शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाकरी, भोग आणि रोटी बँक

By admin | Updated: December 22, 2015 23:35 IST

खिशात दमडी नसेल तरी चालेल, पत असायला हवी. मग, घरात अन्नाचा दाणा नसला तरी चारचाकी घेऊ शकता तुम्ही. यासाठी अनेक योजना घेऊन बँका तुमच्या

खिशात दमडी नसेल तरी चालेल, पत असायला हवी. मग, घरात अन्नाचा दाणा नसला तरी चारचाकी घेऊ शकता तुम्ही. यासाठी अनेक योजना घेऊन बँका तुमच्या घराशी लोळण घेऊ शकतात. साधी शिपायाची नोकरी तुम्हाला चांगली पत मिळवून देऊ शकते. शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र हे सुख नाही. हजार-दोन हजारांच्या कर्जासाठी सात-बारा जमा करुनही कर्जासाठी उंबरठे झिजवावे लागतात त्या बिचाऱ्याला. बँकांना सात-बारा नव्हे तर पे-स्लीप लागते. शेतकऱ्यांनी ती आणायची कोठून?सलग चार वर्षांपासून दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नाही. दरवर्षी खाण्यापुरती ज्वारी तरी निघायची. यंदा तीही नाही. अनेक शेतकऱ्यांना हायब्रिड विकत घेऊन पोट भरावे लागेल. ते विकत कसे घ्यायचे, त्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण, पोट भरण्यासाठी म्हणजे भाकरीसाठी कुठलीही बँक कर्ज देत नाही. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना तर दारातही उभे केले जात नाही. शेतकऱ्यांचा हा भाकरीसाठीचा भोग आठवण्याला एक निमित्त आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबादेत ‘रोटी बँके’ची स्थापना झाली. कुठलीही पत न पाहता ही बँक तुम्हाला भाजी-भाकरी देते. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरचे संस्थापक युसूफ मुकाती यांनी ही बँक सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून ते या सेंटरमार्फत महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देतात. संगणकापासून ते मेहंदीपर्यंतचे विनामूल्य प्रशिक्षण येथे दिले जाते. सर्व जाती-धर्मातील जवळपास दहा हजार महिलांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभे केले आहे. स्मार्ट सिटीच्या वाटेवर असलेल्या औरंगाबाद शहरात अनेक लोकांच्या नशिबी दोन वेळची भाकरीही नाही. भिकारी भीक मागून पोट भरतील. मध्यमवर्गीयांना तीही मागता येत नाही. दोन वेळच्या भाकरीसाठीचा हा भोग युसूफभार्इंना स्वस्थ बसू देत नव्हता. उत्तर प्रदेशातल्या कुठल्या तरी शहरात ‘रोटी बँके’ची बातमी त्यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली आणि भुकेल्या औरंगाबादकरांची पोट भरण्याची सोय झाली. शहरात एकीकडे रिकाम्या पोटी झोपणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी शिल्लक अन्न वाया घालविणाऱ्यांची संख्याही कमी नाही. शिल्लक राहिलेले हे चांगले अन्न त्यांनी एका पाकिटात घालून या बँकेत आणून जमा करावे, असे आवाहन युसूफभार्इंनी केले. पाहाता-पाहाता २५० अन्नदात्यांनी नोंदणी केली. सध्या औरंगाबादेत सकाळ-संध्याकाळ अशी २५० पाकिटे दररोज जमा होतात. बँकेतील एका फ्रिजरमध्ये हे अन्न ठेवले जाते. एकावेळी ७५० पाकिटे बसतील, एवढे मोठे फ्रिज बनवून घेण्यात आले आहे. चांगलेच अन्न घेण्याची आणि देण्याची काळजी या बँकेत घेतली जाते. सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत ही बँक सुरू राहते. यासाठी एक कर्मचारीही नेमला आहे. रात्री आठनंतर बँकेत एकही पाकिट शिल्लक राहत नाही. त्यानंतरही रिकामे पोट घेऊन येणारे अनेक असतात. पण त्यासाठी पाकिट राहात नाही. श्रीमंत माणसाला दोन भाकरी आणि भाजीचे पाकिट जड नाही. पण ते देण्याची श्रीमंती असावी लागते. सध्या औरंगाबादेत अशी श्रीमंती केवळ २५० जणांकडेच दिसते. महिनाभरात अन्नदात्यांची ही संख्या सातशेवर जाईल, असा दावा युसूफभाई करतात. दररोज ही अडीचशे पाकिटे घेऊन जाणारे कोण? यातले केवळ २० टक्के भिकारी असतात. म्हणजे उर्वरित ८० टक्के लोक ही बँक सुरू होण्याआधी दररोज उपाशीपोटी झोपत असणार. कारण त्यांना आपला समाज भीकही मागू देत नाही. औरंगाबादेत सोय झाली. राज्यातील इतर शहरांचे काय? खेडेगावात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? महासत्ता, स्मार्ट सिटी, विदेशी गुंतवणूक असे मोठमोठे शब्द वापरुन आम्ही भले विकासाची हवा निर्माण करत असू. मात्र, आमची खरी लढाई आहे ती पोट भरण्याची. ही लढाई लढण्यासाठी प्रत्येक शहरात अशी बँक सुरू व्हायला हवी. ती जबाबदारी कोणाची? अर्थात, दोनवेळा पोटभर जेवण करुन ढेकर देणाऱ्या प्रत्येकाची. - गजानन दिवाण