शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मोठ्या गाजावाजामागील चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:03 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आपल्या नव्या अवतारात दिसले तर गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बदलाचे संकेत मिळत आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आपल्या नव्या अवतारात दिसले तर गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बदलाचे संकेत मिळत आहेत. भाजपा भलेही विधानसभेच्या १६ जागांवरील आपले नुकसान लपविण्यासाठी मते १.२५ टक्क्यांनी वाढल्याचा आनंद साजरा करीत असेल. पण २०१९ ची लोकसभा निवडणूक सोपी नाही, हे मोदींना चांगलेच उमगले आहे. खासदारांना उपदेश देण्याचे त्यांना डावे-उजवे फटकारे मारण्याचे दिवस आता गेले आहेत. आता ते सलोख्याची भाषा बोलू लागले असून, संसद भवनात खासदारांच्या मोठ्या प्रमाणात भेटीगाठी घेत आहेत. पंतप्रधान सत्रादरम्यान त्यांच्या चेंबरमध्ये बसले असल्यास कुठलाही खासदार त्यांना जाऊन भेटू शकतो. त्यांनी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना सांगितले की, ते अक्षरश: २४ तास काम करीत आहेत आणि गुजरातमध्ये १२ डिसेंबरला संपलेल्या वादळी मोहिमेनंतर १५ राज्यांचा दौराही त्यांनी केला. परंतु यावेळी त्यांनी पूर्वीसारखा उपदेश देण्याऐवजी खासदारांना कठोर परिश्रम घेण्याची विनंती केली. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाºयांनासुद्धा इच्छुक खासदारांना भेटण्यास तसेच कार्यकर्त्यांच्या तक्रारी तातडीने दूर करण्यास सांगितले. अर्थात काही नेत्यांचा अहंकार अजूनही कायम आहे. परंतु ही वेळ मतभेद दूर करून नरमाईने घेण्याची आहे, याची मात्र त्यांना कल्पना आली आहे.शरद यादव संपुआचे संयोजक?काँग्रेस गुजरातमध्ये पराभवातही विजयाचा दावा करीत असली तरी, या जुन्या पक्षाने पुढील आव्हानांचा सामना करण्यासही कंबर कसली आहे. बातम्या काहीही असोत, सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट एका नव्या भूमिकेत संयुक्त पुरोगामी आघाडीला(संपुआ)पुनरुज्जीवित करण्यात अधिक सक्रिय होणार आहेत. सोनिया गांधी संपुआच्या अध्यक्षपदी कायम राहतील; पण एक संयोजक इतर पक्षातून निवडला जाणार असून तो उत्प्रेरकाची भूमिका वठवेल, हे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते शरद यादव यांचे नाव संपुआ संयोजकपदासाठी समोर आले आहे. संपुआ-१ आणि संपुआ-२ दरम्यान कुणीही संयोजक नव्हते. परंतु विरोधी पक्षातून एक संयोजक असणे गरजेचे असल्याचे वाटू लागले आहे. शरद यादव यांना गांधी कुटुंबातून फार उच्च दर्जा देण्यात आला आहे. कारण त्यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाचा त्याग केला आणि आपला आधार तयार केला. काँग्रेस त्यांना राज्यसभेत पाठविण्यास इच्छुक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तूर्तास भारतातील जातीय राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करीत असून, याची जाण मंडल आयोगाच्या राजकारणामागे राहिलेले शरद यादव यांच्यापेक्षा जास्त कुणाला असणार?काँग्रेसने राकाँ,बसपावर फोडले खापरगुजरातमध्ये युती होऊ न शकल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रारंभी राकाँने २४ जागा मागितल्याने वाटाघाटी फिस्कटल्या. नंतर राकाँ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अशोक गहलोत यांना पक्ष १२ जागांवरही समाधानी राहील, असे संकेत दिले. काँग्रेसने या पक्षाला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी स्वीकारला नाही. पुढे पुन्हा संपर्क झाला तेव्हा नामांकन मागे घेण्याची तारीख निघून गेली होती. खरे सांगायचे झाल्यास काँग्रेस आणि राकाँ हे दोन्ही पक्ष युतीसाठी उत्सुक नव्हते. त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीसुद्धा २५ जागा मिळाल्यास काँग्रेससोबत समझोत्यास तयार होती. परंतु काँग्रेसने प्रस्तावावर विचार करण्यासही नकार दिला आणि बसपाने स्वबळावर निवडणूक लढविली.शहांनी डॉ. जोशींना वाकून नमस्कार केला तेव्हा...भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचे अनुभवी नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार केला तेव्हा संसदेचा सेंट्रल हॉल चकित झाला. त्याचे झाले असे की, नुकतेच राज्यसभेत पदार्पण झालेले अमित शहा राज्यसभेतून लोकसभेत जात असताना त्यांना डॉ. जोशी बसलेले दिसले. शहा त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना खाली वाकून नमस्कार केला. जोशींनीही त्यांना आशीर्वाद दिला. उभयतांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.-हरीश गुप्ता‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी