शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

budget 2021 : शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार होते, त्याचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 02:41 IST

budget 2021: जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवून देशासह जगाचीही अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली, अशा वाईट स्थितीमध्ये शेतकरीच संकटमोचक बनले. कृषिक्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेची  वेगाने होणारी घसरण थांबली.

- राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक)जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवून देशासह जगाचीही अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली, अशा वाईट स्थितीमध्ये शेतकरीच संकटमोचक बनले. कृषिक्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेची  वेगाने होणारी घसरण थांबली. लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकऱ्या व रोजगार गमावलेल्या असंघटित क्षेत्रातील गरीब लोकांना गावातल्या शेतीनेच आसरा दिला. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या क्षेत्रासाठी भरीव तरतूद करतील, अशी शेतकऱ्यांची भाबडी आशा होती, ती फोल ठरली. या अर्थसंकल्पात शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, व्यापारी यांच्यासाठी काहीच नसून कोरोनाकाळामध्ये ज्या अब्जाधिशांची मालमत्ता ३५ टक्क्यांनी वाढली, अशा देशातील ९५४ अब्जाधीश इंडियन लोकांसाठीचा हा अर्थसंकल्प  आहे, म्हणूनच शेअर बाजाराने उसळी खाल्ली.बाजारातील शेतीमालाची तेजीमंदी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात चिंताजनक बाब असते. सुसज्ज भांंडार व्यवस्था, शेतीगृहे, पॅकिंग हाऊस, सॉर्टिंग, ग्रेडिंग व्यवस्था गरजेची आहे. याकडे अर्थमंत्र्यांनी ढुंकूनही बघितलेले नाही. पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण झाल्याशिवाय नव्या तीन कृषी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही आणि शेतीक्षेत्रात नव्याने आलेल्या उद्योगपतींना तेजीमंदीचे श्रीखंड ओरपता येणार नाही. म्हणून अर्थमंत्र्यांनी जाणीवपूर्वक या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना शेतकरी कंपन्यांमार्फत नव्हेतर कार्पोरेट हाऊसेसमार्फत चालना मिळावी असेच कदाचित अर्थमंत्र्यांना वाटत असेल. ऊस व दूध उत्पादकांना तर बेदखलच  केले आहे.रोजगार गमावलेला बहुसंख्य असंघटित मजूर अजूनही गावातच आहे. त्याला रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची होती. म्हणून महात्मा गांधी रोजगार योजनेसाठी भरीव तरतुदीची आवश्यकता असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार कोटींची कपात करून यावर्षी केवळ ६१ हजार कोटींची तरतूद केली आहे. आक्रमक झालेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी गव्हासाठी ७५ हजार कोटींची तरतूद केल्याचा दावा  अर्थमंत्री  करतात. पण, ही तरतूद गहू खरेदी करण्यासाठी आहे आणि ती नेहमीच केली जाते. १५ लाख कोटी कृषी कर्जाचे बँकांना उद्दिष्ट आहे त्यातले  शेतकऱ्यांच्या पदरात किती पडणार हे कोडेच आहे. सिंचनासाठी पाच हजार कोटींची तरतूद आहे. त्यातून सिंचनाचे नवे प्रकल्प सोडा; चालू आहे तेसुद्धा मार्गी लागू शकत नाहीत.शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ ला दुप्पट होणार होते; त्याचे काय झाले? अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये वारंवार मनमोहन सिंग सरकारच्या तरतुदींचा उल्लेख येत होता. तुलना करायची असेल तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये डिझेल, रासायनिक खते, वीजबिले, बियाणे, कीटकनाशके आदींचे भाव काय होते आणि आता काय आहेत, याची तुलना करा. या देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अन्नधान्याची मालकी मूठभर लोकांच्या ताब्यात देऊन सर्वसामान्य जनतेला अन्नासाठी भिकेला लावायचे, या दिशेने सरकारने टाकलेले पाऊल म्हणजेच यंदाचा अर्थसंकल्प होय.

टॅग्स :budget 2021बजेट 2021agricultureशेती