शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोखे लवादातील प्रकरणे क्लिकवर, एनएसईचे विशेष ई-बूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:54 IST

रोख्यांसंबंधी तक्रारींचा निपटारा रोखे तदर्थ लवादात (सॅट) होतो. या लवादातील प्रकरणांची अत्यंत क्लिष्ट अशी माहिती आता एकत्र उपलब्ध झाली आहे. त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) विशेष ई-बुक सादर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रोख्यांसंबंधी तक्रारींचा निपटारा रोखे तदर्थ लवादात (सॅट) होतो. या लवादातील प्रकरणांची अत्यंत क्लिष्ट अशी माहिती आता एकत्र उपलब्ध झाली आहे. त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) विशेष ई-बुक सादर केले आहे.रोखे अर्थात, सिक्युरिटी संदर्भातील तक्रारी लवादात सादर केल्या जातात. त्यामधील प्रकरणे लाखोंच्या संख्येने असतात, ते क्लिष्टदेखील असतात. अशी प्रकरणे शेअर बाजार नियामक मंडळाच्या (सेबी) संकेतस्थळावर वेळोवेळी टाकली जातात, पण सेबी सर्वच प्रकरणे संकेतस्थळावर टाकत नाही, तसेच ही प्रकरणे लाखोंच्या संख्येने असल्याने नेमके प्रकरण शोधणे अत्यंत क्लिष्ट काम असते. आता सामान्य गुंतवणूकदार, गुंतवणूक सल्लागार, विधि संस्था यांना या प्रकरणांचा अभ्यास करता यावा, यासाठी एनएसईने पुढाकार घेत, विशेष ई-बुक सादर केले आहे.सॅटमधील प्रत्येक तक्रार, त्यामधील सुनावणी व निकाल या ई-बुकमध्ये आहे. यासोबतच सेबीच्या संकेतस्थळावरील सॅटची माहिती विखुरलेल्या स्वरूपात आहे. एनएसईच्या ई-बुकमध्ये मात्र, ही माहिती सेबीच्या नियमावलींच्या वर्गीकरणासह उपलब्ध आहे. कंपनी विकत घेण्यासंबंधी, दोषयुक्त व्यवसाय पद्धती, शेअर दलाल नियमावली, सेबी कायदा आणि म्युच्युअल फंडासंबंधीचे नियम यांचा त्यात समावेश आहे. गुंतवणूक, गुंतवणूक संस्था, विधि संस्था, म्युच्युअल फंड सल्लागार या श्रेणींनुसार सॅटमधील कुठलाही निकाल या ई-बुकमध्ये एकत्र पाहता येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही.एम. कानडे, सेबीचे सदस्य जी. महालिंगम, सेबीचे कार्यकारी संचालक अनंता बरुआ, एनएसईचे अध्यक्ष अशोक चावला व एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विक्रम लिमये यांच्या हस्ते एनएसईमध्येच या ई-बुकचे प्रकाशन केले. 

टॅग्स :IndiaभारतMarketबाजार