शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

सौंदर्याचे स्तोत्रकार

By admin | Updated: August 4, 2016 05:26 IST

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल.

कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल. या विश्वात जर कोणती रचना नसती, सुसंगती नसती तर माणूस अस्वस्थ झाला असता. त्यामुळे कुठे व्यवस्था, रचना, तालबद्धता, सुसंगती दिसली की, तो आनंदित होतो आणि या विसंगत जीवनात आपल्याही प्रतिभेप्रमाणे काही रचना करावी, सुसंगती निर्मावी असे त्याला वाटते. त्याच्या या आर्त इच्छाशक्तीतूनच मानवी संस्कृतीचा आणि त्याच्या पुढे सर्व कलांचा जन्म झाला. कलावंत हे निसर्गाच्या सौंदर्याचे खरे पुजारी आहेत, उपासक आहेत. तेच सौंदर्याचे स्तोत्रकार आहेत आणि सौंदर्याचे भाष्यकारही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ते जगातील सौंदर्य स्वत: समजावून घेतात आणि कलेच्या माध्यमातून त्या सौंदर्याचा अर्थ जगाला सांगतात. सौंदर्य म्हणजे काही एक वस्तू नाही तर सौंदर्याच्या अनेक जाती असल्याचे दिसून येते. सौंदर्य हे निरनिराळ्या स्थळी निरनिराळ्या रुपात प्रकट होत असते. याचा शोध आणि बोध घ्यायला हवा. उंच उंच पर्वतांची बर्फाने आच्छादलेली आणि गगनाचे चुंबन घेणारी उत्तुंग शिखरे. खळखळत जाणाऱ्या विस्तीर्ण नद्या, त्यांच्या काठावरील फुललेली वनश्री, त्या वनश्रीत-हिरवाईत राहून निसर्गात संगीत निर्माण करणारे पशु-पक्षी, वर्षाकाळामध्ये पृथ्वीच्या मस्तकावर अभिषेक करणाऱ्या मेघांच्या रांगा, त्या कृष्णमेघांच्या विविध छटा आणि आकार, निरनिराळ्या ऋतुंमध्ये पृथ्वीच्या हृदयातून फुलांच्या, फळांच्या, पिकांच्या रुपाने निर्माण होणारी रंगाची, गंधाची, रुचीची अनंत दौलत ही निसर्गाच्या सौंदर्याची मनमोहक दालनेच. निसर्ग सौंदर्याबरोबरच मानवनिर्मित सौंदर्यही मनाला किती आकर्षित करते, हे वेगळे सांगायला नकोच.ग्रामीण संस्कृतीतील पाणवठ्यावर झऱ्याच्या झुळझुळण्याबरोबर पाणी पिण्यासाठी थोपलेला गुरांचा तांडा, हातातली घुंगुरकाठी फिरवीत त्यांच्यामागे शीळ घालणारा गुराखी, खेडेगावातील पाणवठ्यावरून डोक्यावर घागरीवर घागरी घेऊन हसत-खेळत चाललेल्या स्त्रिया, पांदीच्या वाटेतून घुंगरांचा आवाज करीत निघालेली बैलगाडी हे सारे सौंदर्यच नाही का? पण ते टिपायला रसिकतेची दृष्टी असावी लागते. ग्रामीण संस्कृतीतील हे सौंदर्य नागर संस्कृतीत दुरापास्त झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे रसिकताही कमी झाली आहे. कला, सौंदर्य दृष्टी निर्माण करण्याची गरज आहे.रसिकतेने विश्वाचे ते सौंदर्य अनुभवणे हीच आनंदाची दृष्टी असते आणि तीच आनंदाची सृष्टी निर्माण करते. त्यामुळे माणसाने आनंद द्यायला आणि घ्यायलाही शिकायला हवे. कलादृष्टी विकसित करायला हवी.-डॉ. रामचंद्र देखणे