शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ह्यबँग बँगह्ण!

By admin | Updated: October 20, 2014 01:02 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते.

हेमंत देसाई( जेष्ठ पत्रकार) - काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत जाऊन पवारशाहीवर शरसंधान साधले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रथम स्थानावर येईल, हा अंदाज होताच. महायुतीत असतानाही शहा यांनी पूर्ण बहुमताने भाजपाला निवडून देण्याची हाक दिली होती. मात्र, शतप्रतिशत भाजपा हे महाराष्ट्राला मान्य नसल्याचे दिसते. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सत्यशोधक चळवळ व नंतरची ब्राह्मणेतर चळवळ यामुळे महाराष्ट्रात मध्यम व कनिष्ठ जाती सत्तेच्या परिघात उतरू लागल्या होत्या. पुढे हीच गोष्ट लोकशाही चौकटीत बसवून आपली सामाजिक मुळे पक्की करण्याचे कसब काँग्रेसने बेरजेच्या राजकारणातून दाखवले. त्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून काँग्रेस ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचली, तर समाजवादी पक्ष व जनसंघ शहरांतच होते. राज्यातील जनाधार असलेल्या नेत्यांना लगाम घालून आपल्या प्याद्यांना पुढं आणायचे, या इंदिराजींच्या तंत्रामुळे १९७0च्या दशकाच्या उत्तराधार्पासून काँग्रेस विस्कटू लागली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला, तेव्हा दलित, आदिवासी, मुसलमान, कनिष्ठ जाती काँग्रेसकडे व मुख्यत: मराठा आणि काही प्रमाणात ओबीसी राष्ट्रवादीकडे, असे चित्र तयार झाले. आघाडी सरकारचा कारभार दिवाळखोरीचा असूनही, विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणामुळे तो चालू राहिला. युती भंगली, त्यामुळे भाजपाला आपण शिवसेनेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून देता आले. मात्र तरीही, भाजपाला महाराष्ट्रातला काँग्रेसी पाया उखडून टाकता आलेला नाही, हे सर्वात महत्त्वाचे. मोदी यांचा करिश्मा व भाजपाचे आर्य चाणक्य अमित शहा यांची व्यूहरचना नसती, तर भाजपाच्या प्रदेश नेत्यांना ही निवडणूक जिंकता आली नसती. याचे कारण उत्तमराव पाटील व गोपीनाथ मुंडेंसारखे नेते आज पक्षात नाहीत. माध्यमांच्या बळावर सध्या जिल्हा नेते प्रादेशिक नेते म्हणून गाजत आहेत. शिवाय ज्या पक्षाचे सरकार केंद्रात असते, त्याचेच सरकार राज्यात असावे, या जनभावनेचा भाजपाला लाभ झाला.उद्धव ठाकरेंच्या मागे आज बाळासाहेब ठाकरे नाहीत. पक्ष प्रादेशिक असल्यामुळे त्यांच्यामागे कोणी राष्ट्रीय करिश्मा असलेले नेते नाहीत. तरीसुद्धा त्यांनी हिमतीने यश मिळवले. मात्र, सेनेने जो गुजराती विरुद्ध मराठीचा संघर्ष उभा केला, तो सेनेच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यास उपयुक्त ठरला असला, तरी अव्वल स्थान मिळवण्याइतका तो मुद्दा महत्त्वाचा नव्हता. शिवाय, तो राज्यव्यापी मुद्दा ठरू शकत नव्हता. राज्याचे ५0 टक्के नागरीकरण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक, कारखाने, रोजगार, एलबीटी, वाहतूक, पर्यटन, स्त्रीसुरक्षा हे प्रश्न भाजपाने रास्तपणे अजेंड्यावर घेतले. त्यामुळे शहरी मध्यमवर्ग, स्त्रिया, तरुणांनी भाजपाला डोक्यावर घेतले. ह्यमी अखंड आशावादीह्ण असे म्हणत राष्ट्रवादीने प्रगतीचे ढोल पिटले, परंतु लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. काँग्रेसने स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाची जाहिरात करताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रकाशझोतात ठेवले. पण मुख्यमंत्री स्वच्छ, मात्र त्यांच्या शेजारचे, म्हणजे राष्ट्रवादीचे घर अस्वच्छ हे जनतेला दिसत होते. सर्व माजी मुख्यमंत्री बाबांच्या विरोधात. लोकशाही आघाडीत परस्परविरोध इतका होता की, खरे तर वेगळ्या विरोधी पक्षाची गरजच नव्हती! एवढे असूनही, ग्रामीण महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकांच्या इतके विधानसभेत आघाडीला लाथाडलेले नाही. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला नसता व बाबांनी स्वच्छतेबरोबरच सर्वांना बरोबर घेऊन धडाक्यात निर्णय घेतले असते, तर?... या निवडणुकीत उद्धवला तुच्छ लेखणारे नारायण राणेंचे व राज ठाकरे यांच्या मनसेचे पानिपत झाले. ब्लू प्रिंटवाल्यांचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. स्वत:ची रेघ मोठी करण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग माहीत नसलेल्यांना लोकांनी ताळ्यावर आणले. उलट एमआयएमला पहिल्या फटक्यात जे यश मिळाले, ते काँग्रेसने मुस्लिमांची निराशा केल्यामुळे.निकाल लागताच पवारांनी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. देशाला हिंदू धर्मांधतेपासून धोका आहे, प्रज्ञासिंह ठाकूर प्रभृतींना वाढवण्याच्या शक्तीपासून सावध राहा, असे पवार म्हणत होते. आता ते म्हणतात, ह्यराज्याला स्थिर सरकार हवे आहेह्ण. पण भाजपाचे सरकार स्थिर झाल्यास धर्मांधतेची विषवल्ली वाढणार नाही का?