शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतपेटीपूर्वी रस्त्यावरची लढाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:49 IST

राज्यमंत्री दादा भुसे व भाजपा नेते अद्वय हिरे समर्थकांत सुरू झालेली हातापायी उद्याच्या ‘लढाई’चे संकेत देणारीच आहे.

राज्यमंत्री दादा भुसे व भाजपा नेते अद्वय हिरे समर्थकांत सुरू झालेली हातापायी उद्याच्या ‘लढाई’चे संकेत देणारीच आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून काहीसा अवकाश असला तरी, त्यादृष्टीने ताबूत गरम झालेल्या इच्छुकांनी आतापासूनच त्यासाठीची लढाई रस्त्यावर आणून ठेवली आहे. मालेगावमध्ये त्याचे प्रत्यंतर घडविणाºया घटना घडू लागल्याचे पाहता राजकीय जाणकारांच्या भुवया वक्री होणे तर स्वाभाविक ठरावेच; शिवाय नेत्यांसाठी काम करणाºया कार्यकर्ते-समर्थकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होणेही क्रमप्राप्त ठरावे.केंद्र शासनाच्या निर्णयामुळे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊ घातल्याने मालेगावच्या विकासाला अधिक चालना मिळण्याची आशा बळावून गेली आहे. या जोडीला मालेगाव जिल्हानिर्मितीची मागणीही पूर्णत्वास नेता आली तर तो दुग्धशर्करा योग ठरेल. त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पक्षविरहितपणे पाठपुराव्याची गरज आहे. पण ते करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे मालेगावमधील नेतेच आपसात भांडताना व परस्परांवर कुरघोडीचे राजकारण करताना दिसून येत असल्याचे शोचनीय चित्र आहे.मालेगाव (बाह्य) मतदारसंघाचे विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे राज्यमंत्रिपद आहे. याच मतदारसंघातील मातब्बर हिरे परिवाराशी असलेले त्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असताना काही घटना अशाही घडल्या की, त्यामुळे भुसे-हिरे यांच्यात जुळून आल्याची चर्चा झडू लागली होती. साधारण महिनाभरापूर्वी भाजपा शहराध्यक्षांच्याच समर्थकांकडून अद्वय हिरे यांना मारहाणीची घटना घडली होती, तेव्हा सत्ताधारी भाजपाचे असतानाही त्यांनी भुसे यांनाच संपर्क करून झाल्या प्रकारात लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर मालेगाव बाजार समितीत काँग्रेसच्या सभापतींवरील अविश्वास ठराव आणताना हिरे व भुसे समर्थकांत हातमिळवणी झाली. त्यामुळे या दोघांतील राजकीय दुरावा दूर झाला की काय, अशी शंका घेतली गेली. परंतु लगेचच राज्यमंत्री भुसे पुत्राकडून अद्वय हिरे समर्थकांना मारहाण घडून आल्याने भुसे-हिरेंमधील समेटाच्या चर्चांवर पाणी फिरले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल होऊन संबंधितांच्या अटकेसाठी निवेदन-उपोषणेही सुरू झाल्याने थंडीच्या दिवसात मालेगावातील राजकीय उष्मा वाढून गेला.अलीकडच्या या हाणामारीमागे प्रासंगिक राजकारणही असावेच; परंतु त्याचबरोबर वर्ष-दीड वर्षांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम म्हणूनही त्याकडे पाहता यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांत शिवसेनेशी स्पर्धा करीत भाजपाने मिळविलेले यश नजरेत भरणारे आहे. हिरे यांच्या नेतृत्वामुळे हे घडून आले. शिवाय, आता आतापर्यंत भुजबळांशी टक्कर घेण्याची भाषा करणारे हिरे मध्यंतरी उच्च न्यायालयातील छगन भुजबळ यांच्या सुनावणीच्या वेळी तेथे पूर्णवेळ उपस्थित राहिलेले दिसलेच, तसेच भुजबळांच्या वाढदिवशी नाशकात लागले नाहीत त्यापेक्षा अधिक शुभेच्छा फलक मालेगावात लागलेले दिसून आले. यातून सामीलकीचे राजकारण करून विधानसभा लढाईची हिरे यांची तयारी स्पष्ट होणारी आहे. अर्थातच, त्यांच्यासमोर विद्यमान राज्यमंत्री दादा भुसे यांचेच आव्हान असेल. तेव्हा, आज रस्त्यावर सुरू झालेल्या लढाईमागे ते आव्हान परतविण्याच्या क्षमतेचे संकेत असतील तर काय सांगावे? अन्यथा, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मंत्रिपुत्राकडून असे धाडस घडते ना ! यातील भय इतकेच की, या अशा लढाईत दोघांच्या समर्थकांचीच फरफट होणे नक्की आहे.- किरण अग्रवाल‘्र१ंल्ल.ँ१ं६ं’@’ङ्म‘ें३.ूङ्मे

टॅग्स :Electionनिवडणूक