शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील मुलांच्या वृद्ध आईवडिलांची देखभाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:39 IST

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या वीस ते तीस वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषत: संगणक, अणुविज्ञान, माहिती तंत्रशास्त्र यासारख्या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांत बहुधा नोकºया मिळतात. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुले नोकरीनिमित्त परदेशी जातात व तेथेच काही कालावधीनंतर स्थायिक होतात. चांगली नोकरी, चांगले वातावरण, भरपूर पगार, स्वच्छ परिसर, करिअर करण्यासाठी उपलब्ध संधी, गुणवत्तेला वाव, भरपूर पैसा, चांगले जीवनमान या गोष्टी बहुधा प्रगत राष्ट्रामध्ये नोकरी व व्यवसायासाठी मुलांना आकर्षित करतात. त्यामुळे वृद्ध आईवडील भारतात एकटे पडतात.

मुलांना वारंवार भारतात येणे शक्य होत नाही. वयानुसार वृद्धांचे शारीरिक आजार व मानसिक दुर्बलता वाढीस लागते. नातवंडांसोबत खेळण्याच्या वयात एकटेपणा व आधाराविना जीवन जगणे असह्य होत असते. सुरुवातीच्या काळात नातेवाईक व आप्तांचा आधार मिळतो. मात्र नंतर तो मिळणे कठीण होत जाते. परदेशातील मुलांकडून त्यांना पैशाची आवक असते, पण रुग्णालयात वारंवार नेणे, औषधोपचार करून घेणे, खाण्यापिण्याची सोय होणे, मानसिक व कुटुंबाचे प्रेम मिळणे या गोष्टींपासून ते वंचित होत असल्यामुळे म्हातारपण अजूनच असह्य होते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात अशा वृद्ध नागरिकांची देखभाल करणे, त्यांचे खानपान करणे यासाठी विविध संस्थांनी आपले व्यवसाय चालू केले आहेत.

डॉक्टरची वेळ घेणे, दिलेल्या वेळेत वृद्ध लोकांच्या घरी जाऊन त्यांना नियमित दवाखान्यात नेणे, त्यांची डॉक्टरकडून तपासणी करून घेणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे, औषधी आणून देणे, त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविणे, रोजचे जेवण पोहोचविणे, नियमित रक्तदाब तपासणे, रक्तातील घटकांची चाचणी करून रिपोर्टचा रेकॉर्ड ठेवणे, आरोग्य व्यवस्था घरी उपलब्ध करून देणे यासारख्या कामासाठी वर्षभराचा करार केला जातो व सेवा दिली जाते. याचे पैसे आॅनलाइन पद्धतीने बºयाचदा मुलांकडून सेवा देणाºया संस्थेच्या खात्यात भरले जातात. काही मुले परदेशातील अमेरिकन, इंग्रजी मुलींशी विवाह करतात. कुटुंबातील जवळीक संपुष्टात येते. व्हिसा व ग्रीनकार्ड अडचणीमुळे काही वेळा वृद्धांना परदेशात जाता येत नाही. काही वृद्ध मुलांकडे परदेशात जातात, पण बºयाच लोकांना काही काळानंतर करमत नाही व स्वत:ला तेथील परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेणे शक्य होत नसल्याने पुन्हा भारतात येण्याशिवाय पर्याय नसतो.

काही वेळा तर वृद्धांच्या अंत्यविधीलासुद्धा मुलांना परदेशातून वेळेवर येणे व उपस्थित राहणे शक्य होत नाही. भरपूर पैसा असूनसुद्धा हिरमुसलेले वृद्धापकाळातील आयुष्य जगणे बºयाचदा वृद्धांच्या नशिबी येते. प्रगत वैद्यकशास्त्र व योग्य देखभाल यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतामध्ये वर्ष २0२५ पर्यंत जवळपास १२५ लक्ष लोक वयाच्या ६0 वर्षांपर्यंत जीवित राहणार आहेत व त्यामुळे त्यांची शुश्रूषा करणे अत्यावश्यक होणार आहे. म्हणूनच भारतात वृद्धांची देखभाल करणे हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे व भविष्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोमाने वेग धरेल ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही.- प्रा. डॉ. संदीप ताटेवार । अभियांत्रिकी प्राध्यापक