शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

बाबा कहता है... अब बस् !

By राजा माने | Updated: July 2, 2018 04:17 IST

महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलला...

महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलला...यमके : नमस्कार गुरुवर्य. काय सेवा करू?नारद : अरे, इकडे मी त्या बाबा पुराणाने वैतागलो आहे आणि तुझ्या मोबाईलवरसुद्धा ‘बाबा’चीच डायलर टोन!यमके : हो, सध्या ‘संजू’ फार्मात आहे ना! सल्लूभाईचे ३८ कोटीचे रेकॉर्डही त्याने मोडले. त्यापेक्षाही मला ‘बाबा कहता है...’ म्हणत अनेक महाभागांचे कंबरडे मोडले, याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मी ती डायलर टोन ठेवली.नारद : (रागात) शतमूर्ख आहेस यमके! त्याने आपल्या तमाम जमातीचे कपडे उतरवून टाकले तरी तुला त्याचेच कौतुक कसे?यमके : गुरुवर्य, मुळात तुम्हीच मला राजकुमार हिराणी-अमीर खानच्या ‘पीके’चा डुप्लिकेट म्हणून इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर म्हणून निवड केली. मग हिराणीचा ‘संजू’च काय, तो करेल ती कृती मला आवडणारच!नारद : प्रश्न आता तुझ्या आवडीचा राहिलेला नाही. डिजिटल जगताने मोठी पंचायत केली आहे. तुझ्या मराठी भूमीतील तमाम बांधवांनी ‘नारद पंचायत’नामक संघटना स्थापन करून थेट इंद्रदेवांनाच ई-मेलद्वारे तक्रार केली आहे.यमके : कशाची आणि कुणाची तक्रार गुरुदेव?नारद : मराठी भूमीतील यदु, एस.एम., भोकरेपासूनच्या ते थेट गावागावातील बोरुबहाद्दरांच्या संघटनांनी मुंबापुरीत तळ ठोकला. त्यांनी ऋषिवर्य केतकर, रायकर, तोरसेकर, खाडिलकर, खांडेकर, निरगुडकर, वागळेंपासून अगदी अभय, अतुल, काथे, देशपांडे, मोईत्रापर्यंतच्या दिग्गजांना गळ घालून ‘नारद पंचायती’ची स्थापना करून लेटरपॅड पण छापले आणि त्यावर इंद्रदेवांना राजकुमार हिराणी यांनी आमचे वस्त्रहरण करून आमची बदनामी केल्याचा तक्रारी मेल पाठविला आहे.यमके : मग त्यात काय एवढे! तुम्ही राजकुमार हिराणीला खेचा इंद्र दरबारात!नारद : अरे, ‘नारद पंचायत’च्या लेटरहेडवरील तक्रार पाहून इंद्रदेवांनी मलाच जाब विचारला आहे. तुमच्या जमातीने थेट माझ्याकडे तक्रार करावी असे काय घडले? असे दटावून विचारले.यमके : गुरुदेव, मी तुम्हाला ‘टेक्नोसॅव्ही’ समजत होतो. अहो, यू ट्यूब चालू करून त्यांना ‘बाबा कहता है... अब बस्!’ हे गाणे आणि दोन्ही ‘संजू’चा डान्सही दाखवायचा होता ना!नारद : अरे, त्यांनी अगोदरच पाहिलेला होता. ‘नारद पंचायती’चा तो अर्ज त्यात विनोद तावडेंकडेही काही बुद्धिजीवींनी ‘बाबा...’ हे गाणे राज्यातील पत्रकारिता अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, अशी मागणी करणारे निवेदनही सादर केल्याचे समजले.यमके : गुरुवर्य, काय चूक आहे त्यात? कळते, समजते, विश्वसनीय सूत्र यातून तुम्ही कधी बाहेर पडणार आहात? टीव्हीच्या खोक्यात बसलो की इंद्रदेवापेक्षाही तुम्ही मोठे असल्याच्या थाटात न्यायनिवाडा करता. पंचायतीचे प्रमुख म्हणून काळानुसार तुम्ही नाही बदललात तर ‘नारद पंचायती’त कसे बदल होतील?नारद : खरं आहे शिष्या! आता मी क्षमा मागून मुक्त तर होईनच, पण समाजाला त्रास होणार नाही अशीच ‘नारदगिरी’ करा, असा संदेशही नारद जमातीस देईन...(तिरकस)

टॅग्स :Sanju Movie 2018संजू चित्रपट 2018