शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

फडणवीसांची जात

By admin | Updated: July 5, 2016 03:37 IST

फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी हा पवारांसाठी मोठा धक्काच. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून

- गजानन जानभोर फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी हा पवारांसाठी मोठा धक्काच. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना, या भीतीतून पवार मुद्दाम तसे बोलले. शरद पवारांनी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जात काढली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील जातीची गटारे पुढच्या काळात आणखी तुंबण्याची शक्यता बळावली. देवेंद्र फडणवीस नागपुरातील ज्या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले, त्या मतदारसंघात मागासवर्गीय आणि ओबीसी मतदारांचेच अधिक प्राबल्य आहे. स्वत: फडणवीसांचे वडील गंगाधरराव संघातील ‘कॉम्रेड’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पक्षसंघटन बांधताना ब्राह्मणांना नव्हे तर बहुजन कार्यकर्त्यांनाच मोठे केले, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या जातीत जन्मास येणे आपल्या हातात नसते. तो जैविक योगायोग असतो, त्यामुळे आपल्या जातीचा दुराभिमान किंवा अहंकार बाळगणे हे मनोविकाराचे लक्षण असते. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित केला आणि तो धसास लावला. फडणवीसांच्या अवतीभवती जे कार्यकर्ते दिसतात, त्यात बहुजन कार्यकर्त्यांचीच गर्दी अधिक असते. त्यामुळे जातीच्या पलीकडे जाऊन सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल असे गलिच्छ आणि जातीयवाचक विधान करणे पवारांसारख्या लोकनेत्याला शोभणारे नाही. शरद पवार हे चाणाक्ष आहेत. ते कुठलेही विधान सहज किंवा अनवधानाने करीत नाहीत. परंतु छत्रपती संभाजी राजेंना भाजपाने राज्यसभेत पाठविल्यामुळे पवार अस्वस्थ झाले आहेत. ज्या समाजाच्या भरवशावर आपण आयुष्यभर राजकारण केले तो आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना, या भीतीतून व तो जाऊ नये या त्राग्यातून पवार मुद्दाम तसे बोलले. भारतीय समाज झुंडीतून कधीच बाहेर पडू इच्छित नाही. त्याला जातीचा द्वेष आणि धर्माचा विखार सतत खुणावत असतो. त्यामागील समाजशास्त्रीय कारणे पवारांना ठाऊक असल्याने अशा जातीच्या झुंडी आपल्याच कब्जात ठेवण्यासाठी पवार असे नेहमी धडपडत असतात. २००९ ची विधानसभा निवडणूक आठवत असेल, पवार आणि त्यांच्या पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर जेम्स लेनचा मुद्दा पद्धतशीरपणे चिघळविला आणि निवडणुका जिंकल्या. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ‘तीन टक्यांचे राजकारण’ असा जातीय शब्दप्रयोग पवार नेहमी करायचे. त्यामागील मळमळ तीच होती. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना शेतकऱ्यांनी आपले पंचप्राण मानले, त्या वेळीही घायकुतीला आलेले पवार जोशींच्या जातीचा उल्लेख वारंवार करायचे. खा. राजू शेट्टींनाही त्यांनी असेच हिणवले. मराठ्यांना कसे हाताळावे हे या ‘द ग्रेट मराठा’ नेत्याला कळते. फडणवीसांनी संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठविण्याची केलेली खेळी पवारांच्या जिव्हारी लागली आहे. तोपर्यंत त्यांनी शाहू महाराजांच्या या वंशजाला गृहीत धरले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे पराभूत झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेत पाठवण्याचे शहाणपण पवारांना सुचले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडाऱ्यातून प्रफुल पटेल पराभूत होत असल्याचे लक्षात येताच पवारांनी त्यांना फोन करून ‘काळजी करू नका, तुम्हाला राज्यसभेवर तारिक अन्वरांच्या जागेवर मी पाठवत आहे’ असा दिलासा दिला होता. पण अशा वेळी पवारांना संभाजीराजेंची आठवण राहात नाही. या ‘जाणत्या राजा’ने रयतेच्या, कुणबी-मराठा शेतकऱ्यांच्या नष्टचर्याला कारणीभूत असलेल्या मूलभूत कारणांचा शोध घेतला नाही, जातीचे राजकारण करणाऱ्यांना तो कधी घ्यावासाही वाटत नाही. ही गोष्ट या समाजातील सुजाण तरुणांना आता कळून चुकली आहे. हा तरुण नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असताना कालपर्यंत धर्मवादाचे राजकारण करणारी भाजपा या समाजाला आपल्या नव्या जातीय राजकारणाच्या सापळ्यात ओढू पाहते, तेव्हा पवारांचे अगतिक होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्यांचा हा थयथयाट याच करुणेतून समजून घेणे गरजेचे आहे.