शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

पायजम्याची नाडी शोधता येईना, आणि म्हणे...

By किरण अग्रवाल | Updated: September 14, 2017 08:17 IST

स्वप्नात हरवणे कुणाला आवडत नाही? राजा असो की रंक, प्रत्येकालाच ते आवडते. अट केवळ एकच ते स्वप्न ‘गोड’ असावे, भयावह नसावे.

ठळक मुद्देस्वप्नात हरवणे कुणाला आवडत नाही? राजा असो की रंक, प्रत्येकालाच ते आवडते. अट केवळ एकच ते स्वप्न ‘गोड’ असावे, भयावह नसावे. ‘सोशल मीडिया’ने स्वप्ने फुकट केली आहेत. परिणामी असंख्य नेट यूजर्स ‘लगे रहो मुन्नाभाई’प्रमाणे कुठे व कशात तरी हरवलेले राहू लागले आहेत.

- किरण अग्रवालस्वप्नात हरवणे कुणाला आवडत नाही? राजा असो की रंक, प्रत्येकालाच ते आवडते. अट केवळ एकच ते स्वप्न ‘गोड’ असावे, भयावह नसावे. अर्थात, आता त्याबद्दलही भीती बाळगण्याची गरज राहिलेली नाही. कारण रात्रीच्या गाढ झोपेत स्वप्ने बघण्याऐवजी दिवसाढवळ्या जागतेपणीच ती बघता येण्याची सोय झाली आहे. शिवाय, स्वप्न कसे बघायचे, त्याचा ‘कन्टेन्ट’ काय असावा, हेदेखील आपल्यालाच निश्चित करता येऊ लागले आहे. त्यामुळे स्वप्नात रंगणे वा कल्पनाविलासात विलसणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहे. मोबाइल क्रांतीने जग जसे मुठीत आणले आहे, तसे ‘सोशल मीडिया’ने स्वप्ने फुकट केली आहेत. परिणामी असंख्य नेट यूजर्स ‘लगे रहो मुन्नाभाई’प्रमाणे कुठे व कशात तरी हरवलेले राहू लागले आहेत.

उपरोक्त प्रास्ताविकाचे कारण असे की, माझा एक मित्र जो एरव्ही कायम त्याच्या त्याच्या कोशात ‘गुमनाम'सा राहात असे, तो परवापासून अगदी आनंदी दिसू लागला आहे. त्याच्या या आनंदीपणाचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी इतरांकडे चौकशी केली असता जे कळले, त्याने मलाही आनंदानुभव लाभला. त्याचे झाले असे की, फेसबुक या सोशल माध्यमाने आपल्या ‘यूजर्स’च्या मनोरंजनासाठी जे निरनिराळे फंडे अवलंबिले आहेत, त्यात आपला चेहरा कुणासारखा दिसतो, हे पाहण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सदर माध्यम हाताळणारा कुणीही या प्रश्नाशी संबंधित ‘लिंक’वर गेला तर त्याला आपल्या चेहऱ्याशी साधर्म्य असणाऱ्या मान्यवर वा सेलिब्रेटीशी तुलना केलेले दर्शविले जाते. याच प्रकारात आमच्या मित्राचा चेहरा अभिनेता हृतिक रोशनसारखा दर्शविला गेला. तेव्हा, मध्यंतरीच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या चंद्रकांता मालिकेतील क्रूरसिंगसारखा चेहरा असणाऱ्याला थेट हृतिकशी जोडले गेले म्हटल्यावर त्याच्या आनंदाला भरते येणे स्वाभाविकच होते. दुसरा एक प्रकार असा की, तुमचा प्रेमी तुम्हाला कुठे भेटेल हे जाणून घेण्यासाठी एक लिंक आली होती. त्याद्वारे ते ठिकाण जाणून घेऊन खुशीची गाजरे खात आमचा एक सहकारी आठवडाभरापासून रोज सकाळ-संध्याकाळी तेथे आपले कामधंदे टाळून स्वप्नांच्या फलश्रुतीकरिता पायपीट करतो आहे. पण अद्याप त्याला त्याचे प्रेम गवसलेले नाही. याच प्रश्नाच्या उत्तरात मुंबईतील एका तरुणीला तिचा प्रेमी सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी भेटेल असे सांगण्यात आले होते. पण दोन वर्षापासून मी त्याच परिसरात राहते, रोज मंदिरात दर्शनाला जाते; पण ‘तो’ भेटला नसल्याची खंत तिनेच सोशली व्हायरल केली आहे.

थोडक्यात, दिवसा उजेडी अशी स्वप्ने बघून क्षणिक आनंदामागे धावण्याचे आणि करमणूक करून घेण्याचे प्रकार कमालीचे वाढलेले दिसत आहेत. त्यात गैर अगर वावगे काही नाहीच. ‘आप पती-पत्नी में किसकी जादा चलेंगी?’, आप उग्र हो या शांत? Which celebrity you look like?, What is your Perfect nickname?, What will your career be like? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेत विरंगुळा शोधणे वेगळे. पण, असा आनंदानुभव घेताना विज्ञाननिष्ठ म्हणवणारे व प्रत्येकच बाबीचा कार्यकारणभाव तर्काच्या कसोटीवर तपासून पाहणारेही त्यात सहभागी होताना आणि विवेकाचे गाठोडे खुंटीवर टांगून ठेवताना दिसून येतात तेव्हा खरे आश्चर्य वाटून जाते. ‘आपका भाग्य क्या है’ आणि ‘कौनसे राशी के आदमी से आपकी शादी होंगी’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरे कुतूहलापोटी शोधणेही ठीक; पण How and When will you Die या सारख्या प्रश्नाच्या ‘लिंक’वर जाऊन जेव्हा आपल्याच मरणाची तारीख जाणून घेण्यासाठीही उत्सुकता दाखविली जाते, तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याखेरीज गत्यंतर उरत नाही.

गंमत म्हणजे, याच सोशल माध्यमावर शंभर वर्षांपूर्वी तुम्ही कोण होता, हे जाणून घेणाऱ्या प्रश्नाच्या लिंकवरही उड्या पडताना दिसत आहेत. खरे तर याबाबतची उत्सुकता दर्शविणे म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे आले. शिवाय, पुनर्जन्म स्वीकारताना शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही मनुष्ययोनीतच होतात व यंदाही मनुष्यजन्मच लाभला, हेही स्वीकारणे आले; जे तर्काच्या, विज्ञानाच्या वा विवेकाच्या कसोटीवर प्रमाणित ठरणारे नाहीच. पण या प्रश्नाला अगदी ‘यूके’चे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिलपासून ते अब्राहम लिंकन व हिटलरपर्यंतची उत्तरे अनेकांना लाभलेली दिसून येतात. ही उत्तरे गंमत म्हणून स्वीकारायची म्हटलीत तरी अतार्किकतेचे इतके वा असे अध:पतन व्हावे?. माझ्या एका सहकाऱ्याला याच म्हणजे १०० वर्षांपूर्वी तो कोण होता या प्रश्नाच्या उत्तरात जागतिक कीर्तीचे संशोधक अल्बर्ट आइनस्टाईन असे उत्तर लाभले. संशोधनाच्या ‘स’शी ज्याचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही, घरात वडिलांच्या पायजाम्याचा नाडा शोधायचा तर त्याची पंचाईत होते असे त्याच्या कुटुंबीयांचेच म्हणणे; तरी तो पूर्वजन्मीचा म्हणे अल्बर्ट आइनस्टाईन ! व्वा !! स्वप्ने ही स्वप्नेच असलीत तरी ती किती फसवी असू शकतात, हेच यातून दिसून येणारे असले तरी; आपल्या ‘यूजर्स’ना आनंदाचे डोही क्षणिक आनंद तरंग अनुभवण्याची संधी यातून मिळवून दिली जाते आहे, हे मात्र नक्की !