शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुटीचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:43 IST

एडिटर्स व्ह्यू

मिलिंद कुलकर्णीभाजपचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त टळला आहे. कोठेतरी माशी शिंकली. आता विजयादशमीचा मुहूर्त सांगितला जात असला तरी खडसे यांचा सूर बदललेला दिसतो. प्रथेप्रमाणे माध्यमांच्या माथ्यावर खापर फोडून खडसे मोकळे झाले. तरी पक्षांतराची प्रक्रिया पाहता पडद्या आड घडणाºया घडामोडी आणि त्या फलद्रूप होण्यासाठी करावे लागणारे सायास हे राजकीय नेत्यांना पुरते ठावूक आहे. त्यामुळे खडसे आता वेळ घेणार आहेत.भारतीय राजकारणातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात फूट आणि पक्षांतराचा इतिहासदेखील मोठा आहे. अलिकडे १९९९ मध्ये महाराष्टÑात काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मोठे  राजकीय वादळ आले. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नेते काँग्रेस सोडून गेले. त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष या वादळातून अद्यापही सावरलेला नाही. लोकसभेची एकही जागा त्यानंतर काँग्रेस जिंकू शकलेला नाही. विधानसभेची जागा देखील दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या खात्यात जमा झाली.१९९९ च्या फुटीनंतरही दोन्ही काँग्रेसमध्ये सत्तेसाठी समझोता झाला. केद्र व राज्य सरकारमध्ये राष्टÑवादी काँग्रेस सहभागी झाली. १५ वर्षांची ही आघाडी २०१४ मध्ये फुटली. दोन्ही काँग्रेसने त्यावेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. १५ वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसची अवस्था दयनीय राहिली. अर्थात फटका राष्टÑवादीलादेखील बसला. केवळ एक आमदार निवडून आला. त्यामुळे पक्षांतर आणि त्याचा राजकीय पक्षांवर होणारा परिणाम अभ्यासताना १९९९ व २०१४ या दोन विधानसभा निवडणुकांकडे बघायला हवे.१९९९ मध्ये सर्वच मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना -भाजप युती मैदानात उतरले होते. तर २०१४ मध्ये आघाडी व युती तुटली आणि चारही प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. काही मतदारसंघात फुटीचा लाभ युतीला मिळाला होता. परंतु, दमदार, वजनदार राष्टÑवादी नेत्यांनी पक्षांतरानंतरही जागा कायम राखली.१९९९ मध्ये भाजपने ४ तर युतीतील मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने ५ जागा पटकावल्या होत्या. काँग्रेस व राष्टÑवादीला प्रत्येकी एका जागवेर समाधान मानावे लागले. १५ वर्षांच्या राज्यातील आघाडी सरकार नंतरही २०१४ मध्ये काँग्रेसचे अस्तित्व लयास जाऊ लागले तर राष्टÑवादी पुन्हा एकवर आली. भाजप ६ जागा जिंकून मोठा भाऊ झाला, सेनेला ३ जागा मिळाल्या. अमळनेरात अपक्ष उमेदवार निवडून आला.काँग्रेसचे किती पतन या दोन निवडणुकांमध्ये झाले, त्याची आकडेवारी मोठी रंजक आहे. १९९९ मध्ये लढलेले उमेदवार व त्यांची मते आणि (कंसात २०१४ मधील उमेदवार व त्यांची मते) पाहता हे ठळकपणे लक्षात येईल. चोपडा : लहू हिराजी पाटील : १६१८९ (ज्ञानेश्वर भादले : १०२८०), रावेर : राजाराम गणू महाजन  :विजयी : ४७७१९ (शिरीष चौधरी : ५५९६२),  जळगाव : डॉ.अर्जुन भंगाळे  ४१२८० (डॉ.राधेश्याम चौधरी ४०१४), अमळनेर : डॉ.अनिल शिंदे २२५२३ (गिरीश सोनजी पाटील १४५८), पारोळा : प्रदीप पवार २४६९९ (एरंडोल : प्रवीण वाघ : १६७०), पाचोरा : डी.एम.पाटील १४४५३ (प्रदीप पवार ४९०४), जामनेर : डॉ.सुरेश पाटील २१३७५ (ज्योत्स्ना विसपुते २६९५), मुक्ताईनगर : डॉ.जी.एन.पाटील २६६७६ (योगेद्रसिंह पाटील ४४९५), जळगाव ग्रामीण (डी.जी.पाटील ३९६८) व चाळीसगाव (अशोक खलाणे ३३२८), भुसावळ  (पुष्पा सोनवणे :३००५) या तीन जागांवर १९९९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार नव्हते.चोपडयात अरुणभाई गुजराथी यांनी जागा राखली. मात्र २०१४ मध्ये राष्टÑवादीला ही जागा गमवावी लागली. माधुरी किशोर पाटील पराभूत झाल्या. मावळते आमदार जगदीश वळवी हे भाजपकडून लढले होते. शिवसेनेचे प्रा. चंद्रकांत सोनवणे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांना जळगाव मतदारसंघात थोडया मतांनी दोनदा पराभव स्विकारावा लागला होता.याउलट रावेरमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे पूत्र शिरीष चौधरी यांना १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुनही पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे राजाराम गणू महाजन निवडून आले. २०१४ मध्ये शिरीष चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार असूनही पराभूत झाले. भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले होते.भुसावळ मतदारसंघात शिवसेनेचे संतोष चौधरी यांनी १९९९ मध्ये बंड करुनदेखील दिलीप भोळे आमदार झाले. चौधरी दुसºया क्रमांकावर तर राष्टÑवादीचे वासुदेव इंगळे तिसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मध्ये राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री संजय सावकारे यांनी जागा कायम राखली.जळगावात १९९९ च्या निवडणुकीत सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळविला. काँग्रेसचे डॉ.अर्जुन भंगाळे व राष्टÑवादीचे निवृत्त प्राचार्य के.आर.सोनवणे पराभूत झाले. २०१४ मध्ये भंगाळे यांचे नातेवाईक सुरेश भोळे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवून सुरेशदादा जैन (शिवसेना) यांचा पराभव केला. सुरेशदादा जैन यांनी सेना सोडल्यानंतर  झालेल्या २००२ मध्ये पोटनिवडणुकीत राष्टÑवादीतर्फे विजयी झाले.जळगाव ग्रामीण या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघात २०१४ मध्ये चौकोनी लढतीत शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांची सरशी झाली आणि मंत्रिपद मिळाले. राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर व काँग्रेसचे डी.जी.पाटील पराभूत झाले.हा इतिहास पाहता काँग्रेसला नवसंजिवनी मिळेल का या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव