शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

गडकरींचे आव्हान अन् गुजरातचा कौल!

By रवी ताले | Updated: December 19, 2017 00:45 IST

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले. त्याच्या आधल्या दिवशी भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पश्चिम विदर्भात होते. त्यावेळी गडकरींनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेले आव्हान आणि दुस-याच दिवशी शेजारच्या गुजरातने दिलेला कौल यांचा निश्चितपणे संबंध आहे.फडणवीस-गडकरी जोडगोळीने पश्चिम विदर्भात एकूण तीन ठिकाणी विविध विकास प्रकल्पांच्या कार्यान्वयन समारंभांमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी अनेक प्रकल्प गत अनेक वर्षांपासून रखडले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद, केंद्रीय जल संधारण मंत्री या नात्याने गडकरींनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमास संबोधित करताना, आणखी पैसा लागला तरी उपलब्ध करून देऊ; पण मंजूर प्रकल्पांची कामे तीन वर्षांऐवजी एका वर्षात पूर्ण करून दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. घोषणा केलेली कामे सरकारच्या उरलेल्या कालखंडात पूर्णत्वास नेण्याची निकडच गडकरींच्या आव्हानातून जाणवत होती.गुजरातच्या जनतेने भाजपाला कौल दिला असला तरी, आम्हाला गृहित धरू नका, असा सज्जड इशाराही भाजपाच्या जागा कमी करून दिला आहे. सोबतच जातीय समीकरणांच्या आधारे भाजपाला घेरण्याचा हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकोर या त्रिकुटाचा प्रयत्नही गुजराती मतदारांनी हाणून पाडला आहे. विकास, आश्वासनांची पूर्तता आणि स्वच्छ कारभार या निकषांवरच मतदान करण्याचा देशभरातील मतदारांचा कल गत काही काळापासून दिसून येत आहे.या पाशर््वभूमीवर, दीड-दोन वर्षात दोन निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या महाराष्ट्रातील भाजपा सरकारला, यापुढे आश्वासनपूर्तीकडे प्रामुख्याने लक्ष पुरवावे लागणार आहे. विदर्भापुरते बोलायचे २झाल्यास, केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक विकास प्रकल्पांची घोषणा झाली. प्रत्यक्षात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका खुणावू लागल्या असतानाही, अनेक प्रकल्पांच्या कामांना साधा प्रारंभही झालेला नाही, तर कामांना प्रारंभ झालेले प्रकल्प रखडले आहेत. रस्ते हा गडकरींचा खूप आवडीचा विषय; पण त्यांनी घोषणा केलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम कूर्मगतीने सुरू आहे. कृषी कर्जमाफीचा फडणवीस सरकारने खूप गाजावाजा केला; पण अंमलबजावणीत घालण्यात आलेल्या घोळामुळे ‘शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड’ अशी गत झाली आहे. सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपाने खूप रान उठविले होते; पण भाजपाच्या कार्यकाळातही सिंचन प्रकल्प रखडलेलेच आहेत, ही वस्तुस्थिती आहे.ही परिस्थिती बदलली नाही, घोषणा प्रत्यक्षात उतरत असल्याचे जनतेला दिसले नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये फटका बसण्याचा धोका, आता फडणवीस-गडकरी जोडगोळीला जाणवू लागला आहे. त्याचेच प्रतिबिंब गिरीश महाजनांना दिलेल्या आव्हानात उमटले आहे.-रवी टालेravi.tale@lokmat.com 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Nitin Gadakriनितिन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस