शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इथे या, पुस्तक वाचा, कॉफी प्या, गप्पा मारा, हसा-नाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:42 IST

Finland: फिनलंडच्या राष्ट्रीय संसदेच्या समोरच उडी लायब्ररी आहे. इथून पाय हलत नाही. अभ्यास, आराम आणि सामाजिक चहलपहल या सगळ्यांचा अति-प्रसन्न अनुभव!

- साधना शंकर(लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी) 

फिनलंड हा जगातला सर्वात सुखी देश म्हणून ओळखला जातो.  या देशात आर्क्टिक मंडळाच्या जवळ सांताक्लॉजचे गावही आहे. वनराजीने नटलेल्या या देशात चहूकडे पाणीच पाणी दिसते. मला मात्र फिनलंडमध्ये फिरताना तेथील ग्रंथालये विशाल आणि अत्यंत संपन्न असल्याचे अतिशय प्रकर्षाने लक्षात आले.

ग्रंथालय म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या रांगांच्या रांगा  येतात. आधुनिक काळात काम करण्याची जागा म्हणजे जेथे बसून लॅपटॉप चालवता येतो, असे ठिकाण.  फिनलंडमध्ये हेलसिंकी येथील राष्ट्रीय ग्रंथालय तुम्ही अवाक् व्हाल इतके भव्य आहे. फिनलंडमधील या राष्ट्रीय ग्रंथालयाची मुख्य इमारत १८३६ साली सीएल एंजल या स्थापत्यविशारदाने संकल्पचित्रात उतरवली. १८४० ते ४५  या पाच वर्षात ती बांधून पूर्ण झाली. १९१७ साली फिनलंडला स्वातंत्र्य मिळाले. तोवर या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या ३ लाखांच्या घरात गेली होती. 

आजमितीला फिनलंड येथील वातावरण संशोधनासाठी अत्यंत समृद्ध आहे. पर्यटक म्हणून तुम्ही शांतपणे येथे येऊ शकता आणि इमारतीची स्थापत्यकला, एकंदर सुबकता यातील सौंदर्य पाहू शकता. इमारत सहा मजल्यांची असून मुख्य घुमटाखाली उभे राहिले तर सहाही मजले दिसतात. तुम्ही तेथे गेलात तर त्या वास्तूत मानवतेच्या ज्ञानभांडाराविषयी कृतज्ञतेचा  भाव तुमच्या मनात प्रकट झाल्यावाचून राहत नाही.

नॅशनल लायब्ररीपासून काही अंतरावर उडी लायब्ररी आहे. आधुनिक पद्धतीची या ग्रंथालयाची इमारत लांबून एखाद्या लाटेसारखी दिसते. फिनलंडच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. तेथे केवळ पुस्तकेच नव्हे तर आणखी बरेच काही आहे. इथे आल्यावर प्रेरणा मिळते. नव्या काळातील हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे. पूर्णपणे मोफत आहे. फिनलंडच्या राष्ट्रीय संसदेच्या समोरच या ग्रंथालयाची भव्य अशी तीन मजली वास्तू आहे.

शहरातील रहिवाशांसाठी एकमेकांना भेटण्याची आणि अध्ययनाची जागा म्हणून हे तीन मजले वापरले जातात. तुम्ही येथे येऊन वाचू शकता. चांगले अन्नपदार्थ खाऊ शकता. आपल्याला आवश्यक असलेली अनेक कौशल्ये आत्मसात करू शकता; फिनिश भाषाही त्यात आली. येथे सिनेमा पाहता येतो. काही कार्यक्रम होतात. सुसज्ज अशा स्टुडिओमध्ये ध्वनी मुद्रण किंवा संपादन करता येते. इतकेच नव्हे तर मुलांना तुम्ही येथे खेळण्यासाठी आणू शकता. या ग्रंथालयात थ्री डी प्रिंटिंग  मोफत करून मिळते. उडी या ग्रंथालयात तर तुम्ही नाटकाची तालीम घेऊ शकता. नृत्याचा सराव करू शकता. एक अत्यंत आदर्श असे सभागृहसुद्धा येथे आहे.

तिसऱ्या मजल्यावर पुस्तकांची कपाटे आहेत. तेथे तुम्हाला पुस्तकांची छाननी करणारे, पुस्तके उचलणारे रोबोट दिसतील. आधी ते जरा बुजरे वाटतात, पण नंतर खुले होतात. २०२५  सालीही हे वाचनालय  स्वच्छ, सातत्याने निगा राखली जाणारी खुली सार्वजनिक जागा आहे. जणू काही सारे काही नवे कोरे  असल्याचा भास होतो. आपण ज्या मजल्यावर जातो तेथे लोकांची गजबज असते. काहीजण स्वयंपाक करत असतात. काही शिवणकाम करतात. कोणी ध्वनीमुद्रण करते तर कोणी कॉफीचे घुटके घेताना दिसते.  काहीजण प्रिंट काढत असतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी येथे काही ना काही करण्यासारखे आहे.

सार्वजनिक जागा कशी असावी, याचा उडी लायब्ररी हा एक आदर्श आहे. ती सर्वांसाठी आहे. हेलसिंकीच्या पर्यटनाच्या नकाशावरती  हे ग्रंथालय मानाची जागा पटकावून आहे.  आपल्याकडेही अशी एखादी जागा असली पाहिजे, अशी इच्छा आपल्या मनात प्रकटल्याशिवाय राहत नाही. अभ्यास, आराम आणि सामाजिक चलनवलन  या सगळ्यांचा मिलाफ इथल्या निवांत वातावरणात आढळतो. खरेतर, कोणतेही ग्रंथालय हे असेच असले पाहिजे, असे राहून राहून माझ्या मनात येत होते.sadhna99@hotmail.com

टॅग्स :finlandफिनलंड