शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जेवढा मोठा प्रकल्प, तेवढा मोठा विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:01 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल

- मनमोहन शर्मानाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ किंवा विरोधक हे नक्कीच संभ्रमावस्थेत असावेत. कारण रिफायनरीमुळे हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण होईल, असा निकष लावला जात असेल; तर तो साफ चुकीचा आहे. कारण या प्रकल्पासाठी सर्वात आधुनिक असे बीएस-व्हीआय प्लस (युरो व्हीआय) निकषांची पूर्तता करणारे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा परिणाम येथील काजू, आंबा किंवा फळबागांवर होईल, या केवळ अफवा म्हणता येतील. तसे असते तर गुजरातच्या वाळवंटी जामनगरमध्ये रिफायनरी प्रकल्प आल्यानंतरही दर्जेदार केसरी आंबा पिकलाच नसता.देशातच नव्हे, तर जगभर इंधनाची गरज वाढताना दिसत आहे. विशेषत: मुंबईसारख्या महानगरात पेट्रोल, डिझेलच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीत कच्च्या तेलावर (क्रूड आॅइल) प्रक्रिया करून पेट्रोलियम पदार्थ मिळणार असतील, तर देशाच्या परकीय चलनात प्रचंड बचत होणार आहे. आजही देशाला ८० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यात प्रक्रिया करण्यासाठीही बाहेरील देशांतील रिफायनरीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी स्वत:ची रिफायनरी असेल, तर नक्कीच कर आणि इतर खर्च टाळता येतील. त्यातून या प्रकल्पात दररोज सुमारे १२ लाख बॅरल्स इतके पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा नक्कीच देशाला आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांना होणार आहे.पर्यावरणावर बोलायचेच झाले, तर विरोध करायला आधारच उरत नाही. कारण आजही चेंबूर येथील रिफायनरी आणि त्याशेजारी असलेल्या मानवी वस्त्यांकडे पाहून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ६० वर्षांपूर्वी उभारलेल्या या रिफायनरीत कालांतराने बदल केले गेले. तरीही या ठिकाणी प्रदूषणाची समस्या जाणवत नाही. याउलट नाणार प्रकल्पात सर्वात आधुनिक पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे विविध पेट्रोलियम पदार्थ मिळवताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. देशातील जामनगर, विशाखापट्टणम, मथुरा अशा विविध शहरांचेही दाखले देता येतील.(लेखक आयसीटीचे माजी प्राध्यापक व रसायन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)(शब्दांकन - चेतन ननावरे)

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प