शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

बावनकशी

By admin | Updated: April 5, 2017 00:01 IST

किशोरीताई गेल्या, हे माझं अतीव व्यक्तिगत दु:ख. शोक. घरातली वडीलधारी व्यक्ती गमावली मी!

किशोरीताई गेल्या, हे माझं अतीव व्यक्तिगत दु:ख. शोक. घरातली वडीलधारी व्यक्ती गमावली मी!माझ्या बालपणापासून मी त्यांच्या जवळ होतो. माझे वडील वामनराव देशपांडे हे मोगूबाई कुर्डीकर यांचे शिष्य. किशोरीतार्इंनीही मोगूबार्इंकडे संगीताचे धडे गिरवले. किशोरीताई गानसरस्वती म्हणून ओळखल्या जात नव्हत्या, तेव्हापासून त्यांचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या तारुण्यातला संघर्षाचा काळ, घराण्याच्या चौकटीतून आपली नवीन पायवाट निर्माण करून त्यावरून हट्टाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न... या सगळ्यात जे जे किशोरीतार्इंच्या मागे उभे राहिले, त्यात माझे वडीलही होते. किशोरीतार्इंच्या या संघर्षाचा मी लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. सत्तरच्या दशकात काही वर्षं फार बिकट होती. त्यांचा आवाज त्यांना सोडून गेल्यासारखी परिस्थिती ओढवली होती. त्यावेळची त्यांची जीवघेणी उलघाल मी पाहिली आहे. फार कठीण काळ होता तो. आणि त्या काळाचे व्रण नंतर आयुष्यभर राहिले असणार त्यांच्या मनावर.किशोरीतार्इंच्या समकालीन गायकांमध्ये ख्याल गायन म्हणजे व्याकरणाने परिपूर्ण असं सुनिश्चित गायन झालं होतं. ख्यालाची एका विशिष्ट प्रकारे प्रस्तुती व्हायला लागली होती. त्याला किशोरीतार्इंनी आपल्या प्रयत्नांनी छेद दिला. मानवी सुख-दु:खांची कहाणी संगीतातून अभिव्यक्त झाली पाहिजे, असं त्या मानायच्या. याबाबत दुमत असू शकेल, पण त्यांची ही भूमिका कोणत्याही देशातील संगीत गायकाला टाळता येण्यासारखी नाही. हे त्यांचं खूप मोठं सांगीतिक योगदान आहे.मैफलीत रंग भरणं ही मोठी कष्टसाध्य कला असते. प्रस्तुत करायच्या रागाच्या मांडणीसाठी वातावरण निर्माण करण्यापासून गायकाचा एक संघर्ष सुरू असतो. किशोरीताई मूडी आहेत, असा त्यांच्यावर नेहमी आरोप व्हायचा; कारण त्यांचा हा संघर्ष फार अटीतटीचा होता. असणार. गायला बसल्यावर राग प्रसन्न झाल्याशिवाय त्या सुरुवात करत नसत. घरून निघाल्यापासून मैफलीच्या ठिकाणी पोचेपर्यंत त्या अस्वस्थ असायच्या. आपण वेळेवर पोचू की नाही, तंबोरा मिळाला की नाही इथपासून छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांना फार त्रास देत. बेचैन करत. मैफलीआधीचा संघर्ष तो हा!किशोरीताई या अशा अखंड पेटत्या भट्टीतून बावनकशी सोन्याची लगड शोधत. त्यांनी आपल्यासमोर रागनिर्मितीचं उत्पादन नव्हे, तर प्रक्रि या मांडली. म्हणून माझ्या दृष्टीने किशोरीतार्इंची एखादी न जमलेली मैफल ही झुबीन मेहताच्या जमून आलेल्या सिम्फनीपेक्षा श्रेष्ठ होती.किशोरीतार्इंनी स्वत:चा एक फॉर्म्युला कधीच बनवला नाही. ते खूप सोपं असतं. कारण, अनेक लोकप्रिय गायक एखादा फॉर्म्युला बनवून नेहमी तोच तो गात राहतात. किशोरीतार्इंसारखी प्रतिभावंत गायिका त्या वाटेला फिरकणंही शक्य नव्हतं.माझा त्यांच्याशी केवळ एकाच गोष्टीबाबत मतभेद होता. मी त्यांना म्हणायचो, ‘रागाचा एक भाव असतो. स्वरांना काहीतरी सांगायचं असतं हे बरोबर आहे. मात्र, तुम्हीच एकट्या अनुग्रहित आहात का, की स्वरांनी त्यांचं म्हणणं केवळ तुम्हाला सांगितलं आणि इतरांना सांगितलं नाही? तुम्ही तो भाव निश्चित करू नका. प्रत्येकाला स्वत:चा भाव असू द्या. कारण, बरेचदा रागामध्ये जो भाव निर्माण होतो, तो गायकाच्या मनोवृत्तीचा परिणाम असतो.. नाही का?’त्या हसत.कुमारजी नाही का एखादा राग कधी हसरा, नाचरा करून, तर कधी गंभीर, धीरोदात्त करून गायचे. किशोरीतार्इंनी संगीतात भावविचार रुजवला. बरेचदा सर्व काही शास्त्रशुद्ध, अचूक, सुरेल असतं, पण रागांचा असर निर्माण होत नाही. मानवी सुखदु:खाच्या ताण्याबाण्यांची कहाणी अभिव्यक्त करायला संगीत सक्षम नसेल तर त्याचा उपयोग काय? ते ताणेबाणे अखंड विणत गेलेली किशोरीतार्इंची संगीतसेवा ही अनोखी ठरली आणि ती चिरकाळ स्मरणात राहील.- पं. सत्यशील देशपांडे(पं़ कु मार गंधर्वांच्या शिष्य परंपरेतील ख्यातनाम गायक)