शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आयुक्तसाहेब, उंच कामे नको, फक्त मुलभूत सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:24 IST

मिलिंद कुलकर्णी जळगाव महापालिकेला अखेर आयुक्त मिळाले आणि विशेष म्हणजे नियुक्तीनंतर ते लगेच रुजूदेखील झाले. डॉ.उदय टेकाळे यांच्या नंतर ...

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेला अखेर आयुक्त मिळाले आणि विशेष म्हणजे नियुक्तीनंतर ते लगेच रुजूदेखील झाले. डॉ.उदय टेकाळे यांच्या नंतर डॉ.माधवी यांची नियुक्ती यापदावर झाली होती. परंतु, त्या आल्याच नाहीत. त्या का आल्या नाही, याचे कारण कळले नाही. परंतु, उगाच चर्चा सुरु झाली की, जळगाव महापालिकेत यायला कुणी तयार नाही. असा संदेश जाणे हे जळगावच्या प्रतिमेच्यादृष्टीने चुकीचे आहे.कुलकर्णी हे मंत्रालयातून आले आहेत. नगरपरिषद संचालनालयात ते कार्यरत होते. आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या १७ मजली इमारतीविषयी गौरवोद्गार काढले. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेने एवढी उंच स्वमालकीची प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय धाडसी, कल्पक आणि दूरदृष्टीचा आहे. त्या इमारतीचा आणि हा निर्णय घेणाऱ्या व अंमलात आणणाºया सुरेशदादा जैन यांचा जळगावकरांना अभिमान आहेच. आयुक्तसाहेबांनी प्रांजळ भावना व्यक्त करुन जळगावकरांचे मन पहिल्यांदा जिंकले. आयुक्तसाहेब, स्वप्न बघणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हे खूप अवघड असते. १७ मजली इमारतीचे असेच आहे. अन्यथा, एवढ्या इमारतीची गरज काय, लिफ्टचा अकारण खर्च वाढला असा काथ्याकुट करणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची जळगावात कमतरता नाही. विकास कामांची वीटही रचता न येणारी माणसे कर्मधर्मसंयोगाने सत्ता मिळाल्यावर या इमारतीचे मजले भाड्याने देण्याच्या गोष्टी करीत होते, हेदेखील जळगावकरांनी बघीतले.आयुक्तसाहेब, तुम्ही जळगावच्या भरभराटीच्या काळाची आठवण करुन दिली याबद्दल धन्यवाद. त्या उंचीची कामे मार्गी लावण्याचा तुमचा मनोदय स्वागतार्ह असला तरी सध्या जळगावकरांना भेडसावणाºया मुलभूत सुविधा दिल्या तरी खूप असे प्रामाणिक मत सामान्य नागरिकाचे आहे. करदात्या नागरिकाला ज्या सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेपासून मिळायला हव्यात, त्यापासून जळगावकर अनेक वर्षांपासून वंचित आहेत. जळगावनजिक असलेले वाघूर धरण यंदा १०० टक्के भरले. परंतु, जळगावकरांना दोन दिवसाआड आणि तेही काही भागात पहाटे ३.३० वाजता तर कुठे रात्री ९ वाजता पाणीपुरवठा होत आहे. ‘कोरोना’ या साथरोगाने भयंकर रुप धारण केलेले आपण बघत आहोत, अशा साथरोगांचा सामना जळगावकर रोज करीत आहेत. तुंबलेल्या व उघड्या गटारी, रस्त्यांवर पडलेला कचरा, गल्लीबोळ ते मुख्य रस्त्यांवर पडलेले अगणित खड्डे याचे परिणामस्वरुप धूळ आणि धुराचा करावा लागणारा सामना जळगावकरांच्या अंगणवळणी पडला आहे. जळगावात व्यापारी संकुले भरपूर आहेत, परंतु, पार्किंगचा अभाव आणि हॉकर्सचे अतिक्रमण यामुळे संकुलात जाऊन खरेदी करणेदेखील अवघड बनले आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह हा विषय दहा वर्षांपासून गाजत आहे, पण तो प्रश्नदेखील आम्ही सोडवू शकलो नाही. पथदिवे रात्री सुरु असावे, ही प्राथमिक अपेक्षा देखील पूर्ण होत नसेल तर नागरिकांनी काय करावे. आबालवृध्दांना खड्डे, अतिक्रमण आणि अंधाराचा सामना करीत ठेचकाळत, धडपडत वावरावे लागते, यापेक्षा दुर्देव ते काय?आपण उंचीच्या कामांचा मनोदय व्यक्त केला, म्हणून तुम्हाला जळगावकरांची अपेक्षा काय आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी येऊन गेलेल्या अधिकाऱ्यांनी अशीच स्वप्ने दाखविली होती. जळगावकर आणि तथाकथित थिंक टँक मंडळी त्यांच्या प्रेमात पडली. जळगावचे हेच खरे तारणहार असे म्हणू लागले. पण भ्रमनिरास झाला. कुणी गाळ्यांचा प्रश्न सोडवून महापालिकेला कर्जमुक्त करण्याचा रामबाण उपाय सुचविला होता. सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांना डोक्यावर घेतले. वास्तव असे की, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एका अधिकाºयाने एका व्यापारी संकुलाला शिस्त लावली, जळगावकरांनी त्याचा उदोउदो केला. उर्वरित २६ संकुले मात्र तशीच राहिली. लोकप्रतिनिधींचादेखील असाच अनुभव आला. राज्यात सत्ता एका पक्षाची तर महापालिकेत दुसºया पक्षाची, परिणामी प्रत्येक विकास कामामध्ये राजकारण आले. कोट्यवधीच्या योजना आल्या, परंतु, एकही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. मुदतवाढीच्या रांगेत अनेक योजना प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेले २५ कोटी रुपये सत्ता जाऊनदेखील खर्च झालेले नाही. म्हणून, जळगावकर म्हणतात, मोठ्या घोषणा नको. मुलभूत सुविधा तेवढ्या द्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव