शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

बिल-मेलिंडा घटस्फोटामुळे गरिबांची अडचण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 07:42 IST

जगातील सर्वांत श्रीमंतांच्या पहिल्या क्रमांकावर आहेत जेफ बेझोस, दुसऱ्या स्थानी आहेत एलन मस्क आणि तिसऱ्या स्थानावर आहेत बर्नार्ड अरनॉल्ट.

बिल गेट‌्स. सध्याच्या घडीला जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत व्यक्ती. फोर्ब्जच्या ३५व्या सूचीनुसार सध्या त्यांची संपत्ती आहे, सुमारे १२४ बिलिअन डॉलर्स! सोपं करून सांगायचं तर त्यांची दर सेकंदाची कमाई आहे १२ हजार ५४ रुपये, दिवसाची कमाई आहे १०२ कोटी रुपये! त्यांनी रोज साडेसहा कोटी रुपये खर्च करायचे ठरवले तरी आत्ता आहेत तेवढे पैसे खर्च करायला त्यांना २१८ वर्षं लागतील! जगातील सर्वांत श्रीमंतांच्या पहिल्या क्रमांकावर आहेत जेफ बेझोस, दुसऱ्या स्थानी आहेत एलन मस्क आणि तिसऱ्या स्थानावर आहेत बर्नार्ड अरनॉल्ट. बिल गेट‌्स हे जगातले पहिले सर्वांत कमी वयाचे अब्जाधीश. वयाच्या ३१ व्या वर्षी ते अब्जाधीश बनले होते. २००८ पर्यंत  त्यांचा हा विक्रम अबाधित होता. त्यानंतर २३ वर्षांचे असतानाच फेसबुकचे मार्क झुकरबर्ग अब्जाधीश बनले आणि बिल यांचा विक्रम त्यांनी मोडला. जगातील सर्वाधिक श्रीमंतांमधील एक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक इत्यादी कारणांनी बिल गेट‌्स प्रसिद्ध असले तरी जगात ते सर्वाधिक नावाजले जातात, ते त्यांच्या दानशूरपणामुळे. आपल्या ‘बिल ॲण्ड मेलिण्डा गेट‌्स फाउंडेशन’तर्फे जगभरातील अनेक देशांना, गरजूंना त्यांनी मदत केली आहे. एवढेच नव्हेतर, जगाच्या  अस्तित्वालाच धोका पोहोचवू शकतील असे साथीचे रोग, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी संशोधकांना प्राेत्साहित करण्यामध्येही बिल गेट्स आघाडीवर आहेत. आपली संपत्ती अशा तऱ्हेने जगाच्या कल्याणासाठी  वापरण्याचा प्रयत्न करणारा एक अत्यंत संवेदनशील विचारी उद्योगपती म्हणूनही त्यांची ख्याती आहे.आपल्या तब्बल २७ वर्षांच्या संसारिक आयुष्यानंतर बिल आणि मेलिंडा गेट‌्स विभक्त होत असल्याच्या बातमीनं अनेकांना धक्का बसला. ६५ वर्षांचे बिल आणि आणि ५६ वर्षांच्या मेलिंडा यांच्यात काही कुरबुर असेल याची पुसटशीही शंका कधी कोणाला आली नाही. अपवाद फक्त एका घटनेचा. गेल्या वर्षी त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि  वॉरेन बफे यांच्या ‘बर्कशायर हाथवे’च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर’पदाचा राजीनामा दिला. आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असं कारण त्यांनी त्या वेळी सांगितलं होतं. तरीही अनेकांना याबाबत काही शंका आली नव्हती.  ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मॅकेन्जी स्कॉट यांच्या ‘महागड्या’ घटस्फोटाशी अनेकांनी बिल आणि मेलिण्डा गेट‌्सच्या घटस्फोटाची तुलना केली. पण, गेट‌्स यांच्या घटस्फोटाचा परिणाम केवळ त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या संपत्तीवरच होणार नाही, तर अख्ख्या जगावर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. ‘बिल ॲण्ड मेलिंडा गेट‌्स फाउंडेशन’तर्फे जगभरात आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक कार्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. या साऱ्याच क्षेत्रातला पैसा आता आटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेट‌्स यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा उपक्रमांवर आतापर्यंत ५० अब्ज डॉलर (साडेतीन लाख कोटी रुपये)पेक्षाही अधिक रक्कम खर्च केली आहे.  कोरोना लसीच्या संदर्भात तर त्यांचं मोठं योगदान आहेच; पण जगातल्या शंभरपेक्षाही अधिक गरीब देशांसाठी ‘कोवॅक्स’ नावाचा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. त्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या साऱ्याच उपक्रमांवर गेट‌्स यांच्या घटस्फोटामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर रॉब राइख यांच्या मते या घटस्फोटाचा परिणाम अख्ख्या जगावर आणि तिथे सुरू असलेल्या सेवाभावी कार्यांवर पडू शकतो.  याआधी २०१० मध्ये बिल गेट‌्स आणि वॉरेन बफे यांनी ‘गिव्हिंग प्लेज’ नावाचा उपक्रम सुरू केला होता. त्यासाठी जगभरातील श्रीमंतांना सेवाभावी कार्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या माध्यमातूनही बराच पैसा गोळा झाला होता. बिल गेट‌्स यांच्या परिवाराकडे आजही अमेरिकेतील सर्वाधिक जमीन आहे. घटस्फोटानंतर आता कोणाच्या वाट्याला किती पैसा येतो, यातही जगातील नागरिकांना प्रचंड रस आहे.  बिल आणि मेलिण्डा गेट‌्स यांनी आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल फारसं भाष्य केलं नसलं तरी यामागे संपत्ती वाचविण्याचा हेतू असावा असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेत बायडेन प्रशासनानं श्रीमंतांवर अधिक कर लादण्याचं धोरण आखलं आहे. त्यामुळे विवाहित असलेल्या आणि अति प्रचंड कमाई करणाऱ्यांना चार टक्के ‘मॅरेज पेनल्टी टॅक्स’ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

कर वाचविण्यासाठी घटस्फोट?‘मॅरेज पेनल्टी टॅक्स’पासून वाचण्यासाठी बिल गेट‌्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असावा, असंही मानलं जात आहे. या तर्काला अनेकांनी दुजोरा दिला आहे. अमेरिकेतील मनी मॅनेजमेण्ट एक्सपर्ट एलविना लो यांच्या मते घटस्फोट ही अत्यंत वैयक्तिक अशी गोष्ट आहे. घटस्फोटाची अनेक कारणं असू शकतात, पण संपत्ती, कर वाचवणं हे जर बिल गेट‌्स यांच्या घटस्फोटाचं कारण असेल, तर निव्वळ घटस्फोट घेण्याच्या निर्णयामुळे बिल गेट‌्स चार बिलियन डॉलर्स (सुमारे तीस हजार कोटी रुपये) वाचवू शकतात! 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसAmericaअमेरिका