शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Bihar Assembly Election 2020: नितीशना तारणारी नारीशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 01:15 IST

बिहारमधील नारीशक्तीने एनडीएला तारले. मोदींबरोबर गेल्यामुळे गेली तीन वर्षे नितीशकुमार हे सर्वत्र टीकेचे धनी झाले होते.

बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले. मात्र मुख्यमंत्रिपदाबद्दल बुधवारी दुपारपर्यंत नितीश यांचे मौन होते. मुख्यमंत्रिपदाभोवती वलय असले तरी जनमताचा पाया नसेल तर ते पोकळ असते. जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी आमदारांची भक्कम संख्या पाठीशी लागते. पन्नास वर्षे राजकारणात काढलेल्या नितीशकुमार यांना हे चांगले माहीत आहे. यामुळे बहुमतातील पक्षाने देऊ केलेले मुख्यमंत्रिपद अल्पमतात राहून ते स्वीकारतील का हा प्रश्न आहे. उलट बाजूने पंधरा वर्षे चालविलेला सुशासनाचा गाडा दुसऱ्या व्यक्तीच्या हाती द्यायचा की सुधारणांना नेटाने अधिक बळ द्यायचे याचा विचारही नितीश यांना करावा लागेल. मुख्यमंत्रिपदी नितीश असणे भाजपसाठी सोयीचे आहे. जाहीरपणे दिलेला शब्द आपण पाळतो, असा प्रचार देशात, विशेषतः महाराष्ट्रात करण्याची संधी भाजपला यातून मिळेल.

नितीश यांच्या पक्षाची संख्या रोडावण्यामागे त्यांचा ढिसाळ कारभार नव्हे, तर चिराग पास्वानचा प्रभावी प्रचार अधिक कारणीभूत ठरला असे मतांची आकडेवारी दाखविते. चिरागनी बंड केले नसते तर नितीशकुमारांच्या पक्षाची संख्या तेजस्वी यादव यांच्या राजदपेक्षा अधिक झाली असती. चिराग व नितीशकुमार यांच्या मतांची बेरीज अनेक ठिकाणी राजदपेक्षा अधिक होते. चिराग यांना अवघी एक जागा मिळाली. मात्र भाजपच्या विरोधात उमेदवार उभे न करून आणि फक्त नितीशकुमार यांच्या विरोधात निवडणूक लढवून भाजप व तेजस्वी यादव या दोघांच्या जागा त्यांनी वाढविल्या. लालूपुत्र तेजस्वीचे कौतुक करताना त्या विजयातील चिरागच्या वाट्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तेजस्वी यादव यांचा प्रचाराचा धडाका मोठा असला तरी नितीशकुमार यांच्या विरोधात लाट उभी करण्यात ते अयशस्वी ठरले.

लालूप्रसादांची अचानक साथ सोडण्याच्या नितीशकुमार यांच्या राजकीय संधिसाधूपणाला जनता धडा शिकविल हा तेजस्वींचा कयास खरा ठरला नाही. मुस्लीम मतदारांबाबतही त्यांचा भ्रमनिरास झाला. यादव-मुस्लीम समीकरण तुटले. मुस्लीम मतदारांना तेजस्वीपेक्षा ओवेसी जवळचे वाटले. प्रत्येक पक्ष मतपेटीसाठी आपला उपयोग करून घेतो ही भावना मुस्लीम मतदारांत वाढली आहे. यामुळे काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद अशा सर्व पक्षांना फटका बसत आहे. यादवांबरोबर अन्य लहान जातींची आघाडी तेजस्वी यादव यांना उभारता आली नाही. त्यांच्या नेतृत्वातील ही महत्त्वाची त्रुटी आहे. 

तरुण व दमदार तेजस्वीसमोर नितीश व मोदी यांचे वयस्कर नेतृत्व फिके पडणार असा होरा होता. तसे झाले नाही. नितीश व मोदी हे मुरलेले राजकारणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात तेजस्वीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी प्रचाराचा रोख सफाईने बदलला. लालू काळातील गुंडाराज विरुद्ध नितीशकुमार यांचे सुशासन असा प्रचाराचा रोख केला. त्याचा प्रभावी प्रतिवाद करणे तेजस्वी यादव यांना जमले नाही. एनडीएला निवडणुकीत का यश मिळाले याची पंतप्रधान मोदी यांनी केलेली मीमांसा इथे लक्ष वेधून घेते. केंद्र व राज्य सरकारच्या कामाला महिलांनी प्रतिसाद दिला, असे मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना व पूर यांचा जबर फटका बिहारला बसला. मात्र याच काळात गरिबांच्या घरात मोफत धान्य मिळत होते व खात्यात पैसेही जमा होत होते. गरिबांच्या घरापर्यंत मदत थेट पोहोचविण्याची जी प्रशासकीय पद्धत मोदी यांनी बसविली आहे त्यामुळे महिला आश्वस्त झाल्या.

मुलींना सायकली, ग्रामपंचायतीत आरक्षण आणि मुख्यतः दारूबंदी अशा धोरणांमुळे नितीशकुमारही महिलांमध्ये लोकप्रिय होते. परंतु, मोदी-नितीश यांनी घातलेल्या लालूंच्या गुंडाराजच्या भीतीने महिलांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास अधिक प्रवृत्त केले. गुंडाराजचा फटका महिलांनाच सर्वाधिक बसला होता. महिला मतदारांच्या संख्येत पाच टक्क्यांनी झालेली वाढ उशिरा लक्षात आल्याने एक्झिट पोल चुकले अशी कबुली अक्सिस इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनीही दिली.

बिहारमधील नारीशक्तीने एनडीएला तारले. मोदींबरोबर गेल्यामुळे गेली तीन वर्षे नितीशकुमार हे सर्वत्र टीकेचे धनी झाले होते. परंतु, त्यांचा कारभार बिहारमध्ये सुव्यवस्था निर्माण करणारा होता. बिहारमधील समस्या अतिशय जटिल असल्यामुळे त्या झटपट पूर्णपणे सुटणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत राजकीय प्रतिष्ठेपेक्षा आपण सुरू केलेल्या योजना पूर्ण करण्यास नितीशकुमार यांनी यापुढे महत्त्व दिले आणि भाजपने मतलबी राजकारण केले नाही तर सुशासित कारभार अजून पाच वर्षे सुरू राहू शकतो.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक