शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निर्धन, दुर्बलांसाठी धावली धर्मादाय रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:52 IST

धर्मादाय कार्यालये ही जणू धर्मादाय संस्थांमधील प्रकरणांवर न्याय, आदेश, सुनावणी करणारी यंत्रणा आहे.

- धर्मराज हल्लाळेधर्मादाय कार्यालये ही जणू धर्मादाय संस्थांमधील प्रकरणांवर न्याय, आदेश, सुनावणी करणारी यंत्रणा आहे, इतकाच मर्यादित अर्थ सामान्य माणसांना समजतो़ त्यापुढे जाऊन शेवटच्या माणसाचा विचार करणारी व्यक्ती एखाद्या पदावर असते, तेव्हा गतीने परिवर्तन घडते हे राज्य धर्मादाय आयुक्तांनी दाखवून दिले़ मराठवाड्यातील हजारो रुग्णांना धर्मादाय रुग्णालये खुली झाली़ कायदा असतो, नियमही असतो, फक्त ती आयुधे लोकाभिमुख करण्याची गरज असते़ हे काम राज्य धर्मादाय आयुक्त न्या़ शिवकुमार डिगे यांनी सक्षमपणे केले़धर्मादाय रुग्णालये गरीब रुग्णांच्या दारापर्यंत घेऊन जाणारी योजना अनेकांच्या आयुष्याला संजीवनी देणारी ठरली. आज आरोग्य आणि शिक्षण हे दोनच विषय सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसतात. दैनंदिन उदरनिर्वाहात अडकलेल्या कुटुंबातील एखाद्याला जरी गंभीर आजाराने ग्रासले, तर संपूर्ण कुटुंब कोलमडते. सरकारी रुग्णालयांमधील गर्दी संपत नाही. अशावेळी एखाद्या सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये पाऊल ठेवण्याची हिंमत सामान्य माणूस करू शकत नाही. म्हणूनच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००६ पासून महाराष्ट्रातील अत्याधुनिक, सुसज्ज धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा मोफत तर १० टक्के खाटा ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. २००६ पासून हा आदेश अंमलात आला. आजघडीस राज्यामध्ये ४३० धर्मादाय रुग्णालये आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये सुमारे १४०० कोटी रुपये या रुग्णालयांनी मोफत उपचारावर खर्च केले. एकूण रुग्णालयांची संख्या तसेच मोफत पाच हजार खाटा व सवलतीच्या दरातील पाच हजार खाटा याची तुलना केली, तर दशकभरातील झालेला खर्च अधिक होऊ शकला असता. म्हणजेच अनेक गरीब, गरजू रुग्णांना लाभ मिळू शकला असता. एक तर त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. त्यात अंमलबजावणीतही अडचणी निर्माण होतात. ज्या गरजू रुग्णांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांहून कमी आहे, अशांना मोफत तर ज्यांचे उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त व एक लाखांच्या आत आहे, अशा गरजूंना ५० टक्के सवलतीत धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतात. त्यासाठी पिवळे रेशन कार्ड, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र यापैकी एखादा पुरावा लागतो. परंतु ११ वर्षांपूर्वी दिलेली आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आजही तीच आहे. त्यात बदल करणे आवश्यक आहे.ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, त्यांना ज्या दर्जाची आरोग्य सेवा घेणे शक्य होते, तशीच सेवा निर्धन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांनाही शक्य करणारी ही धर्मादाय योजना आहे. त्याची नव्याने चर्चा घडली ती राज्य धर्मादाय आयुक्त न्या. डिगे यांच्या पुढाकारामुळे़ मराठवाड्यातील ३२ रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी आठ हजार रुग्णांची तपासणी झाली. संपूर्ण राज्यात सुमारे ७५ हजारांवर रुग्ण तपासले गेले. त्यातील ज्या रुग्णांना दुर्धर आजार आहेत. त्यांना आता यापुढेही मोफत उपचार मिळतील. याच धर्तीवर धर्मादाय शिक्षण संस्थांनीही निर्धन, दुर्बल घटकांसाठी मोफत शिक्षणाचा काहीअंशी वाटा उचलला पाहिजे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटल