शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

मुख्यमंत्र्यांचं भांडण

By admin | Updated: September 24, 2015 23:35 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्याप्रकरणी अगदी प्रथमपासून ज्या संघटनेकडे संशयाने बघितले जात होते, त्या सनातन संस्थेच्याच एका साधकाला पोलिसांनी संशयावरुन अटक केल्यानंतर आता ‘सनातन’वर बंदी लागू करण्याच्या मागणीला जोर चढणे स्वाभाविक आहे. सनातन ही कडवी हिन्दुत्ववादी संघटना असल्याने आणि आज देशात आणि राज्यात हिन्दुत्ववादावरच ज्यांचे राजकीय भरणपोषण झाले आहे, अशा लोकांचे सरकार असल्याने अशी बंदी लागू केली जाणे सोपे नाही, याचीही साऱ्यांनाच जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील केवळ राजकीय दबाव निर्माण केला जातो आहे म्हणून सनातनवर बंदी आणणार नाही, असे स्पष्टपणे सांगूनही टाकले आहे. मुख्यमंत्री ज्या राजकीय दबावाचा उल्लेख करीत आहेत तो दबाव प्राय: काँग्रेस पक्षाकडून केला जात असला तरी केन्द्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेत असतानाच सुमारे चार वर्षांपूर्वी सनातनवरील बंदीचा विषय सरकारी कागदावर उतरला होता पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आता ते का झाले नाही व कोणामुळे झाले नाही यावरुन खुद्द काँग्रेस पक्षातच एक कलह सुरु झाला असून सुशीलकुमार शिन्दे आणि पृथ्वीराज चव्हाण या राज्याच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जाहीर सवाल जबाब सुरु झाले आहेत. चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना शिन्दे राज्यातून दिल्लीत जाऊन केन्द्रीय गृहमंत्री बनले होते. चव्हाणांच्या कथनानुसार त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने सनातनवरील बंदीचा एक अहवाल केन्द्रीय गृह मंत्रालयाला पाठविला होता पण त्या मंत्रालयाने त्यावर काही कार्यवाहीच केली नाही. त्यावर शिन्दे एकदा म्हणाले, ‘माझ्या टेबलावर अहवाल आला नाही, तो सचिवालयातच राहिला’ आणि ‘दुसऱ्यांदा म्हणाले, नुसता अहवाल पाठवून काय होते, मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते’. त्याला लगेच पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिले की, ‘ते काय माझ्या घरचे काम होते? रीतसर अहवाल पाठवला होता, त्यावर कार्यवाही व्हायला हवी होती’. सरकारी कामकाज कसे चालते, याचा हा एक उत्तम नमुना तर आहेच शिवाय पारदर्शी, तत्पर आणि पेपरलेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे कसे एक सोंग आहे, हेदेखील यातून स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वीच तत्कालीन राज्य सरकारला सनातनच्या अस्तित्वातला धोका लक्षात आला होता तर सुशीलकुमार म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारने खरोखरीच त्याचा पाठपुरवा करावयास हवा होता. त्याचबरोबर तेव्हांचे गृहसचिव आणि आजचे भाजपाचे खासदार राजकुमार सिंह मनाने व कलाने भाजपाकडे झुकलेले आहेत याची किमान केन्द्रीय गृह मंत्र्यांना तरी कल्पना असायलाच हवी होती. कारण याच राजकुमार सिंह यांनी राज्याकडून आलेला प्रस्ताव आपल्या मंत्र्यापुढे ठेवला नाही व आपल्याच अखत्यारीत रफादफा करुन टाकला असाही एक आरोप या संदर्भात केला गेला आहे. इत्यर्थ इतकाच की खुद्द काँग्रेस सरकारदेखील सनातनवरील बंदीबाबत फार गंभीर नव्हते.