्हे, तर बंगळुरूमध्येही प्रचंड प्रदूषण आहे आणि वांद्र्यात समुद्रासमोरील भागातही हवेचा दर्जा कमालीचा खराब असतो.

खराब व प्रदूषित हवेमुळे लोकांना श्वसनाचे आजार होतात आणि काहींना, तर कर्करोगही होतो, याचा उल्लेख कामत यांनी सोशल मीडियावर केला आहे. ते लिहितात की, वांद्रे समुद्रकिनारा वा बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये हवेचा दर्जा खराब असूनही घरांच्या किमती चढ्या आहेत. पण, हवा व पाण्याचा दर्जा आणि घरांच्या किमती यांची सांगड घालणे आवश्यक आहे. जिथे दर्जा वाईट, तिथे घरांच्या किमती कमी असाव्यात आणि जिथे तो उत्तम आहे, तिथे लोकांनी राहायला यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  नितीन कामत यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात येईल का कोणास ठाऊक, पण किमान आपण घर घेताना हा मुद्दा लक्षात घ्यायलाच हवा.

sanjeevsabade1@gmail.com