शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अभिहस्तांतरणामुळे इमारतींना फायदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:06 IST

महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका अधिनियम (मोफा) १९६३च्या कलम ११नुसार संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमीन व त्यावरील इमारतीचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध यांचे अभिहस्तांतरण विलेख निष्पादित करणे विकासकावर बंधनकारक आहे.

- रमेश प्रभूमहाराष्ट्र मालकी हक्क सदनिका अधिनियम (मोफा) १९६३च्या कलम ११नुसार संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमीन व त्यावरील इमारतीचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध यांचे अभिहस्तांतरण विलेख निष्पादित करणे विकासकावर बंधनकारक आहे. कायद्यात अशी तरतूद असूनही कित्येक वर्षांनंतरही अनेक इमारतींना अभिहस्तांतरण मिळत नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे अभिहस्तांतरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सदर अधिनियमात व नियमात सुधारणा करण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्या समितीने केलेल्या शिफारशींप्रमाणे मानीव अभिहस्तांतरण ही संकल्पना दि. २५/०२/२०११च्या शासन निर्णयान्वये अंमलात आली. या शासन निर्णयाप्रमाणे अर्जदार संस्थेने सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्या १२ होती, परंतु सदर कागदपत्रांची पूर्तता करताना गृहनिर्माण संस्थांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती दि. २९ मार्च २०१६ साली गठीत केली. त्या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन, मानीव अभिहस्तांतरणासाठी सुधारित आदेश शासनाने दि. १४ जून २०१६ रोजी जारी केले. या आदेशान्वये कागदपत्रांची संख्या १२ वरून ८ इतकी निश्चित करण्यात आली.आता महाराष्ट्र राज्यात दि. ०१ मे २०१७ पासून महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) कायदा अंमलात आला असून, सदर कायदा व त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या तरतुदींनुसार ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशी इमारतींची नोंदणी गृहनिर्माण प्राधिकरणाकडे करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे मानीव अभिहस्तांतरणासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे विचारात घेऊन संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने आता मानीव अभिहस्तांतरण संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१/दु व पु-२ अन्वये प्रस्तुत केल्या आहेत. यानुसार, दि. १४ जून २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील मानीव अभिहस्तांतरणाच्या अर्जासोबत सादर करायच्या आवश्यक कागदपत्रातील अनुक्रमांक ७ मधील नियोजन प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्राऐवजी पुढील मजकुराचा समावेश करण्यात आला आहे.मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्राऐवजी इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे, तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदा-या/दायित्व स्वीकारण्यास तयार असल्याचे स्वप्रमाणपत्र घेण्यात यावे. मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, संस्थेने मुंबई महानगरपालिका किंवा संबंधित नागरी स्थानिक संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.(लेखक महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)80-90% आज महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण मिळालेले नाही. या संस्थांतील अनेक इमारती या जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत. त्यांना अभिहस्तांतरण न मिळाल्यामुळे त्यांची दुरुस्ती वा पुनर्विकास करता येत नाही. अशा सर्व इमारतींना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. शासनाचा हा अतिशय स्तुत्य निर्णय आहे आणि अभिहस्तांतरण न झालेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा.तसेच मानीव अभिहस्तांतरणाचा अर्ज उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर करतेवेळी अजार्ची एक प्रत मुद्रांक व नोंदणी कार्यालयात सादर करण्यात यावी, जेणेकरून मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया गतिमान होईल.>आताच्या सुधारित शासन निर्णयाप्रमाणे गृहनिर्माण संस्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावयाची आहेत:- मानीव अभिहस्तांतरणासाठी मोफा कायद्याच्या नियमामधील नमुना ७ मधील अर्ज. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्रची प्रत. विकासकाने मंजूर करून घेतलेल्या रेखांकनामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व्हे/गट नंबरचा ७/१२ उतारा किंवा मिळकत पत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा. प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स २ किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुरावा जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकूमनामा किंवा मृत्युपत्र इ. सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांरण करून देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म (अपार्टमेंट) अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस. संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची यादी. इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे, तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदा-या/दायित्व स्वीकारण्यास तयार असल्याचे स्वप्रमाणपत्र. नियंत्रित सत्ता प्रकार, नवीन अविभाज्य शर्त किंवा भोगवटाधारक वर्ग २ अशा नोंदी ७/१२ वर किंवा मिळकत पत्रिकेवर असल्यास सक्षम प्राधिका-याची जमीन हस्तांतरणासाठी किंवा बिनशेती करण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आदेशाची प्रत (लागू असल्यास).