शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदयात्री’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:31 IST

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते.

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते. त्यांच्या घरात रसिकतेची परंपरा असली, तरी गायनाची परंपरा नव्हती. मात्र, अरुण दातेंचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले गाणे खुद्द कुमार गंधर्वांनी शिकविले. एकदा कुमार त्यांना म्हणाले, तू फार छान गुणगुणतोस, तुझा आवाजही चांगला आहे. चल मी तुला गाणे शिकवितो. कुमारांनी त्यांना उर्दू गझल म्हणायला शिकविली. आयुष्यात त्यांनी गायलेली ती पहिली गझल. बिरला समूहातील बड्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत असताना, त्यांनी भावगीत गायनाचे अनोखे पर्व साकार केले होते. जेव्हा नोकरी की भावगीत गायन, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय तत्काळ घेऊन टाकला आणि नोकरीतून मिळणाऱ्या दरमहा ३० हजार रुपये पगाराच्या अनेक पटीने अधिक पैसा आपल्या गायनाच्या कार्यक्रमातून सातत्याने मिळविला. त्यांनी कधीही दुसºया गायकाची गाणी गायली नाहीत, हे त्यांचे अनोखे वैशिष्ट्य होते. कमालीची कृतज्ञता आणि नम्रता हा त्यांचा स्थायी भाव होता. जी. एन. जोशी यांनी मराठी भावगीताची परंपरा निर्माण केली, तिच्यामुळेच आपण यशस्वी ठरलो, या कृतज्ञभावापोटी त्यांनी पदरचे ८५ हजार रुपये खर्चून, जोशी यांचा ८५वा वाढदिवस साजरा केला होता. बिरला समूहातील उपाध्यक्षपदाची नोकरी सोडल्यानंतर, मिळालेल्या पीएफ आणि गॅ्रच्युईटीच्या घसघशीत रकमेतून गीतकार पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव यांना, एक-एक लाख रुपये कृतज्ञतेपोटी घरी जाऊन अर्पण करण्याचे दातृत्व केवळ दातेच दाखवू शकत होते. मराठी भावगीतात दोनच गायक उच्च विद्या विभूषित होते. एक अरुण दाते, जे मॅकेनिकल इंजिनीअर व्हिजेटीआयमधून झाले होते आणि दुसरे श्रीधर फडके. गेली काही वर्षे अरुण दाते यांना स्मृतिभं्रशाच्या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे ते रुग्णशय्येला खिळलेले होते. आयुष्यात सगळी सुखे त्यांनी प्राप्त केली होती. त्यांचे आयुष्य तृप्ततेने भरलेले होते. त्यामुळेच निद्रावस्थेतच त्यांना मृत्यू आला. कलावंताचे शालीनतेचे व सुसंस्कृत असे आयुष्य कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणजेत्यांचे आयुष्य होते. त्यांच्यासारखा भावगीत गायक पुन्हाहोणार नाही.

टॅग्स :arun datearun datemarathiमराठीmusicसंगीत